Maharashtra News LIVE : लवासा प्रकरणात पवारांच्या विरोधातील याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

Maharashtra News LIVE Updates In Marathi: सिंहस्थपूर्वी नाशिकला तब्बल 9,129 कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. आयुक्त मनीषा खत्री यांच्या आर्थिक नियोजनामुळे अर्बन चॅलेंज फंडातून 277 कोटींचा निधी. नाशिक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्टसाठी 58.50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra News LIVE : लवासा प्रकरणात पवारांच्या विरोधातील याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली
Breaking news
| Edited By: | Updated on: Jul 16, 2026 | 1:51 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 16 Jul 2026 01:45 PM (IST)

    आदिनाथ कोठारे – उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट

    अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी लग्नाच्या 25 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोघांनी याबद्दलची माहिती दिली आहे. उर्मिला आणि आदिनाथ यांनी डिसेंबर 2011 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांची पोस्ट काय आहे, ते सविस्तर वाचा- उर्मिला-आदिनाथची पोस्ट

  • 16 Jul 2026 01:30 PM (IST)

    विठ्ठलाला साकडं घालून जर गोष्टी होत असत्या, तर याआधी पण खूप झाल्या असत्या- चंद्रकांत पाटील

    “विठ्ठलाला साकडं घालून जर गोष्टी होत असत्या, तर याआधी पण खूप झाल्या असत्या. विठ्ठलाला अशा अडचणीत आणू नका,” असा खोचक टोला भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी कृषिमंत्री दत्ता भरणे यांना लगावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठं नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळो, असं साकडं विठ्ठलाला घालणार असल्याचं कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितलं होतं. त्यावरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला आहे.


  • 16 Jul 2026 01:15 PM (IST)

    पंढरपुरात आजपासून 3 ऑगस्टपर्यंत भाविकांसाठी 24 तास दर्शन सुरू

    आषाढी यात्रेनिमित्त आज विठ्ठलाचा पलंग काढून देवाला लोड देण्यात आला आहे. त्यानंतर आजपासून 3 ऑगस्टपर्यंत भाविकांसाठी 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. आजपासून देवाचे राजोपचार बंद राहणार असून फक्त नित्योपचार केले जातात. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते देवाला लोड देऊन विधीवत पूजा करण्यात आली. मंदिर समितीने 24 तास दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच दर्शन रांगेतील भाविकांना जलद दर्शन व्हावे यासाठी व्हीआयपी दर्शन बंद केलं आहे.

  • 16 Jul 2026 01:00 PM (IST)

    लवासा प्रकरणात शरद पवार, सुप्रिया सुळेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

    लवासा प्रकरणात शरद पवार, सुप्रिया सुळेंना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंविरोधात आरोप करणारी याचिका कोर्टाने फेटाळली आहे. एफआयआर नोंदवून चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली आहे. तसंच सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांच्या हेतूवर संशय व्यक्त केला आहे.

  • 16 Jul 2026 12:49 PM (IST)

    आमच्यासमोर कोणताच प्रस्ताव नाही- जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री भेटीवरून चंद्रकांत पाटलांच स्पष्टीकरण.

    राष्ट्रवादी शरद पवार पक्ष किंवा जयंत पाटील एनडीएत समावेश होण्याबाबतचा कोणता प्रस्ताव आला नाही,अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री पहाटे तीन पर्यंत लोकांना भेटतात, त्यामुळे रात्री का गेले, रात्रीच्या अंधारात गेले का,  या प्रश्नाला अर्थ नाही. काहीतरी सामायिक काम असतील,असे विधान चंद्रकांत पाटलांनी केलं.  जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या रात्रीच्या भेटीबद्दल ते बोलत होते.


