Maharashtra News LIVE : कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरण, तीन तरुण नाशिक पोलिसांच्या ताब्यात

Maharashtra News LIVE Updates : नाशिक पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये भूकंप झाला असून,  3.4 रिश्टल स्केल एवढ्या या भूकंपाची नोंद झाली आहे.

Maharashtra News LIVE : कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरण, तीन तरुण नाशिक पोलिसांच्या ताब्यात
maharashtra news live updates
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Aug 14, 2026 | 11:38 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 14 Aug 2026 11:38 AM (IST)

    पुढील राजकारण जेन-झी भोवती फिरणार – राज ठाकरे

    राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंची पुण्यात बैठक झाली. या बैठकीत ठाकरेंनी पदाधिकऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. ‘जेन-झी कडे फोकस करा. च्यांच्याशी संपर्क वाढवा. पुढील राजकारण जेन-झी भोवती फिरणार आहे. ते वेगळ्या पद्धतीने विचार करत आहेत, असे राज ठाकरेंनी सांगितले.

  • 14 Aug 2026 11:20 AM (IST)

    पदवीधर निवडणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्षांचा सभांचा धडाका

    चंद्रपुर , गोंदिया , भंडारा इथे पदवीधर निवडणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविद्र चव्हाण यांच्याकडून प्रचार आणि सभांचा धडाका सुरू आहे. दोन दिवसीय दौऱ्यात नागपूर ग्रामीण (रामटेक), चंद्रपूर महानगर आणि ग्रामीण, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर महानगर, काटोल आणि वर्धा या ठिकाणी संघटनात्मक जिल्ह्यांच्या बैठकात पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. त्यांनी नागपूर पदवीधर निवडणूक जिंकण्याचा प्रदेश भाजपचा दावा केला आहे.


  • 14 Aug 2026 11:06 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौऱ्यावर

    राज्यातील पहिल्या रेशीम कोष बाजारपेठेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.  जालना शहरालगत  रेशीम कोष बाजारपेठ असणार आहे. यामुळे रेशीम कोष उत्पादन घेणाऱ्या शेतकरी बांधवाना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • 14 Aug 2026 10:50 AM (IST)

    परभणी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

    गर्भवती महिला मूर्ती प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमवार यांना निलंबित केल्याप्रकरणी कामाचाऱ्यांचं काम बंद आंदोलन.जोपर्यंत डॉ. नागेश लखमवार यांना सेवेत रुजू केले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार.आंदोलकांचा इशारा..

  • 14 Aug 2026 10:40 AM (IST)

    गडचिरोली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या गडचिरोली जिल्ह्यात आज दौरा

    जिल्ह्यातील जपतलाई आश्रम शाळेत आज राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे_शाळेला देणार भेट. येथील शिक्षक व प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांकडून घेणार जपतलाई आश्रम शाळेतील सर्पदंश प्रकरणाच्या


  • 14 Aug 2026 10:30 AM (IST)

    बार्शी तालुक्याच्या सिंचनासाठी मंत्रालयात मंत्री विखे पाटलांसोबत निर्णायक बैठक

    बार्शी तालुक्यातील 21 वंचित गावांना बचत पाण्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा. आमदार राजेंद्र राऊतांच्या पाठपुराव्याला अखेर यश. सहा लघु प्रकल्प बंदिस्त पाइपलाइनमध्ये रूपांतरित करण्यासाठी सर्वेक्षणासंदर्भात सकारात्मक चर्चा. या बैठकीला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे एमडी, मुख्य अभियंता तसेच जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  • 14 Aug 2026 10:20 AM (IST)

    डोंबिवलीत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी रचला जाणार इतिहास!

    ३५ हजार चौरस फुटांच्या तिरंग्यासह १५ हजार विद्यार्थी, २५ हजार नागरिक आणि १५० हून अधिक संस्थ घडवणार नवा विश्वविक्रम!घारडा सर्कल ते दत्तनगरपर्यंत तिरंगा रॅली; १५० फूट उंच ध्वजस्तंभावर ध्वजारोहणाने समारोप

     

  • 14 Aug 2026 10:10 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित तिरंगा यात्रा

    भाजपाच्या वतीने तिरंगा यात्रेनिमित्त शहरातील चौका चौकात जोरदार बॅनरबाजी. काही बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो तर काही बॅनरवर फक्त भाजपांच्या नेत्याचे फोटो. दुपारी दोन वाजता संभाजी पेठ ते क्रांती चौक अशी निघणार तिरंगा यात्रा.

