Maharashtra News LIVE : सरसंघचालक मोहन भागवत यांचा मुंबई GEN Z सोबत संवाद
Maharashtra News LIVE : आजही सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ठाकरेगटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला.

कल्याण-डोंबिवलीत युतीत ‘पक्षांतर वॉर’ सुरु आहे. शिवसेनेला भाजपचा मोठा धक्का. ठाकुर्लीत शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश. युती धर्म कोणी पाळला नाही हे नंतर ठरवू. मात्र आम्ही एक नेले तर चार आणू भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा शिवसेनेला इशारा. एका आठवड्यात तिसऱ्यांदा भाजपने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश केल्याने युतीतील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पुन्हा जोरदार पावसाचा इशारा. हवामान विभागाचा नाशिकच्या घाटमाथ्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज. गेल्या 2 दिवसापासून पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांमधील पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी. गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्ग काल सकाळपासून कमी करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश धरणांतील पाणीसाठा 90 टक्क्यांच्या पुढे.
LIVE NEWS & UPDATES
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. अमित शाह यांच्या हस्ते एनयुसीएफडीसीच्या निवनिर्मिती कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे.
-
मनोज जरांगे पाटलांचा गैरसमज दूर होईल- एकनाथ शिंदे
मनोज जरांगे पाटील यांचा गैरसमज दूर होईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. कुणबी प्रमाणपत्रही आमच्या काळात मिळणं सुरू झालं आहे. कोणच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
-
-
जेन झी आणि अल्फा ही सर्वात प्रामाणिक पिढी- भागवत
आताची जेन झी आणि अल्फा ही सर्वात प्रामाणिक पिढी असल्याचं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. डोळे बंद करून जेन झीवर विश्वास ठेवू शकतो, असं भागवत यांनी सांगितलं.
-
सरसंघचालक मोहन भागवत यांचा मुंबई GEN Z सोबत संवाद
राष्ट्रीय स्वंयसेवक सरसंघाचालक मोहन भागवत यांनी जेन झी सोबत मुंबईत संवाद झाला. कार्यक्रमात 15 ते 19 वयोगटातील तरूणांचा समावेश आहे. लोकशाहीत संवाद खूप महत्त्वाचा आहे, असं भागवत यांनी सांगितलं. आंदोलन योग्य नव्हतं असं मी म्हणणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
-
भाजपाच्या विजय चौधरीचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात
भाजपाच्या विजय चौधरी यांचा मुलगा मंदार पोलिसांच्या ताब्यात आहे. विजय चौधरीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिना गावितांबाबत अश्लील वक्तव्य केल्याने गुन्हा दाखल आहे. पण गेल्या काही दिवसांपासून फरार असल्याने त्याच्या माहितीसाठी त्यांच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे.
-
विक्रोळीत पहाटे कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड
विक्रोळीत कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड झाल्याने खळबळ उडाली आहे. मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून चाकू हल्ला करण्यात आला. बाप लेकाचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
-
सीजेपी देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ मोहीम राबवणार
कॉकरोज जनता पार्टी देशभरात क्या बोलती पब्लिक ही मोहीम राबवणार आहे. याबाबतची माहिती अभिजीत दिपके यांनी दिली. सप्टेंबर महिन्यापासून ही मोहीम सुरू केली जाईल. बेरोजगारी हा मुद्दा आघाडीवर असेल.
-
मेटाची जागतिक टीम आणखी काही दिवस भारतात राहणार
सरकारी सूत्रांनुसार, मेटाची जागतिक टीम आणखी काही दिवस भारतात राहणार आहे. आणखी तीन ते चार बैठका होण्याची शक्यता आहे. चर्चेच्या पुढील फेरीत व्हॉट्सॲपशी संबंधित मुद्द्यांवरही चर्चा केली जाईल. मेटाचे प्लॅटफॉर्म भारतीय कायद्यांचे पालन करत आहेत की नाही, हे ठरवणे हा या बैठकांचा मुख्य उद्देश आहे.
-
नांदेड शहरात पुन्हा रस्ता खचला, 4 फूट खड्डा पडला
शहरातील नंदिग्राम सोसायटी परिसरातील श्रीकृष्ण चौकात रस्ता खचला असून दीड वर्षांपूर्वीच हा रस्ता तयार केला होता. नांदेड शहरातील रस्ता खचण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एनएसबी कॉलेज समोरील खड्यात कार शिरली होती. राष्ट्रीय महामार्गाचा विष्णुपुरी येथील उड्डाणं पुलाचा भागही कोसळला होता.
