AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sayaji Shinde : ‘टोरेंट असो किंवा इतर कोणताही दलाल, त्यांना पळवून मारा!’ सयाजी शिंदे स्पष्टच म्हणाले

Sayaji Shinde : 'टोरेंट पॉवर' कंपनीच्या विरोधात अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे आक्रमक झाले आहेत. एवढंच नाही तर, एका कार्यक्रमात बोलताना जमिनीबाबतचा 40 वर्षांचा संघर्ष आणि प्रशासकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केला.

Sayaji Shinde : 'टोरेंट असो किंवा इतर कोणताही दलाल, त्यांना पळवून मारा!' सयाजी शिंदे स्पष्टच म्हणाले
| Updated on: Nov 07, 2026 | 2:35 PM
Share

Sayaji Shinde : ‘टोरेंट पॉवर’ कंपनीने 3000 मेगावॅटच्या पंम्पड् स्टोरेज हायड्रोपॉवर प्रकल्पासाठी मोठ्या प्रमणात वृक्षतोड करण्यासाठी उपक्रम राबवले आहेत. याचा विरोध अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे आक्रमक झाले आहे. वृक्षतोडीला विरोध करत सयाजी शिंदे आंदोलन करताना दिसत आहेत. आता कर्जतमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना जमिनीबाबतचा 40 वर्षांचा संघर्ष आणि प्रशासकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केला. दलाल आणि अतिक्रमणामुळे सामान्य माणसाला कसा मनस्ताप सहन करावा लागतो… यावर देखील सयाजी शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आपली व्यथा मांडताना सयाजी शिंदे म्हणाले, “1978 साली माझी जमीन धरणात गेली. त्यावेळी मला मोबदला म्हणून केवळ 14 हजार रुपये मिळाले होते. तब्बल 40 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मला आता कुठे जमीन मिळाली आहे. पण इथेही प्रशासकीय गोंधळ थांबलेला नाही. वीस वर्षांपासून सरकार कागदपत्रे दाखवत होते, पण प्रत्यक्ष जागेवर जमीनच नव्हती. कागदपत्रे मिळाली की प्रत्यक्ष जागा गायब आणि जागा भेटली की कागदपत्रे गायब, असा खेळ सुरु होता. 500 हून अधिक सिनेमांमध्ये काम केल्यानंतर मला माझी हक्याची जमीन मिळाली आहे. जमीन मिळाली तरी त्रास संपलेला नाही; कारण त्या जागेवरही अतिक्रमण झाले होते. ते अतिक्रमण हटवून शेवटी आम्हाला वाकडी-तिकडी जागा मिळाली.

आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, “मी पूर्वी वॉचमन म्हणून काम करायचो. माझ्यासोबत काम करणारे अनेक सहकारी आता निवृत्त झाले आहेत. एकेकाळी ज्यांच्याकडे दोन-तीन एकर जमिनी होत्या, ते आज अवघ्या 240 स्क्वेअर फूटच्या घरात राहण्यास भाग पडले आहेत. दुर्दैव म्हणजे, आज त्यांच्याच गेलेल्या जमिनींना कोट्यवधी रुपयांचा भाव आला आहे.”

प्रकल्पांसाठी जमिनी गमावणाऱ्या शेतकऱ्यांना इशारा देत सयाजी शिंदे म्हणाले, “आज तुमच्या जमिनी जातात तेव्हा तुम्हाला 10 – 20 लाख रुपये दिले जातात. पण तुमच्यातीलच काही एजंट आणि सरकार त्या पैशांतूनही आपला डल्ला मारतात. त्यामुळे दलालांच्या जाळ्यात अडकू नका. टोरेंट असो किंवा इतर कोणताही दलाल, त्यांना पळवून मारा! चार भावांना जमिनीचे चार तुकडे मिळायला हवे होते, पण ते झालेच नाहीत. आम्हाला आठ एकर जमीन मिळायला हवी होती, पण कागदपत्रांच्या खेळात काय चालले आहे हे कुणालाच समजत नाही.”

सर्वांना एकत्र राहण्याचं आवाहन करत सयाजी शिंदे म्हणाले, “एकत्र राहा, तरच तुम्हाला तुमच्या जमिनीचा खरा भाव आणि महत्त्व समजेल. मी स्वतः या सर्व त्रासातून गेलो आहे. झाडांमध्ये देव असतो, मग थोड्याशा पैशांसाठी तो विकणार का? थोडे पैसे घेऊन तुम्ही कुठे जाणार? जमिनीचे मोल काय आहे, हे तुम्हाला नंतर समजेल,” असं देखील सयाजी शिंदे म्हणाले.

Follow Us
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला
तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
Sunetra Pawar On Sharad Pawar : तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...