Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर, पहिला पेपर कधी? जाणून घ्या वेळापत्रक
दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाणून घ्या.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये इयत्ता बारावी आणि दहावीच्य लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा ही 8 फेब्रुवारी रोजीपासून सुरू होईल. तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारीपाासून सुरू होईल. बारावी लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 18 मार्च 2027 दहावी लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 2027
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
