
प्रफुल्ल लोढा यांच्याकडे असलेलं मटेरियल त्यांनी इतरांना देऊ नये आणि तोंड उघडू नये यासाठी त्यांना वारंवार पोलीस कोठडीत ठेवण्याचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. कारण लोढा जर बाहेर आले किंवा जामीनावर आले तर, त्यांच्याकडून सत्य निघाल्यास याचा पर्दाफाश होऊ शकतो असा दावाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. मी जे आहे ते उमद्या मनाने करणारा माणूस आहे, मी मागून करणारा माणूस नाही या शब्दात एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर दिलं आहे. एवढंच नव्हे तर याला जेलमध्ये टाका, याच्या मागे ईडी लावा, असं करणाऱ्यातला, अशातला मी माणूस नाही. लढायचे असेल तर आमने- सामने सढा, असं आव्हानही खडसे यांनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांना दिलं आहे.
महायुतीचे मंत्री गिरीश महाजन आणि एकेकाळी भाजपात असलेलेल पण सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात असलेले एकनाथ खडसे यांच्यातील वैर जगजाहीर आहे. थोडीशी जरी संधी मिळाली तरी खडसे आणि गिरीश महाजन एकमेकांना डिवचायला सुरूवात करतात. आज महाजन यांनी खडसेंवर पुन्हा निशाणा साधला होता. मला खडसेंचा राग येत नाही पण त्यांची कीव येते असं म्हणत महाजन यांनी खडसेंवर बरीच टीका केली. जोपर्यंत देवा भाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजन याची किंमत आहे, एकदा देवेंद्रजी यांनी डोक्यावरचा हात काढला की गल्लीमध्ये एक कुत्र्याच्या मागे जशी 100 कुत्रे लागतात तशी याची हालत होणार आहे अशी बोचरी टीकाही खडसे यांनी केली.
मी समोरून लढलो, मागून काड्या केल्या नाहीत
त्यांच्या या टीकास्त्राला आता खडसेंनीही चोख प्रत्युत्तर दिलंय. आतापर्यंत लढलो मी ते समोरून लढलो, मागून काड्या केल्या नाही असं खडसेंनी सुनावलं. हा जो प्रफुल्ल लोढा आहे, तो गिरीश महाजन यांच्या बंगल्यामध्ये सातत्याने राहायचा. महाजन मंत्री असताना त्यांच्यासोबत तो रहायचा, यात पुरावा देण्याची काही गरज नाही कुणीही सांगू शकेल असंही ते म्हणाले.
मी असं कधीच म्हटलं नाही की लोढा मला भेटला नाही. मी पहिल्या मुलाखतीतच म्हटलं होतं की माझासुद्धा त्याच्यासोबत फोटो असू शकतो. माझा मूळ विषय हाच आहे की नाशिकच्या आणि ट्रॅपच्या प्रकरणांमध्ये कोणकोण आहे त्याचं मूळ शोधणे. यातला एक जण आपल्या विभागातला आहेच मी त्यापर्यंत लवकरच पोचेल आणि हा विषय शेवटपर्यंत नक्कीच जाईल असा विश्वाससुद्धा एकनाथ खडसे यांनी नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणावर बोलताना व्यक्त केला.
मानसिक संतुलन माझं बिघडलं की गिरीशचं बिघडलं ?
देवा भाऊ (मुख्यमंत्री )यांना मी काही सल्ला देणार नाही, मात्र ते योग्य निर्णय घेतील असं मला विश्वास आहे. तुम्हाला काय वाटतं मानसिक संतुलन माझं बिघडलं की गिरीशचx बिघडलं असा सवालही खडसेंनी विचारला. विधानसभेत मी आवाज करतो तर अच्छे-अच्छे की चड्डी गीली हो जाती है, हे तुम्ही बघितलं आहे. गिरीश भाऊंची चांगली ख्याती आहे. सर्वांनाच माहिती आहे, त्यांच्यावर चांगल्या चांगल्या कॉमेंट्स येतात. हनीट्रॅप प्रकरणांमध्ये बऱ्याचदा रामेश्वर नाईक याचं सुद्धा नाव घेतले गेलं असा गंभीर आरोप सुद्धा एकनाथ खडसे यांनी केला आहे
ज्यावेळी प्रफुल्ल लोढा यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यावेळी रामेश्वर नाईक हा त्या ठिकाणी उपस्थित होता. रामेश्वर नाईक यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती असं प्रफुल लोढा यांनी म्हटलं आहे. आणि धमकी देणारेच आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आहेत. त्यामुळे या प्रकरणावर दबाव राहण्याची भीती आहे. किती सत्य समोर येईल हे मला माहित नाही, पेन ड्राईव्ह मध्ये जर एखादी मंत्री दिसत असेल तर ते नष्ट होईल अशी सुद्धा मला भीती आहे असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
एक कुत्र्याच्या मागे जशी 100 कुत्रे लागतात तशी हालत होणार..
आता जर तुझ्या ताकद असेल आणि तुझ्यात हिम्मत असेल, खऱ्या अर्थाने तुझी पत वरच्या बाजूला असेल, माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी कर, असं थेट आव्हान एकनाथ खडसे यांनी पुन्हा गिरीश महाजन यांना दिला आहे. माझ्या मुलाच्या आत्महत्येची तसेच खुनाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करावी, मी तयार आहे. जोपर्यंत देवा भाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजन याची किंमत आहे, एकदा देवेंद्रजी यांनी डोक्यावरचा हात काढला की गल्लीमध्ये एक कुत्र्याच्या मागे जशी 100 कुत्रे लागतात तशी याची हालत होणार आहे अशी बोचरी टीकाही खडसे यांनी केली.
गिरीश महाजन जे जे प्रश्न विचारतात त्याची माहिती त्यांना नसते. 1964 साली आणि पाच भावांना शिकवण्याची त्यांची क्षमता होती. आम्ही मंत्री आहेत आणि याच्या माध्यमातून कितीतरी उद्योग करायचे आणि पैसे कमवायचे असे कितीतरी उदाहरणे दाखवता येतील. मंत्री गिरीश महाजन यांचा असा काय व्यवसाय आहे, ते पेन्शनर माणसाच्या मुलाकडे एवढी मोठी संपत्ती कशी आली ? हनी ट्रॅप मध्ये अटक केलेल्या प्रफुल लोढा याची घटनेनंतर पंधरा दिवसानंतर अंधेरी पोलीस ठाण्यात कशी नोंद झाली..? घटना घडली ती तारीख आणि साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ती तारीख यामध्ये 15 दिवसांचा फरक आहे पंधरा दिवस गुन्हा दाखल करण्यासाठी का लागले ? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले.
माझा सरळ आक्षेप आहे की प्रफुल्ल लोढा याच्याकडून काही मिळण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते नष्ट करण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.त्याच्याकडून काहीतरी मिळेल म्हणूनच त्याला छळणं सुरू आहे असं सुद्धा एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. लोढा याच्याकडून पुरावे घ्यायचे आहेत आणि ते पुरावे नष्ट करायचे आहेत असा गंभीर आरोप देखील खडसे यांनी केला आहे.