
राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. 2 डिसेंबरला नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणूकीसाठी मतदान पार पडले आहे. मात्र 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणूका पुढे ढकलल्या होत्या. यासाठी आज (20 डिंसेंबरला) मतदान पार पडले. आता उद्या 2 डिसेंबरसह आज झालेल्या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. गुलाल उधळण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. उद्याचा निकालाचे वेगवान अपडेट्स कुठे पहायचे ते सविस्तर जाणून घेऊयात.
निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 02 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. आज 23 ठिकाणी मतदान पार पडत आहे. उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता उद्या कोणता पक्ष बाजी याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
टीव्ही 9 मराठी वेबसाईट
टीव्ही 9 मराठी लाइव्ह ब्लॉग
टीव्ही 9 मराठी यूट्यूब चॅनल
टीव्ही 9 मराठी लाइव्ह टीव्ही
टीव्ही 9 मराठी निवडणूक पेज
इगतपुरी नगरपरिषद निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तंत्र महाविद्यालय इगतपुरी येथे उमेदवार प्रतिनिधी शासकीय अधिकारी व पत्रकार यांची बैठक पार पडली. या बैठकीत मतमोजणी प्रक्रिये संदर्भात उपस्थित असलेल्या उमेदवार प्रतिनिधी यांना माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना मुख्य निवडणूक अधिकारी अभिजीत बारवकर म्हणलाले की, मतमोजणी प्रक्रिया दहा वाजता सुरू होणार आहे. स्ट्राँग रूम उमेदवारांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता उघडण्यात येईल अधिकृत ओळख पत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
पुढे बोलताना बारवकर म्हणाले की, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांना आत मध्ये आणू दिले जाणार नाही. निवडणूक आयोगाच्या नियमान्वये मतमोजणीच्या प्रक्रियेचा डाटा भंग करता येणार नाही. तसे केल्यास अनधिकृत कृती किंवा नियमाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल. उद्या कडेकोट पोलिस बंदोबस्त असणार आहे. याबाबत उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना सर्व प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात चार नगरपालिकेच्या उद्या मतमोजणी होणार असल्याने यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात होणाऱ्या उद्या मतमोजणीसाठी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यातील चार नगरपालिकांसाठी सरासरी 69 टक्के मतदान झालं होतं झालेलं आहे. हे मतदान नेमकं कोणाच्या बाजूने राहणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे तर कुठलाही अनुचित प्रकार घडवू नये यासाठी पोलीस दल, राज्य राखीव दल सज्ज झाले आहे.