  • 16 Jul 2026 12:37 PM (IST)

    धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हेल्मेट घालून न आलेल्या वाहनधारकांवर कारवाई

    धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पोलीस प्रशासनाच्या वतीने हेल्मेट घालून न आलेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.  विविध शासकीय कार्यालय आणि महाविद्यालयाच्या प्रवेशाच्या वेळी शहर वाहतूक शाखेने वाहनधारकांवर कारवाई केली.  विविध शासकीय कार्यालय महाविद्यालयांमध्ये येताना हेल्मेट सक्तीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश आहेत.  महामार्गावर हेल्मेट सक्ती करावी त्याचबरोबर शहरातील रस्ते दुरुस्त करावे त्यानंतर हेल्मेट सक्ती करावी वाहनधारकांनी मागणी केली आहे.

  • 16 Jul 2026 12:18 PM (IST)

    आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही – सुनिल तटकरे

    अजितदादांशी जसं ट्युनिंग होतं, तसंच ट्युनिंग सुनेत्रा वहिनींशी आहे.ज्या गोष्टी सुनेत्रा पवार यांना सांगायच्या, त्या मी सांगतो. आमच्या पक्षात कोणतेही गैरसमज नाहीत असं सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केलं.

  • 16 Jul 2026 12:07 PM (IST)

    जेजुरी दिंडी अपघातातील मृतांची संख्या आता पोहोचली 4 वर

    संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्या दरम्यान जेजुरी येथील अपघातात जखमी झालेल्या आणखी एका महिला वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 4 वर पोहोचली आहे.  दोन दिवसांपूर्वी दिंडीत ट्रकच्या अपघातात सांगली जिल्ह्यातल्या तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता आणि चार जण गंभीर जखमी होते,त्यापैकी पुण्यातील रुग्णालयामध्ये कोल्हापूर येथील शैलाच्या जगताप यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र   आज सकाळी त्यांचं निधन झालं आहे.मृत्यूची बातमी कळताच कवलापूर गावावर शोककळा पसरली.

  • 16 Jul 2026 11:57 AM (IST)

    काटेवाडी गावात पालखी सोहळ्यातील पहिले मेंढ्यांचे गोल रिंगण पडणार पार…

    जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीकरांचा निरोप घेऊन इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्कामासाठी मार्गस्थ झालाय…बारामती तालुक्यातील *काटेवाडी या ठिकाणी पालखीचा विसावा असतो त्या ठिकाणी परीट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी काटेवाडी गावात पालखी सोहळ्यातील पहिले मेंढ्यांचे गोल रिंगण पार पडणार आहे… बारामती तालुक्यातून इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे पालखी सोहळ्याचे स्वागत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे या ठिकाणी करणार आहेत.

  • 16 Jul 2026 11:47 AM (IST)

    अपर तहसीलच्या मागणीसाठी सेवली पाठोपाठ नेर ग्रामस्थांचे आमरण उपोषण

    जालना तालुक्यात मंजूर असलेल्या अपर तहसील कार्यालयासाठी नेर आणि सेवली गावांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अपर तहसीलच्या मागणीसाठी सेवली ग्रामस्थांनी उपोषण केलं या पाठोपाठ आता नेर येथे मंजूर असलेले अपर तहसील कार्यालय कार्यान्वित कराव या मागणीसाठी नेर येथील ग्रामस्थांनी गावातच आमरण उपोषण सुरू केल आहे. त्यामुळं जालना तालुक्यात मंजूर असलेले अपर तहसील कार्यालयाची मुद्यावरून वातावरण चांगलाच तापलं आहे.

  • 16 Jul 2026 11:35 AM (IST)

    विरार येथील अर्नाळा समुद्रात दोन मुले बुडाली

    अर्नाळा समुद्रात गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास दहा ते बारा वर्षाची दोन अल्पवयीन मुले जोरदार लाटांच्या तडाख्यात समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. यावेळी दोन मुलांना वाचवण्यात यश आलं तर दोन मुले समुद्राच्या लाटात बुडाली आहेत. दोन्ही मुले नालासोपारा येथील असल्याची माहिती समोर आली आहे. अर्नाळा पोलीस आणि जीव रक्षक यांच्या मदतीने बुडालेल्या मुलांचा शोध सुरू आहे.