-
शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
बीडच्या गेवराई तालुक्यातील शृंगारवाडी येथील बालनंदनवन इंग्लिश स्कूलमध्ये असलेल्या जिल्हा परिषद अंतर्गत वसतिगृहात दहा वर्षाच्या विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
-
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान हवेत गोळीबार, बोरिवली पोलिसांनी केला गुन्हा दाखल
मुंबईतील बोरिवलीच्या गोराई भागात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आकाश गुप्ता नावाच्या मुलाचा वाढदिवस होता आणि तिथे हवेत गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
-
धनुष्यबाण आणि शिवसेना आमचीच – भरत गोगावले
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावर बोलचाना शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले की, ‘सर्व कायदेशीर बाबी आणि निकाल शिंदे साहेबांच्या म्हणजेच आमच्या बाजूनेच लागेल. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह आमचेच आहे आणि राहील.
-
कपिल सिब्बलांचा युक्तिवाद म्हणजे ब्रम्हवाक्य नव्हे – नरेश म्हस्के
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात पार पडली. यावर बोलताना शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले की, ‘शेवटी ते (सिब्बल) वकील आहेत. त्यांनी त्यांची बाजू मांडली. कपिल सिब्बलांची बाजू म्हणजे ब्रम्हवाक्य नव्हे. कपिल सिब्बल ठाकरे गटाचे वकील आहे ते आमच्या विरोधाताच बोलणारच. न्यायमुर्ती निर्णय देतील. कपिल सिब्ब्ल जो काही युक्तीवाद करतात तो ठाकरे गटाचे वकील म्हणून करतात. कपिल सिब्बल म्हणजे न्यायमुर्ती नव्हे.
-
निवडणूक आयोगाची चूक उजेडात आणली – अनिल देसाई
आज झालेल्या सुनावणीनंतर ठाकरे गटाने नेते अनिल देसाई यांनी म्हटले की, ‘निवडणूक आयोगाची चूक उजेडात आणली, पक्ष आणि चिन्हाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आधी देणे गरजेचे होते. तसेच 10 व्या सूचीनुसार आमदारांना अपात्र करणे गरजेचे होते. कारण अपात्रता झाली असती तर चिन्हावर परिणाम झाला असता’
-
ज्या घटनेवर आमदार, मंत्री झालात ती घटना कशी नाकारु शकता?
ज्या घटनेवर आमदार, मंत्री झालात ती घटना कशी नाकारु शकता? असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील आजची सुनावणी संपली. सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.
-
सत्तेत असलेले लोक चुंबकासारखे असतात – कपिल सिब्बल
सत्तेत असलेले लोक चुंबकासारखे असतात. सत्ता लोकांना आकर्षित करते. त्यामुळेच 31 जणांची संख्या 39 झाली आणि अखेरीस 39 जणांची संख्या 56 झाली. जर अपात्रतेची कार्यवाही अशा प्रकारे प्रलंबित ठेवली गेली, तर त्याचा अपरिहार्य परिणाम हाच होतो. दुसऱ्या एखाद्या प्रकरणात मला ही प्रक्रिया मूलभूतदृष्ट्या सदोष असल्याचा युक्तिवाद मांडण्याची आशा आहे असं सिब्बल म्हणाले.
-
विधिमंडळ पक्ष खरा की राजकीय पक्ष खरा यावर कोर्टात युक्तीवाद
विधिमंडळ पक्ष खरा की राजकीय पक्ष खरा यावर कोर्टात युक्तीवाद सुरु आहे. विधिमंडळ पक्ष हा संपूर्ण राजकीय पक्ष होऊ शकत नाही असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला. विधिमंडळातील नेमणूका या राजकीय पक्षाच्या नेत्याकडून केल्या जातात असं सिब्बल यांनी सांगितलं.
-
2018 सालच्या पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगाकडून प्रश्नचिन्ह
2018 सालची पक्षाची मूळ घटना आहे. त्यावर निवडणूक आयोगाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं. ती घटना कशी बरोबर आहे, तो मुद्दा कपिल सिब्बल यांनी वारंवार कोर्टासमोर मांडला. सर्व नियुक्त्या या लोकशाही मार्गाने केल्या. 2018 साली राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा झाली. त्यात एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून नियुक्ती केली गेली. त्याच सभेत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची निवड केली असं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं.
