Fort News: महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! संवर्धनाला बळ मिळणार; ‘या’ चार किल्ल्यांवर आता पहारा कडक राहणार
Maharashtra Fort Conservation News: महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. संवर्धनासाठी DPDC मधून ३ टक्के निधी देण्यात येणार आहे.

राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘वैभव संगमन योजने’अंतर्गत मिळालेल्या मान्यतेनुसार आरपीजी फाऊंडेशनने देखभालीसाठी शिवडी किल्ला दत्तक घेतला आहे. या योजनेअंतर्गत एक संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारण्याची योजना आहे. या संग्रहालयात किल्ल्याचा इतिहास, संस्कृती, पर्यावरण आणि मुंबईच्या सागरी वारशाशी असलेला त्याचा संबंध प्रदर्शित केला जाईल. यानंतर आता राज्यातील गड किल्ले संवर्धनासाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडकिल्ले संवर्धनासाठी डीपीडीसीमधून 3 टक्के निधी देण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली आहे. मंदिरे, ऐतिहासिक स्मारके यांच्या संवर्धनासाठी निधी मिळणार आहे. यासाठी पुरातत्व विभागाकडून तांत्रिक मान्यता मिळणार आहे. युनेस्कोच्या यादीतील चार किल्ल्यांची सुरक्षा भक्कम होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रतापगड, राजगड, साल्हेर आणि खांदेरी येथे सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्र सरकारचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे आता किल्ल्यावरील अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे. यावरून सुरक्षा रक्षक मंडळाचे 80 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येक किल्ल्यावर 19 सुरक्षा रक्षक आणि 1 पर्यवेक्षकाची नेमणूक करणार आहेत.
तर दुसरीकडे वरळी कोळीवाड्यात आतापर्यंत 71 पेक्षा जास्त पथदिवे, 30 पेक्षा जास्त माहिती फलक आणि सातपेक्षा जास्त सार्वजनिक भित्तिचित्रे बसवण्यात आली आहेत. मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसरात वारसा जतन करण्याचे आणि या स्थळाचा इतिहास व सांस्कृतिक महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत 150 हून अधिक महिलांना उद्योजकता, शिलाईकाम आणि आरोग्य या विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
विविध कार्यक्रम आणि अनुभवात्मक उपक्रमांच्या माध्यमातून 500 हून अधिक पर्यटकांनाही या वारसा स्थळाशी जोडण्यात आले आहे. वरळी किल्ला आणि वरळी कोळीवाडा येथेही राबविण्यात येत आहे. वरळी कोळीवाड्यात आतापर्यंत ७१ पेक्षा जास्त पथदिवे, ३० पेक्षा जास्त माहिती फलक आणि सातपेक्षा जास्त सार्वजनिक भित्तिचित्रे बसवण्यात आली आहेत.