Mumbai Local : मुंबई लोकल सुरुच राहणार, प्रवासाला कुणाला परवानगी, कुणाला नाही?

Mumbai Local : मुंबई लोकल सुरुच राहणार, प्रवासाला कुणाला परवानगी, कुणाला नाही?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सार्वजनिक व्यवस्थेबाबत ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यानुसार मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा सुरुच ठेवण्यात येणार आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 13, 2021 | 11:22 PM

मुंबई : देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील लॉकडाऊनची अखेर घोषणा झालीय. त्यानुसार 14 एप्रिलपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आलीय. त्यानुसार अनेक निर्बंध लादण्यात आलेत. मात्र, सार्वजनिक व्यवस्थेबाबत ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यानुसार मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा सुरुच ठेवण्यात येणार आहे. मात्र, सर्वांना लोकल सेवेचा उपयोग करता येणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे. यामागील कारणंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केली (Mumbai Local will run during lockdown know all about it who can travel).

उद्धव ठाकरे म्हणाले, “14 एप्रिल रोजी संध्याकाळपासून आपण राज्यात 144 कलम लागू करत आहोत. पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी लागू करत आहोत. अनावश्यक फिरणं टाळावं. घराबाहेर पडू नका. जनता कर्फ्य म्हणजे आपण ठरवतो. तसं तुम्ही ठरवायचं आहे. कारण नसताना घराबाहेर पडणार नाही. मी कोरोनाला मदत करणार नाही, तर सरकारला मदत करणार असं ठरवायचं आहे. याबाबतचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व अस्थापना बंद राहतील. सकाळी सात ते रात्री आठ या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.”

“सार्वजनिक वाहतूक सेवा सुरुच राहणार”

“सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करत नाहीत. लोकल, बस बंद करत नाही आहोत. पण जीवनाश्यक काम करणाऱ्यांसाठी ही सुविधा सुरु राहतील. यामध्ये रुग्णालये, दावाखाने, वैद्यकीय सुविधा देणार, लस उत्पादक, विमा, लसींची वाहतूक सुविधा, वैद्यकीय कच्चा माल हे सगळेच. जनावारांशी संबंधित दुकानेही उगडे राहतील. शीतगृहे, हवाई वाहतूक, रेल्वे, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालये सुरु राहतील,” असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

पेट्रोलपंपही सुरु राहणार

“पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे चालू राहतील. रिझर्व्ह बँक, सेबीनी मान्यता दिलेली कार्यालये, दूरचित्रवाणी, पेट्रोलपंप, खासगी सुरक्षा मंडळ चालू ठेवणार आहोत. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही कामं सुरु राहतील. अत्यावश्यक कामासाठी सार्वजनिक वाहतूक सुरु असेल, पण इतर वाहतूक बंद राहिल. बांधकाम व्यवसायिकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची सोय करावी. त्यांच्या मार्फत कोरोना पसरवू नका. कारखाना ते कर्मचाऱ्यांची वसाहत अशी वाहतूक करु शकता,” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर; वाचा, संपूर्ण नियमावली, काय सुरु, काय बंद?

महाराष्ट्रात कडक Lockdown ची शक्यता, रेल्वे सेवा बंद होणार? Indian Railway म्हणते…

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनचं काऊंटडाऊन सुरू; वाचा, संपूर्ण नियमावली काय?

व्हिडीओ पाहा :

Mumbai Local will run during lockdown know all about it who can travel

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें