
महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच पक्ष हे जोमाने तयारीला लागले आहेत. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंच्या मनसेने आपली रणनीती पूर्णपणे निश्चित केली आहे. अनेक प्रमुख शहरांमध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिला असला, तरी काही ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांसोबत जागावाटपाचे गणित जुळवले आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमधील जागावाटपाचे अधिकृत आणि अंतिम आकडे आता समोर आले आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत अधिकच वाढली आहे.
भाजप: 137
शिवसेना (शिंदे गट): 90
शिवसेना (ठाकरे गट): 164
मनसे: 53
काँग्रेस: 139
अजित पवार गट: 60-70
वंचित बहुजन आघाडी: 62
रासप: 10
भाजप: 165 (स्वबळ)
अजित पवार गट: 122
शिवसेना (शिंदे गट): 70
काँग्रेस: 79
शिवसेना (ठाकरे गट): 65
शरद पवार गट: 40
शिवसेना (शिंदे गट): 87
भाजप: 40
उद्धव ठाकरे गट: 53
शरद पवार गट: 36
मनसे: 28
काँग्रेस: 100 (स्वबळ)
अजित पवार गट: 75
वंचित: 13
भाजप: 122
शिवसेना (शिंदे गट): 97
अजित पवार गट: 23
उद्धव ठाकरे गट: 60
मनसे: 20
शरद पवार गट: 16
काँग्रेस: 12
भाजप: 128
अजित पवार गट: 100
शिवसेना (ठाकरे गट): 65
काँग्रेस: 60
शिवसेना (शिंदे गट): 25
मनसे: 20
शरद पवार गट: 18
शिवसेना (शिंदे गट): 68
शिवसेना (ठाकरे गट): 68
भाजप: 54
मनसे: 49
काँग्रेस: स्वतंत्र लढत
भाजप: 78
शिवसेना (शिंदे गट): 35
टीम ओमी कलानी: 32
शिवसेना (शिंदे गट): 54
राष्ट्रवादी (अजित पवार): 34
भाजप: 32
राष्ट्रवादी (शरद पवार): 32
शिवसेना (ठाकरे गट): 24
काँग्रेस: 14
मनसे: 8
वंचित: 3
दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. संपूर्ण राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार, उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर, ज्या उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घ्यायची आहे, त्यांच्यासाठी 2 जानेवारी ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अधिकृत आणि अंतिम यादी 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल.
प्रचाराचा रणसंग्राम संपल्यानंतर 15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार असून, मतदारांना आपला कौल देता येईल. या निवडणुकीची सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे मतमोजणी आणि निकाल, जो मतदानानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. याच दिवशी महापालिकांवर कोणाची सत्ता येणार, याचे चित्र स्पष्ट होईल.