-
आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल – सुप्रीम कोर्ट
आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल, सुप्रीम कोर्टाचं मोठं विधान. आम्हाला अपात्रता ठरवायची आहे असं कोर्टाने म्हटलेलं आहे. सुभाष देसाई केसचा दाखला पुन्हा एकदा सिब्बल यांनी दिला आहे.
-
पक्ष घटनेत बदल झाल्याचं वेळोवेळी आयोगाला सांगितलेलं
पक्ष घटनेत बदल झाल्याचं वेळोवेळी आयोगाला सांगितलेलं. निवडणूक आयोगाने फक्त विधिमंडळ संख्या बघून चिन्ह दिलं असं कपिल सिब्बल म्हणाले.
-
ठराव मंजूर करून सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोद पदावरून हटवलं
“माननीय न्यायमूर्तींनो, त्याव्यतिरिक्तही अनेक बाबी आहेत. त्यांनी ठराव मंजूर करून सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोद पदावरून हटवले आणि भरत गोगावले यांची त्या पदावर नियुक्ती केली. तसेच त्यांनी विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती केली. ही सर्व कृत्ये पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडल्याचे दर्शवतात” असा युक्तीवाद ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केला.
-
न्यायमूर्ती आणि कपिल सिब्बल यांच्यात काय चर्चा?
न्यायमूर्ती जॉयमल्या बागची: अपात्रतेच्या कार्यवाहीवर निर्णय झाल्यानंतर आणि नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर पक्षचिन्हाचा प्रश्न दुय्यम ठरू शकतो.
ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल: मी सहमत आहे. माननीय न्यायमूर्तींनो, मी सुरुवातीलाच हेच म्हटले होते. मात्र, या दोन्ही कार्यवाहींचा एकमेकांवर परिणाम होतो.
-
पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा युक्तिवाद स्वीकारला नाही
“एखाद्या गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देऊन त्याला पक्षाचे निवडणूक चिन्ह बहाल केले, तर त्यानंतर अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय झाला तरी त्याचा काहीच उपयोग राहत नाही; तोपर्यंत “घोडा तबेल्यातून निघून गेलेला असतो. मी हाच युक्तिवाद घटनापीठासमोरही मांडला होता. अपात्रतेच्या कार्यवाहीचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने प्रतीक्षा करावी, अशी माझी विनंती होती. मात्र, स्पष्टपणे सांगतो की, पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा युक्तिवाद स्वीकारला नाही” असं कपिल सिब्बल म्हणाले.
-
पक्ष घटनेत बदल करण्याचा अधिकार शिंदेंकडे नाही – कपिल सिब्बल
आमचा पक्ष आणि चिन्ह घेतलं. सरकार बनवलं. विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत आणि पक्ष घटनेत बदल करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. अपात्रतेची वाट बघा, असं आम्ही त्यांना सांगितलं होतं. अपात्रतेची कारवाई आणि पक्ष या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.
-
विधिमंडळ पक्ष फुटला म्हणून राजकीय पक्ष फुटला असं होतं नाही – कपिल सिब्बल
विधिमंडळ पक्ष फुटला म्हणून राजकीय पक्ष फुटला असं होतं नाही. युक्तीवादादरम्यान कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला सवाल.संघटनास्तरावर उद्धव ठाकरेंकडे बहुमत होतं. सिब्बल यांच्याकडून केरळ कोर्टाच्या एका निकालाचा दाखला देण्यात आला. इंदिरा गांधी विरुद्ध ब्रह्मानंद रेड्डी केसचा दाखला त्यांनी दिला. समाजवादी पार्टीत पडलेल्या फुटीचा दाखल सिब्बल यांच्याकडून देण्यात आला.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीला सुरुवात, कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर घटनेत दुरुस्ती करण्यात आली
संघटनास्तरावर उद्धव ठाकरेंकडे बहुमत होतं
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आला.
राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती
शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिन सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
-
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर घटनेत दुरुस्ती, कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तीवाद
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचं? यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून वकिल कपिल सिब्बल युक्तीवाद करतायत. “बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर घटनेत दुरुस्ती करण्यात आली. संघटनास्तरावर उद्धव ठाकरेंकडे बहुमत होतं. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आला. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती” असं कपिल सिब्बल म्हणाले.
