AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5.99 लाखात घरी आणा नवी कार, 34 किमी मायलेज अन् फीचर्स जबरदस्त, खरेदीसाठी शोरुममध्ये तुफान गर्दी

360 डिग्री कॅमेरा, 34 किमी मायलेज आणि किंमत फक्त 5.99 लाख रुपये. ही कार घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी. दोन महिन्यातच विकल्या 50 हजार कार.

5.99 लाखात घरी आणा नवी कार, 34 किमी मायलेज अन् फीचर्स जबरदस्त, खरेदीसाठी शोरुममध्ये तुफान गर्दी
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 07, 2026 | 2:39 PM
Share

मारुती सुझुकी इंडियाच्या अपडेटेड बलेनो फेसलिफ्टला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सप्टेंबरमध्ये लॉन्च झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत म्हणजेच 60 दिवसांत या कारच्या 50 हजार युनिट्सची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, दररोज सरासरी 833 ग्राहकांनी बलेनो खरेदी केली. कंपनीचे मार्केटिंग आणि सेल्सचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यांनी या विक्रीला दुजोरा दिला आहे. बलेनो फेसलिफ्ट 5 सप्टेंबर रोजी लॉन्च झाली असून तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे.

नवीन डिझाइनसह आधुनिक फीचर्स

नवीन बलेनोमध्ये आकर्षक स्टायलिंगसोबत अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात लेव्हल-2 ADAS, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 9-इंच स्मार्टप्ले प्रो+ टचस्क्रीन, अँड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कारप्ले, आर्कमिस ऑडिओ सिस्टम, हेड-अप डिस्प्ले (HUD), 360-डिग्री कॅमेरा आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलचा समावेश आहे. सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्ज, ABS, EBD, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल-स्टार्ट असिस्ट आणि ISOFIX यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

नवीन इंजिन आणि दमदार मायलेज

या फेसलिफ्टमध्ये जुन्या K12N 1.2-लिटर चार सिलिंडर पेट्रोल इंजिनऐवजी नवीन Z12E 1.2-लिटर तीन सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 83hp पॉवर आणि 112Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्याय मिळतात. मॅन्युअल व्हेरिएंट 23.80 किमी प्रतिलिटर, तर AMT व्हेरिएंट 24.77 किमी प्रतिलिटर मायलेज देते.

CNG व्हेरिएंटमध्ये हे इंजिन 70hp पॉवर आणि 102Nm टॉर्क निर्माण करते. CNG मॉडेलमध्ये मॅन्युअल आणि AMT असे दोन्ही पर्याय उपलब्ध असून कंपनीच्या दाव्यानुसार अनुक्रमे 33.61 आणि 34.47 किमी प्रति किलो मायलेज मिळते.

SUV ची वाढती क्रेझ, तरीही बलेनोला पसंती

भारतीय बाजारात SUV कारची मागणी सातत्याने वाढत असतानाही बलेनोला मिळालेला प्रतिसाद महत्त्वाचा मानला जात आहे. प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये बलेनोची स्पर्धा Hyundai i20 आणि Tata Altroz यांच्याशी आहे. नवीन डिझाइन, आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षा फीचर्स आणि चांगले मायलेज यामुळे बलेनोने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Follow Us
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला
तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
Sunetra Pawar On Sharad Pawar : तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...