  • 16 Jul 2026 11:25 AM (IST)

    एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्लीसाठी रवाना होणार

    ऊद्या दिल्लीतील महाराष्ट्र सदन इथे नाॅर्थ इस्टच्या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा पुढील दोन दिवस दिल्लीत मुक्काम असण्याची शक्यता आहे, एनडीएतील घटकपक्षाच्या बैठकीला ही एकनाथ शिंदे हजर राहणार आहेत. या बैठकीला राज्यातील तीन्ही प्रमुख नेते ऊपस्थित राहणार आहेत.

  • 16 Jul 2026 11:15 AM (IST)

    जळगावच्या मेहरूण तलावामध्ये केवळ 40% एवढाच पाणी साठा शिल्लक

    कडाक्याचा उन्हाळा व दुसरीकडे पावसाला झालेला उशीर यामुळे मेहरून तलावाच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. अर्ध्यापेक्षा जास्त मेहरून तलावातील जमिनीचा पृष्ठभाग उघडा पडला असून पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने जुलै महिन्यातच मेहरून तलाव शंभर टक्के भरला होता. मात्र यंदा जुलै महिना निम्मा उलटला तरी पाऊस नसल्यामुळे मेहरून तलाव कोरडाठाक पडण्याची चिन्ह आहेत…

  • 16 Jul 2026 11:03 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट जाहीर

    सोलापूर जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय. मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झालाय. मात्र काल सायंकाळी काही तालुक्यात पाऊस झाल्याने बळीराजा काहीसा सुखावलायय पावसाअभावी जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यात केवळ 20 ते 21 टक्केच पेरण्या झाल्यात, त्यातच हवामान विभागाने आज पावसाचा यलो अलर्ट जाहीर केल्याने शेतकरी आनंदी झालाय. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असले तरी अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही.

  • 16 Jul 2026 10:50 AM (IST)

    वांगचूक सारख्या माणासाला सरकार ओळखू शकलं नाही – अंजली दमानिया

    सोनम वांगचूक यांची तब्येत दिवसेंदिवस खालावू लागली आहे. त्यानंतर विरोधी पक्षातील नेते सरकारवर टीका करत आहे. वांगचूक यांच्या उपोषणावरून अंजली दमानिया यांनी सरकारवर टीका केली आहे. वांगचूक सारख्या माणासाला सरकार ओळखू शकलं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

  • 16 Jul 2026 10:34 AM (IST)

    एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्लीला जाणार

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुरुवारी पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. या दिल्लीत दौऱ्यात भाजच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यांना दोन दिवस दिल्लीत मुक्काम राहणार आहे.

  • 16 Jul 2026 10:20 AM (IST)

    संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं होणार काटेवाडीत स्वागत

    संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काटेवाडीत स्वागत होणार आहे. तर परीट समाजाकडून पालखीसाठी धोतराच्या पायघड्या जाणार आहेत. तर दुपारी मेंढ्यांचे गोल रिंगण होणार आहे. पालखीचं काटेवाडीत आगमन व्हायला देखील सुरुवात झाली आहे.

  • 16 Jul 2026 10:10 AM (IST)

    मुख्यमंत्री फडणवीसांना रामरक्षा आंदोलनात पठणाचं आंमत्रण – संजय राऊत

    संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी रामभक्त म्हणून आंदोलनाला यावं. रामभक्त म्हणून फडणवीसांना आंदोलनात सहभागी व्हाव. हिंदूत्ववादी संघटनांनाही आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे’.

