Maharashtra Lockdown | राज्यात संचारबंदी, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी नियम काय?

| Updated on: Apr 14, 2021 | 8:58 AM

राज्य सरकारकडून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात मतदान संपेपर्यंत निर्बंधातून सवलत असणार आहे.  (Pandharpur Mangalvedha Assembly bypoll rules)

Maharashtra Lockdown | राज्यात संचारबंदी, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी नियम काय?
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट पाहता सरकारने कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आज (बुधवार 14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. मात्र हे सर्व निर्बंध पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात (Pandharpur Mangalvedha Assembly bypoll) लागू केल्या जाणार नाही. पंढरपूरला मतदान संपेपर्यंत निर्बंधातून सवलत देण्यात आली आहे. पण मतदान पार पडल्यानंतर या मतदारसंघातही कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. (Maharashtra lockdown what is rules for Pandharpur Mangalvedha Assembly bypoll)

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे (Samadhan Autade) यांना रिंगणात उतरवलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात मतदान संपेपर्यंत निर्बंधातून सवलत असणार आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी नियम काय?

1) ज्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका नियोजित आहेत, तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी अटी आणि शर्तींचा घालून राजकीय सभांना परवानगी द्यावी.

2) भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून बंदिस्त ठिकाणी 200 व्यक्ती किंवा 50 टक्के क्षमता यापैकी जे कमी असेल त्यानुसार राजकीय सभा घेण्यास परवानगी द्यावी. तर खुल्या ठिकाणी 50 टक्के क्षमतेने आणि केंद्र शासनाने कोव्हिड 19 संबंधित मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रचाराच्या प्रयोजनार्थ राजकीय सभा घेण्यास परवानगी द्यावी.

3) सर्व मार्गदर्शक सूचनांचे कसोशीने अनुपालन होत असल्याची खातरजमा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय सभेच्या ठिकाणी कर्मचारी नियुक्त करावेत.

4) या मार्गदर्शक तत्वांचा कोणत्याही प्रकारे भंग झाल्यास जागा मालक त्यासाठी जबाबदार असेल. त्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार दंड करण्यात येईल. उल्लंघन गंभीर स्वरूपाचे असल्यास महासाथ ओसरेपर्यंत ही जागा टाळेबंद करण्यात येईल.

5) कोणत्याही उमेदवाराने कोणत्याही नियमाचे 2 पेक्षा जास्त वेळा उल्लंघन केल्यास त्या उमेदवाराला राजकीय सभा आयोजित करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देऊ नये.

6) संमेलने, कोपरा सभा इत्यादी अन्य कार्यक्रमांसाठी कोव्हिड 19 शी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन आवश्यक आहे.

7) कुठल्याही प्रकारचा पक्षपात किंवा भेदभाव न बाळगता निवडणुकीत सहभागी सर्व घटकांना सर्व मार्गदर्शक तत्वे सारखेपणाने लागू होतील. या मार्गदर्शक तत्वांचे निवडक अथवा पक्षपाती लागू करण्याबाबत कोणत्याही तक्रारीस जागा राहणार नाही, याची खबरदारी संबंधितांनी घ्यावी

8) मतदानाच्या दिवशी रात्री 8 वाजल्यानंतर या आदेशातील सर्व तरतुदी पूर्णपणे त्या क्षेत्रात लागू होतील

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक  

17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी गुलाल!

अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021
>> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021
>> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021
>> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021
>> मतदान – 17 एप्रिल 2021
>> निवडणूक निकाल – 2 मे 2021

(Maharashtra lockdown what is rules for Pandharpur Mangalvedha Assembly bypoll)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Lockdown | लग्न समारंभासाठी पाहुण्यांची संख्या निम्म्यावर, ब्रेक द चेनची संपूर्ण नियमावली

Mumbai Local : मुंबई लोकल सुरुच राहणार, प्रवासाला कुणाला परवानगी, कुणाला नाही?

मुख्यमंत्र्यांकडून 5476 कोटींच्या पॅकेजची घोषणा; 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ महिनाभर मोफत