AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : पिस्तुलाने धमकावत पोलीस उपनिरीक्षकाचा लग्नाला नकार

| Edited By: | Updated on: May 27, 2026 | 9:16 AM
Share

Maharashtra News LIVE : राज्यात राजकीय घडामोडींना वेग येत आहे. महायुतीत जागावाटपावरून पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. कांद्या प्रश्नात शेतकरी आक्रमक झाली आहेत.

Maharashtra News LIVE : पिस्तुलाने धमकावत  पोलीस उपनिरीक्षकाचा लग्नाला नकार
Maharashtra News

LIVE NEWS & UPDATES

  • 27 May 2026 09:16 AM (IST)

    पिस्तुलाने धमकावत पोलीस उपनिरीक्षकाचा लग्नाला नकार

    बीडमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर याने विवाहाला 11 दिवस राहिलेले असताना तुमची मुलगी मला शोभत नाही म्हणत, पिस्तुलने धमकावले आणि लग्नाला नकार दिला. या प्रकरणात चकलांबा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस उपनिरीक्षकाच्या बाजूने देखील तक्रार देण्यात आली आहे.

  • 27 May 2026 08:50 AM (IST)

    कुंभकामांचा दर्जा तपासणार मुंबईची आयआयटी

    कुंभमेळ्यातील कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी बाह्ययंत्रणेद्वारे विषय तज्ज्ञ, सल्लागार यांची नेमणूक करण्याचा निर्णय. प्रामुख्याने गुणवत्ता नियंत्रण सल्लागार, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, विधी सल्लागार यांची नेमणूक केली जाणार. त्याचप्रमाणे ‘आयआयटी मुंबई’ ही त्रयस्थ गुणवत्ता तपासणी संस्था म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय. कुंभमेळा प्राधिकरण ही सेवा दोन वर्षासाठी घेणार असून त्यासाठी ४ कोटी ७४ लाखांच्या खर्चाला मान्यता

  • 27 May 2026 08:40 AM (IST)

    बेकायदा बांधकामामुळे ठाण्यातील 14 ठिकाणी पाणी तुंबणार!

    ठाणे शहरातील नौपाडा प्रभाग समिती मध्ये सर्वाधिक फटका.महापालिकेच्या सर्वेक्षणात बाब उघड. नौपाडा, उथळ सर माजीवाडा मानपाडा कळवा दिवा आणि लोकमान्य नगर प्रभाग समिती या भागात पाणी तुंबण्याची शक्यता….

  • 27 May 2026 08:30 AM (IST)

    विधान परिषदेच्या सहा जागांसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरू

    शिवसेनेला पाच जागा मिळाव्यात आणि सहावी जागा छत्रपती संभाजी नगर किंवा रायगड ही मेरिटच्या आधारे जिल्ह्यातील राजकीय बलाबल पाहता मिळावी अशी मागणी. ठाणे-पालघर – रविंद्र पाठव नाव जवळपास निश्चित हिंगोली परभणी – अभिमन्यु खोतकर किंवा बिप्लव बजोरीया, छत्रपती संभाजी नगर – राजेंद्र जंजाळ किंवा बाजीराव चव्हाण, नाशिक – हेमंत गोडसे, सईद खान, भाऊसाहेब चौधरी, रायगड – विकास गोगावले , भरत गोगावले यांचे सुपुत्र जळगाव – प्रतापराव पाटील , गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र

  • 27 May 2026 08:25 AM (IST)

    नाशिक विधानपरिषद जागेवर आता राष्ट्रवादीचाही दावा

    नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच तीव्र. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही दावा ठोकला. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत नाशिक जागेचा फैसला होण्याची शक्यता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अॅड. शिवाजी सहाणे चर्चेत. जागावाटपावरून महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

  • 27 May 2026 08:20 AM (IST)

    नाशिक शहरातील तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

    कायदा व सुव्यवस्था तसेच प्रशासकीय निकडीच्या पार्श्वभूमीवर तीन पोलिस निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्या व नियुक्तीचे आदेश. आडगाव मुंबई नाका देवळाली आणि सायबर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या अंतर्गत बदल्या बदल्या व नियुक्तीचे आदेश पोलिस आयुक्तालयाकडून जारी

  • 27 May 2026 08:15 AM (IST)

    नाशिकमधील NH-60 वरील द्वारका सर्कल ते दत्त मंदिर चौक मार्गाच्या 6-पदरीकरणाला मंजुरी

    द्वारका ते नाशिक रोड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार. केंद्राकडून २२१.५२ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी. द्वारका सर्कल – उपनगर नाका – दत्त मंदिर चौक मार्गाचा होणार विस्तार. मुख्य मार्गासह दोन्ही बाजूंना २-पदरी सर्विस रोडची उभारणी. वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ घटवण्यावर भर. रस्ते सुरक्षेसह वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत करण्याचे उद्दिष्ट. २०२७ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता महत्वाचा. स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत दिली माहिती

  • 27 May 2026 08:14 AM (IST)

    नाफेडकडून आठ दिवसांत केवळ 50 टन कांदा खरेदी, शेतकऱ्यांची खरेदी केंद्रांकडे पाठ

    सरकारने 1580 रुपये दर जाहीर केला तरी बाजार समित्यांमध्ये 1800 रुपयांपर्यंत भाव. जिल्ह्यातील 18 खरेदी केंद्रांवर अत्यल्प प्रतिसाद, अनेक केंद्रांवर शुकशुकाट. कमी दर, जनजागृतीचा अभाव आणि खरेदी केंद्रांवरील गैरसोयीमुळे शेतकरी नाराज. नाफेड आणि NCCFच्या खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक आहेत, काल त्याबाबत अत्यंत मोठे आंदोलन झाले. दिल्लीत बैठकी झाली. हवामानात बदल होत असून विदर्भातील तीन शहरांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. IMD कडून मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला. महायुतीत जागावाटपावरून पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर लढण्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जुना तिढा सोडवण्यासाठी फॉर्म्युला तयार केल्याची माहिती. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची शक्यता. खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - May 27,2026 8:13 AM

Follow Us
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.