  • 16 Jul 2026 09:50 AM (IST)

    शेतीच्या वादातून पुतण्याने केली चुलत्याची हत्या, लातूर येथील धक्कादायक प्रकार

    लातूर जिल्ह्यातल्या हरीजवळगा इथं शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. राजेंद्र चव्हाण ( वय 60) अस हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीची वाटणी कमी जास्त आल्याच्या वादातून डोक्यात दगड घालून ही हत्या करण्यात आली आहे. आरोपी मुरली चव्हाण याला कासार शिरशी पोलिसांनी अटक केली आहे.

  • 16 Jul 2026 09:40 AM (IST)

    अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी त्यांच्या घरावरच लावला शरद पवारांचा फोटो असलेले पक्षाचे बॅनर..

    जळगावात अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी त्यांच्या घरावरच लावला शरद पवारांचा फोटो असलेले पक्षाचे बॅनर.. जळगावात गणेश कॉलनी येथील निवासस्थानी जिल्हाध्यक्षांनी लावलेल्या अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाच्या बॅनर वर शरद पवारांचा फोटो झळकला आहे.. या बॅनरवर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल खासदार पार्थ पवार याचे देखील फोटो आहेत..

  • 16 Jul 2026 09:30 AM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यातील १५१ कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश

    सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमता नसल्याच्या ८३२ तक्रारी. जिल्हाधिकाऱ्यांनी कंपन्यांना धरले जबाबदार. १५१ कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिले असून, तर ३८ परवाने निलंबित केले आहेत. १५ परवाने कायमस्वरूपी रद्द केले तर आठ प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई करण्यात आली आहेत

     

  • 16 Jul 2026 09:20 AM (IST)

    वसई विरार मधील महापूरानंतर महावितरणचा प्राथमिक कृती आराखडा तयार

    नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी वीजवाहक तारा भूमिगत करण्यासाठी पाचूबंदर, अर्नाळा, आगाशी, वटार, विरार आणि नालासोपारा या किनारपट्टी भागांचे सर्वेक्षण करून वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम पूर्ण करण्यासाठी महावितरण च्या हालचाली सुरू. नैसर्गिक आपत्ती सौम्यीकरण योजनेअंतर्गत शासनाने २११ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर केले असून, या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती

  • 16 Jul 2026 09:16 AM (IST)

    एल निनोच्या संकटाला सर्वांनाच सामोरे जावे लागतंय- दत्ता भरणे

    कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकताच मोठी माहिती सांगितली. दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यात काही भागात जास्त तर काही भागात कमी पाऊस झाला. खरीपाची 70% पेरणी पूर्ण झाली असून, अद्याप 30% पेरणी खोळंबलेली आहे. एल निनोच्या संकटाला सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस चांगला पाऊस होईल

  • 16 Jul 2026 09:05 AM (IST)

    दिल्लीत सर्व खासदारांची एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यासोबत झाली सकारात्मक बैठक

    अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत मंत्रीपदाबाबतही सहा खासदारांची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेतून आपल्या पक्षात आलेल्या सहा खासदारांचा योग्य तो सन्मान होणार , विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी दिली ग्वाही. एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाल्याने पुन्हा आमपरेशन टायगर सक्रिय होण्याची चर्चा सुरू…

  • 16 Jul 2026 08:57 AM (IST)

    तरुणाचे केस कापून अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली

    नालासोपा-यात एका तरुणाचे केस कापून एका टोळक्याने भर रस्त्यात अर्धनग्न अवस्थेत तरुणाची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तरुणाने एका महिलेची छेड काढल्याने त्याची धिंड काढल्याचा आरोप करण्यात येत आहे. अर्धनग्न अवस्थेत तरुण भर रस्त्यातून चालताना, त्याच्या मागे मोटरसायकल वर एक टोळक असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

  • 16 Jul 2026 08:51 AM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यातील 151 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश

    यवतमाळ जिल्ह्यातील 151 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश. सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता नसल्याच्या 832 तक्रारी मिळाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कंपन्यांना धरले जबाबदार. 151 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिले असून 38 परवाने निलंबित केले आहेत. 15 परवाने कायमस्वरूपी रद्द केले. आठ प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांची धडक कारवाई.

