Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनचं काऊंटडाऊन सुरू; वाचा, संपूर्ण नियमावली काय?

शुक्रवार संध्याकाळी  6 पासून- सोमवार सकाळी 7 पर्यंत कडक लॉकडाऊन असेल. तर राज्यात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. (Maharashtra Weekend Lockdown Guidelines)

Namrata Patil

| Edited By: सचिन पाटील

Apr 09, 2021 | 7:01 PM

मुंबई : महाराष्ट्रात आज 9 एप्रिलपासून वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend Lockdown) लागू होत आहे. या लॉकडाऊनचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. त्यानुसार शुक्रवार संध्याकाळी  6 पासून- सोमवार सकाळी 7 पर्यंत कडक लॉकडाऊन असेल. तर राज्यात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. यादरम्यान कोणते निर्बंध लागू असणार? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार का? खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय? याची गाईडलाईन्स राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे. (Maharashtra Weekend Lockdown Guidelines)

Weekend Lockdown ची संपूर्ण नियमावली

⭕हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारसाठीचे नियम

💠सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद ठेवावे लागणार 💠 रेस्टॉरंट्सना ग्राहकांना पार्सल सेवा किंवा होम डिलिव्हरी सेवा देण्यासाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी 💠शनिवारी आणि रविवारी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी सेवा सुरु राहणार 💠ग्राहकांना प्रत्यक्ष जाऊन जेवण पार्सल नेता येणार नाही 💠निवासी सेवा पुरवाणाऱ्या हॉटेल्सच्या बार आणि रेस्टॉरंट्सना केवळ हॉटेलमध्ये वास्तवास असलेल्या पाहुण्यांना सेवा देता येणार 💠10 एप्रिलपासून रेस्टॉरंटमधून डिलीव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा RTPCR कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक 💠ही कोरोना निगेटीव्ह RTPCR चाचणी 15 दिवसांच्या कालावधीसाठी ग्राह्य धरणार 💠RTPCR चाचणी नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड 💠हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरण लवकर करुन घ्यावं

⭕सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय?

💠ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हरसह दोन प्रवाशांना परवानगी 💠टॅक्सीत ड्रायव्हरसह एकूण प्रवासी संख्येच्या 50 टक्के प्रवासी बसवण्यास परवानगी 💠सार्वजनिक वाहतुकीतील सर्वांनी मास्क वापरणं बंधनकारक, न वापरल्यास 500 रुपये दंड 💠सार्वजनिक वाहतुकीत असणाऱ्या व्यक्तीने आपले कोव्हिड लसीकरण करुन घ्यावे 💠10 एप्रिलपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर आणि स्टाफला कोरोना निगेटीव्ह RTPCR रिपोर्ट बंधनकारक  (Maharashtra Weekend Lockdown Guidelines) 💠रिपोर्ट जवळ न ठेवल्यास प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड 💠ड्रायव्हरने गाडीत स्वतःला प्लॅस्टिक कव्हरने प्रवाशांपासून विलग ठेवल्यास RTPCR रिपोर्टची गरज नाही 💠लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यामध्ये जनरल डब्यात उभ्याने प्रवास करण्यास मनाई 💠सर्व प्रवाशांनी मास्क घालून प्रवास करण्याची गरज

⭕खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय?

💠खाजगी वाहनधारकांसह बसेसला सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत प्रवासाची परवानगी 💠येत्या शुक्रवारी (9 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी (12 एप्रिल) सकाळी 7 वाजेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासास परवानगी नाही 💠केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कारणांसाठी खासगी वाहनांना शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत परवानगी 💠खासगी बसेसमधील कर्मचारी आणि स्टाफने कोरोना लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावं 💠10 एप्रिलपासून खाजगी वाहतुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना RTPCR चाचणी निगेटीव्ह असणं बंधनकारक 💠ही कोरोना निगेटीव्ह RTPCR चाचणी 15 दिवसाच्या कालावधीसाठी ग्राह्य धरणार 💠RTPCR चाचणी नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड

(Maharashtra Weekend Lockdown Guidelines)

संबंधित बातम्या : 

राज्यात विकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद

Weekend Lockdown | महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन, वाहतूक व्यवस्थेबाबत काय निर्णय?

Maharashtra Weekend Lockdown | सार्वजनिक आणि खासगी वाहनांसाठी महत्त्वाचे नियम

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें