सह-पालकमंत्री काय आहे? मुंबईला गेल्यावर समजून घेईन; हसन मुश्रीफ यांचा आपल्याच सरकारला खोचक टोला

आता पालकमंत्रीपदावरुन काही मंत्री नाराज झाले आहेत. यामुळे अनेक नेते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच राज्य सरकारने या यादीत काही मंत्र्‍यांच्या नावापुढे पालकमंत्री आणि सहपालकमंत्री असे नमूद केले आहे.

सह-पालकमंत्री काय आहे? मुंबईला गेल्यावर समजून घेईन; हसन मुश्रीफ यांचा आपल्याच सरकारला खोचक टोला
hasan mushrif
| Updated on: Jan 20, 2025 | 5:23 PM

राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ३७ जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यातच आता पालकमंत्रीपदावरुन काही मंत्री नाराज झाले आहेत. यामुळे अनेक नेते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच राज्य सरकारने या यादीत काही मंत्र्‍यांच्या नावापुढे पालकमंत्री आणि सहपालकमंत्री असे नमूद केले आहे. त्यातच आता वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

हसन मुश्रीफ यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरुन प्रश्न विचारण्यात आला. सध्या मंत्री प्रकाश आबिटकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत. तर माधुरी मिसाळ या सहपालकमंत्री आहेत. यातील सह पालकमंत्रीपदावरुन हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे.

कोल्हापुरातील लोकांच्या मनातील पालकमंत्री मीच

“मी गेले २० वर्ष मंत्री आहे. मी कोल्हापुरातील लोकांच्या मनातील पालकमंत्री मीच आहे. मला कमी वर्ष मिळाली असली, तरी लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच आहे. सह-पालकमंत्री ही नवीन पद्धत सुरु झाली आहे. पूर्वी त्या जिल्ह्यातील मंत्री हा सह-पालकमंत्री असायचा. पण मी मुंबईला गेल्यावर सह-पालकमंत्री काय आहे, हे समजून घेईन”, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

कोणाकडे कोणते पालकमंत्रीपद?

दरम्यान नुकत्याच जाहीर केलेल्या पालकमंत्री पदाच्या यादीनुसार, मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री पद एकनाथ शिंदेंकडे देण्यात आले आहे. तर मुंबई उपनगराचे पालकत्व दोघांकडे असणार आहे. आशिष शेलार हे मुंबई उपनगराचे पालकमंत्री असणार आहेत. तर मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री असणार आहेत. त्यासोबतच गडचिरोलीचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे. तसेच बीड आणि पुण्याचे पालकमंत्रीपदी अजित पवार यांच्याकडे असणार आहे. तसेच नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्रीपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली आहे. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद संजय शिरसाट यांच्याकडे तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचा कारभार असणार आहे. तसेच नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा अखेर गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले आहे.