  • 16 Jul 2026 08:42 AM (IST)

    कल्याण -आंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान गँगची पुन्हा दहशत!

    धावत्या एक्सप्रेसमधील प्रवाशाच्या हातावर काठीने फटका मारून 30 हजारांचा मोबाईल केला लंपास. कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू. कल्याण -आंबिवली दरम्यान फटका गँग पुन्हा सक्रिय झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण.

  • 16 Jul 2026 08:26 AM (IST)

    खरीप हंगामातील धान पिकाची नर्सरी (पर्हे) धोक्यात

    गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील धान पिकाची नर्सरी (पर्हे) धोक्यात आली आहे. पाऊस नसल्याने कोवळी रोपे सुकू लागली असून, ही रोपे वाचवण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत आहेत. अशाच एका भागात, पाणी उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्याला दूरवरून बादलीची कावड बनवून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.

  • 16 Jul 2026 08:07 AM (IST)

    मध्य रेल्वेकडून विशेष वाहतूक ब्लॉक

    मध्य रेल्वेने मशीद -सँडहर्स्ट रोड दरम्यान स्लीपर बदलण्याच्या कामासाठी 16 जुलैपासून 19 जुलैपर्यंत चार मध्यरात्री सीएसएमटी-वडाळा रोड दरम्यान विशेष वाहतूक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज रात्री १.१५ ते पहाटे ४.१५ या वेळेत हा ब्लॉक असेल. या काळात हार्बर मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येणार असून काही लोकल वडाळा रोडपर्यंतच धावतील.

  • 16 Jul 2026 08:05 AM (IST)

    मुंबईत केवळ ढगांची दाटी

    मुंबई शहरात आणि उपनगरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. अवघ्या चार-पाच दिवसांत मुंबईत जुलैच्या सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह उत्तर कोकण प्रदेशात विश्रांती घेतली असून आषाढ महिना सुरू झाला तरीही केवळ ढगांची दाटी दिसून येत आहे

  • 16 Jul 2026 08:04 AM (IST)

    गावातील विहिरीत आढळली चक्क मगर

    सोलापूरच्या कोरवली गावातील विहिरीत चक्क मगर आढळली. संभाजी जमदाडे या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत मोठी मगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सोलापूर वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून या मगरीला ताब्यात घेतले. शेतातील विद्युत पंप बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीच्या कडेला ही मगर दिसली. दरम्यान वन विभागाने त्या मगरीला पडकून नैसर्गिक अधिवासात सोडले.

  • 16 Jul 2026 08:03 AM (IST)

    जळगावमध्ये 30 वर्षीय विवाहितेचं मुलासह अपहरण करून तिच्यावर अत्याचार

    जळगावच्या अमळनेर तालुक्यात 30 वर्षीय विवाहितेचं मुलासह अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी सुदाम भगवान भिल्ल याला अटक करण्यात आली आहे. सोन्याचे दागिने करण्यासाठी पैसे देतो, असं आमिष दाखवून 30 वर्षीय विवाहितेचं तिच्या मुलासह अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे.

मागच्या काही दिवसांपासून गायब असलेला पाऊस पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करु शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 20 जुलैपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळू शकतो. आज काही भागात पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे. दरम्यान यंदा पावसाला उशिराने सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराज चिंतेत आहे. काही भागात पेरण्या रखडल्या आहेत. दरम्यान मुंबईत लोकांना उकाड्याचा अनुभव येत आहे. मुंबई शहरात आणि उपनगरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. अवघ्या चार-पाच दिवसांत मुंबईत जुलैच्या सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह उत्तर कोकण प्रदेशात विश्रांती घेतली असून आषाढ महिना सुरू झाला तरीही केवळ ढगांची दाटी दिसून येत आहे.

Follow Us