Maharashtra News LIVE : जरांगे पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रसाद लाड यांच्या भेटीची शक्यता
Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून, त्यांची प्रसाद लाड भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांची प्रकृती देखली खालावली असून बीपी आणि शुगर कमी झाली असून त्यांना उपचाराची आवश्यकता आहे. यासह राज्य, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES
-
देवरी तालुक्यात बांधकामाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा मृत्यू, तीन गंभीर जखमी….
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून भीषण अपघात झाला आहे…. ग्रामपंचायत गोटाबळी अंतर्गत येणाऱ्या भागी गावात घडलेल्या या दुर्घटनेत चार मजूर स्लॅबखाली दबले. यामध्ये एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत…. भागी गावातील अनिल बीसेन यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. हे काम ठेकेदाराला स्क्वेअर फुटाच्या हिशोबाने देण्यात आले होते…. ठेकेदाराने मजूर लावून बांधकामाला सुरुवात केली होती. दरम्यान, स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना स्लॅबचा आधार असलेल्या बल्ली खचल्याने संपूर्ण स्लॅब अचानक खाली कोसळला. यावेळी काम करणारे चार मजूर स्लॅबखाली दबले…. या दुर्घटनेत दिनेश नाईक, वय 38 वर्षे, रा. सालेगाव, ग्रामपंचायत मुल्ला, तालुका देवरी, यांचा मृत्यू झाला. तर तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत…. जखमी मजुरांना तातडीने देवरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे…. ठेकेदाराच्या कामातील कथित हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप मजुरांकडून केला जात आहे…. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे…. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, तसेच स्लॅबला योग्य आधार देण्यात आला होता का, याबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत…..
-
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात रात्री ९ वाजता देखील विद्यार्थ्यांची मोठी गर्दी…
मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर रात्री ९ वाजता सिंहगड इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये कॉलेज शाखेचे भव्य उद्घाटन हजारोंच्या उपस्थितीत पार पडले. रात्री उशिरापर्यंतही विद्यार्थ्यांची तोबा गर्दी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद कायम पाहवयास मिळालाय…
-
-
पुण्यातील ससून रुग्णालयात आयसीयू खाटासाठी आधी नोंदणी करण्याचा हॉस्पिटल प्रशासनाचा निर्णय
पुण्यातील ससून रुग्णालयात आयसीयू खाटासाठी आधी नोंदणी करण्याचा हॉस्पिटल प्रशासनाने निर्णय घेतला आहे. अतिदक्षता विभागात(आयसीयू)खाट न मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ आणि त्यातून डॉक्टरांशी होणारे वाट टाळण्यासाठी ससून रुग्णालय प्रशासनाने निर्णय घेतला आहे. आयसीयु खाटाची गरज असल्यास रुग्णांच्या नातेवाईकांनी आधी ससून रुग्णांशी संपर्क साधून नोंदणी करावी: रुग्णालय प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. आयसीयु खाटाची नोंदणी करण्यासाठी ससून रुग्णालयाकडून 9225330535 हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
-
कळवा रुग्णालयातील जेवणात सापडले झुरळ, मनसेने उघड केला पालिकेचा भोंगळ कारभार
ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा एकदा गंभीर निष्काळजीपणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाला देण्यात आलेल्या रात्रीच्या जेवणात चक्क झुरळ आढळल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि पदाधिकाऱ्यांनी हा धक्कादायक प्रकार प्रत्यक्ष उघडकीस आणला असून, यामुळे रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
-
पुणे शहरात खुनाच्या घटनांमध्ये वाढ
पुणे शहरात खुनाच्या घटनांमध्ये वाढ करण्यात आली आहे. शहरात आठ महिन्यात 61 खून आणि 82 खुनाचे प्रयत्न करण्यात आले. पुण्यातील विविध गुन्ह्यांची आकडेवारी पुणे पोलिसांकडून समोर आणण्यात आली. गुन्हेगारीचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी उपयोजना सुरू असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली आहे.
-
-
वीज बिलामुळे बंद असलेली शिराळा उपसा सिंचन योजना पुन्हा होणार सुरू
अनेक दिवसापासून थकीत वीज बिलासाठी बंद असलेली परंडा तालुक्यातील शिराळा उपसा सिंचन योजना आमदार तानाजी सावंत यांच्या मदतीने पुन्हा एकदा सुरू होणार आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या 22 दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्याची खरीप पिके करपू लागली आहेत, मात्र शिराळा सिंचन योजना परिसरातील शेतकऱ्यांना थकीत वीजबिला अभावी पिकाला पाणी देता येत नव्हते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते.
-
शिरूर शहरात मोकाट वळूंची दहशत; भाजी बाजारात पिठाच्या गिरणीत घुसले वळू, नागरिक भयभीत
शिरूर शहरात मोकाट वळूंची दहशत वाढली आहे भाजी बाजारात पिठाच्या गिरणीत वळू घुसल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिक भयभीत झाली आहेत मोकाट वळवून चा बंदोबस्त करावा अशी मागणी शिरूर शहरातील नागरिकांमधून होत आहे एखाद्याचा जीव गेल्यावर शिरूर नगरपरिषद जागी होणार का? असावा लई संतप्त नागरिकांनी केला आहे.
-
-
पुण्यात सीएनजीचे दर शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर
पुण्यात सीएनजीचे दर शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीनंतर सीएनजी दरात देखील मोठी वाढ होत आहे. पुण्यात सीएनजी दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ झाली आहे. पुण्यात मध्यरात्रीपासून सीएनजीला किलोमागे 97 रुपये 75 पैसे किमत लागू करण्यात आली आहे. सीएनजी वाहन चालकांना आता दोन रुपयांचा करावा लागणार भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. तर आज त्यांची भेट प्रसाद लाड घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारपर्यंत आमदार प्रसाद लाड भेट घेण्याची शक्यता आहे. भेटीदरम्यान मागण्यांबाबतीत काही तोडगा निघाला की नाही हे स्पष्ट होणार आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल देखील मोठी माहिती समोर येत आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. वैद्यकीय पथकाला तपासणी करण्यास दोनदा नकार दिला. बीपी आणि शुगर कमी झाली असून त्यांना उपचाराची आवश्यकता आहे. तर, पुण्यातील गणेशोत्सवातील तीन वर्षातील आवाजाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. डीजेच्या 2023 ते 25 पर्यंत सर्वच आवाजाची नोंद 100 डिसिबलच्या वर झाली आहे. याच कारणामुळे आता डीजे मुक्त गणेश उत्सवाच्या मागणीसाठी यंदा पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे, राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे निमंत्रण दिले जाणार. पंतप्रधान राष्ट्रपती देश पातळीवरील मंत्री नेते उपस्थित असणार असल्याने राहुल गांधी यांना देखील निमंत्रण दिलं जाणार आहे… यासह राज्य, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Sep 01,2026 8:06 AM
