Corona | तिसऱ्या लाटेचे हे संकेत तर नाहीत ना? गेल्या 6 दिवसांत अशी झाली कोरोना रुग्णवाढ

| Updated on: Dec 28, 2021 | 11:59 PM

कोरोनाचे वाढते आकडे धडकी भरवणारे असून मंगळवारी राज्यात 2 हजार 172 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. ही आकडेवारी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे.

Corona | तिसऱ्या लाटेचे हे संकेत तर नाहीत ना? गेल्या 6 दिवसांत अशी झाली कोरोना रुग्णवाढ
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. दबक्या पावलांनी रुग्णवाढ होत असल्यामुळे त्याकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही आहे. मात्र वेळीच हा धोका ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या सहा दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णवाढीनं कमालीचा वेग पकडला आहे. कोरोनाचा नवा विषाणू पुन्हा एकदा गुणाकार करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आकडेवारीतून पाहायला मिळालंय.

कोरोनाचे वाढते आकडे धडकी भरवणारे असून मंगळवारी राज्यात 2 हजार 172 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. ही आकडेवारी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. राज्यात गेल्या कित्येक महिन्यातली ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. सोमवारीही मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली होती. देशासह राज्यात पुन्हा मोठी रुग्णवाढ होऊ लागल्यानं प्रशासनही धास्तावलंय. सर्व यंत्रणा पुन्हा अलर्ट मोडवर आल्या आहे. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार देशासह, राज्याच्या डोक्यावरही कायम आहे. गेल्या काही दिवसात रुग्ण कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला होता मात्र पुन्हा अशी स्फोटक आकडेवारी समोर येऊ लागल्याने पुन्हा धाबे दणाणले आहेत.

6 दिवसांत पुन्हा विक्रमी रुग्णवाढ!

मागच्या 6 दिवसांत महाराष्ट्रात कोरोनाचा कहर पाहायला मिळाला असून मागचे सहा दिवस रोज नवे उच्चांक कोरोना रुग्णवाढीनं गाठले. गेल्या सहा दिवसांतली आकडेवारी खालीलप्रमाणे –

23 डिसेंबर – 1079 नवे कोरोना रुग्ण
24 डिसेंबर – 1410 नवे कोरोना रुग्ण
25 डिसेंबर – 1485 नवे कोरोना रुग्ण
26 डिसेंबर – 1648 नवे कोरोना रुग्ण
27 डिसेंबर – 1426 नवे कोरोना रुग्ण
28 डिसेंबर – 2171 नवे कोरोना रुग्ण

मुंबईकरांनो, सावध व्हा!

मुंबईत मंगळवारी कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ झाल्याचे समोर आले आहे, कारण एकट्या मुंबईतली आकडेवारी 1377 आहे, त्यामुळे ही गेल्या काही महिन्यातली स्फोटक वाढ आहे. सार्वजनिक ठिकाणी पुन्हा होणारी तुफान गर्दी आणि लोकांचा निष्काळजीपण यामुळे ही आकडेवारी एवढी वाढली आहे. राज्यात दिवसभरात 22 कोरोना रुग्णांचा मृत्युही झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आज दिवसभरात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. सध्या ओमिक्रॉनबाधितांची संख्या 167 वर आहे.

इतर बातम्या –

दमलेल्या ‘बाळांची’ कहाणी; थकव्यासह निद्रानाशाची वाढती समस्या, वेळीच उचला ‘ही’ पावलं!

मोठी बातमी! ठाण्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे 3 जानेवारीपासून लसीकरण; केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी

Aurangabad Omicron: आता घाटी रुग्णालय प्रयोगशाळेत जिनोम सिक्वेन्सिंग, प्रत्येक कोरोना रुग्णाची ओमिक्रॉन टेस्ट!