  • 14 Aug 2026 09:51 AM (IST)

    हरसिमरत कौर श्री सचखंड गुरुद्वारा येथील अखंडपाठ कार्यक्रमाला उपस्थित

    माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार हरसिमरत कौर श्री सचखंड गुरुद्वारा येथील अखंडपाठ कार्यक्रमात झाल्या सहभागी. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंघ बादल कुटुंबासोबत नांदेडला गुरुद्वारा दर्शनासाठी आले होते. काल माता साहिब गुरुद्वारा येथून दर्शन घेऊन परतताना त्यांच्यावर हल्ला झाला. सध्या सुखबीर सिंघ बादल रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान बादल कुटुंबीयांनी नांदेडच्या गुरुद्वार येथे अखंडपाठ आयोजित केला होता. आज अखंडपाठची समाप्ती आहे. स्वतः सुखबीर सिंघ बादल यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर उपस्थित आहेत. हरसिमरत कौर बादल आणि त्यांची मुलगी गुरुद्वारात अखंडपाठ समाप्ती कार्यक्रमाला उपस्थित झाल्या आहेत.

  • 14 Aug 2026 09:35 AM (IST)

    कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरण, तीन तरुण नाशिक पोलिसांच्या ताब्यात

    कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी जळगावच्या जामनेर शहरातील आणखी तीन तरुण नाशिक पोलिसांच्या ताब्यात. तीन तरुणांना जामनेर मधून ताब्यात घेत पोलिसांनी सहा ते सात जणांची चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. याप्रकरणात जामनेर शहरातील आणखी काही तरूण नाशिक पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती. यापूर्वी अटकेतील तसेच ताब्यात घेतलेल्या संशयितांची घरांचीही नाशिक पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली.

  • 14 Aug 2026 09:25 AM (IST)

    एअरपोर्ट टेंडरचे आमिष दाखवून 28 लाख 95 हजाराचा गंडा

    एअरपोर्ट टेंडरचे आमिष दाखवून 28 लाख 95 हजाराचा गंडा. अहमदाबाद विमानतळावर मोठे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवत पेट्रोल पंप चालकाची फसवणूक. फोनवरून विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संबंध असल्याचा दावा करत आरोपीने मिळवला विश्वास. टेंडर प्रक्रियेच्या नावाखाली घेतले पैसे; टेंडर न मिळाल्याने आरोपीने संपर्क टाळला. प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पोलिसांकडून पुढील तपास सुरू.

  • 14 Aug 2026 09:20 AM (IST)

    श्रावण सोमवारी घृष्णेश्वर मंदिरात VIP दर्शन बंद

    श्रावण सोमवारी घृष्णेश्वर मंदिरात VIP दर्शन बंद. भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय. श्रावणातील प्रत्येक सोमवारी VIP दर्शनासह अभिषेक आणि महापूजा बंद. सामान्य भाविकांना जलद दर्शन मिळावे, हा प्रशासनाचा उद्देश. वेरूळच्या स्थानिक भाविकांसाठी पहाटे 4 ते सकाळी 8 विशेष दर्शनाची व्यवस्था, विशेष दर्शनासाठी आधार ओळखपत्र आवश्यक.

  • 14 Aug 2026 08:24 AM (IST)

    Maharashtra News LIVE : नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं

    मोठी बातमी समोर येत आहे, नाशिक पुन्हा एकदा भूकपांच्या धक्क्याने हादरलं असून,  3.4 रिश्टल स्केल एवढ्या या भूकंपाची नोंद झाली आहे, या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सुरगाणा तालुक्यात पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

नाशिकमध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.  3.4 रिश्टल स्केल एवढ्या या भूकंपाची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे आज पुण्यात ओबीसी समाजाची निर्णयाक बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून, आज पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. घटामाथ्यासह, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यात आहे.  यासह राज्यातील, देश-विदेशातील, क्रीडा-मनोरंजन क्षेत्रातील आणि इतरही बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us