सत्तेच्या लालसेपोटी बापाने ओलांडल्या मर्यादा… पोटच्या लेकीसोबत केलं नको ते… मन विचलित करणारी घटना

महाराष्ट्रात सत्तेचं राजकारण... बापाने लेकीसोबत केलं नको ते कृत्य... सत्तेच्या लालसेपोटी ओलांडल्या सर्व मर्यादा... मन विचलित करणारी घटना... कसा आणि का रचला असा कट... धक्कादायक आहे घटना...

सत्तेच्या लालसेपोटी बापाने ओलांडल्या मर्यादा... पोटच्या लेकीसोबत केलं नको ते... मन विचलित करणारी घटना
फाईल फोटो
| Updated on: Feb 03, 2026 | 9:38 AM

राजकारणात अनेक घडामोडी घडत असतात. पण सत्तेच्या लालसेपोटी बापाने पोटच्या लेकीसोबत असं काही केलं ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. आपली सत्ता यावी म्हणून बापाने लेकीला संपवलं.. अशात तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, सत्ता आणि लेकीचा काय संबंध…? बापाने लेकीच्या हत्येचा कट का आणि कसा रचला…? मुलीमुळे राजकारणात कोणत्या अडचणी येत होत्या? ज्यामुळे बापाने चिमुलकलीचा जीव घेतला. सर्वात आधी तर, बापाने मुलीला दत्तक देण्यासाठी प्रयत्न केले. पण मुलीला कोणी दत्तक घेतलं नाही म्हणून मुलीची हत्या करणं… हाच एक पर्याय बापाच्या समोर होता..

सत्तेची लालसा माणसाला किती प्रमाणात वाईट कृत्य करण्यास भाग पाडू शकते… ते या घडलेल्या घडनेनंतर समोर आलं आहे. ही हृदयद्रावक घटना महाराष्ट्र येथील नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. पंचायत निवडणूक लढवण्यासाठी वडिलांनी स्वतःच्या अल्पवयीन मुलीची हत्या केली. यामध्ये गावातील संरपंचाने देखील वडिलांची मदत केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र येथील नांदेड जिल्ह्यातील केरुर गावातील रहिवासी कोंडामंगली पांडुरंग हे दोन अपत्य धोरण टाळण्यासाठी आणि आगामी पंचायत निवडणुका लढवण्यासाठी त्यांची मुलगी प्राची हिला संपवण्याचा कट रचत होते. या कटात गावचे सरपंत गणेश रामचंद्र शिंदे यांनी कोंडामंगली पांडुरंग यांची साथ दिल्याची माहिती देखील समोर येत आहे. पांडुरंग यांना दोन मुले आणि एक मुलगी असे तीन आपत्य आहेत. पण सत्तेसाठी फक्त दोन मुलं असणं बंधनकारक असल्यामुळे पांडुरंग यांनी मुलगी प्राची हिची हत्या केल्याची धक्कादायत माहिती समोर येत आहे.

पंचायत निवडणूक लढवण्यासाठी वडिलांनी लेकीला संपवलं…

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी येडापल्ली ठाणे क्षेत्राच्या निजामनगर येथील कालव्यात एका मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला. सुरुवातीला हे प्रकरण संशयास्पद मृत्यू वाटत होता, परंतु तपास पुढे सरकत असताना मुलाचा खून झाल्याचं निष्पन्न झालं. वडिलांनी पोटच्या मुलीला कालव्यात ढकलल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

मन विचलित करणारी गोष्ट म्हणजे, वडिलांनी सुरुवातीला मुलीला दत्तक देण्याचा देखील प्रयत्न केला. पण अधिकृत जन्म नोंद असल्यामुळे मुलीला दत्तक देण्याच्या योजनेला यश मिळालं नाही. त्यानंतर सत्तेची लालसा असलेल्या वडिलांनी मुलीला तेलंगणा येथे आणलं आणि एका मुलीला कालव्यात ढकललं…

अखेर पोलिसांनी चार दिवसांत मुलीच्या कुटुंबियांचा शोध घेतला. आई आणि नातेवाईकांमुळे मुलीची ओळख पटली… पोस्टमार्टम केल्यानंतर मुलीचा मृतदेह कुटुंबियांना सोपावण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी वडील पांडुरंग आणि सरपंच गणेश शिंदे यांना अटक केली आहे.