-
कुणाला राजकारण करायचं असेल तर तो नाईलाज -आमदार प्रवीण दरेकर
पुन्हा पुन्हा आक्रमक होणे हा त्यांचा अधिकार मात्र विशेष समजून घेणे हे महत्त्वाचे आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीत अवैध असेल तर मी म्हणतो म्हणून प्रमाणपत्र द्या असे करता येत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रमाणपत्र जर योग्य असेल तर त्यांनी पुन्हा शासकीय सिस्टीम मध्ये जावं. जाणीवपूर्वक एखाद्याचा प्रमाणपत्र अवैध ठरवावं असा सरकार कधीही करणार नाही. देवेंद्रजी हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयावर सकारात्मक आहेत त्यांनी अनेक महत्त्वाची निर्णय ही घेतले आहेत. मराठा समाजाला ओबीसी सदृश्य सर्व सवलती दिली आहेत, मात्र कोणाला राजकारण करायचं असेल तर तो नाईलाज आहे. कोणालाही दिलेलं प्रमाणपत्र हे अवैध ठरवता येत नाही, तो निर्णय त्या सक्षम अधिकार्याने घेतलेला आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली.
-
धनंजय मुंडे यांना काय घाई झाली होती मला माहित नाही-प्रकाश सोळंके
धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलण्याचं काही कारण नव्हतं ती पालकमंत्र्यांची पत्रकार परिषद होती. धनंजय मुंडे यांनी का? हस्तक्षेप केला हे त्यांना विचारा मात्र कोणाला बस्स, पुरे झालं असं म्हणण्याचं काही कारण नव्हतं. धनंजय मुंडे यांना काय घाई झाली होती मला माहित नाही पण त्यांना नेहमीच घाई असते हल्ली. पक्षाकडून त्यांना दोनदा पालकमंत्री पद मिळाले ते त्यांना टिकवता आलं नाही. त्यांच्या कारकीर्दीत बीड जिल्ह्यात काय झालं हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मी बैठकीत उपस्थित होतो, मी एक शब्दही बोललो नाही किंवा कोणाला थांबवण्याचाही प्रयत्न केला नाही, अशी टीका आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे.
-
खानदेश-विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्यावर पाचशेच्यावर खड्डे
मुक्ताईनगर ते कुऱ्हा काकोडा या खानदेश ते विदर्भाला रस्त्यावर पाचशेच्यावर खड्डे आहेत. वाहनधारक त्रस्त झाले आहेत. विदर्भात जाणारा महत्त्वपूर्ण हा रस्ता आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ या रस्त्यावर राहते. मात्र ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे. वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, काँग्रेसची गांधीगिरी
जळगावात हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे काँग्रेस भवन समोर रास्ता रोको केला. आंदोलन करणाऱ्या अजित पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना गुलाब पुष्प देत काँग्रेसच्या वतीने गांधीगिरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गट व काँग्रेसचे पदाधिकारी आमने-सामने आल्याचा पाहायला मिळालं. सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जळगाव मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाला होता. हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागे होईल अशी मागणी अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली. पहिल्यांदाच काँग्रेस भवन सोबत आल्यामुळे त्यांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं हेच आंदोलन त्यांनी अजित दादांच्या मृत्यूच्या चौकशीच्या मागणीसाठी केला असता तर बरं झालं असतं असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यावेळी अनुचित प्रकार पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
-
संविधानाची जी विचारधारा तीच सीजेपीची विचारधारा -अभिजीत दिपके
CJP नेमकी काय आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी पंडित जवाहरलाल यांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्यांच्या विचारावर चालणारे ही पार्टी असणार आहे. जी संविधानाचे विचारधार आहे तीच आमचे विचारधारा आहे. आम्ही सेक्युलर आहोत लोकशाहीवर भरोसा ठेवतोय. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात आम्ही देशभरात कॅम्पिंग करणार आहे त्याचं नाव असेल क्या बोलती पब्लिक. आम्ही देशभरात दौरा करणार आहे, त्यांच्या समस्या अडचणी समजून घेणार आहे. शिक्षण बेरोजगारी याबद्दल कोणी बोलत नाही, संसदेत कोणी बोलत नाही. सरकार तर असं वाटते की हा काही मुद्दा नाही. शिक्षणाची वाईट अवस्था यावर कोणी बोलायला तयार नाही. आम्ही लोकांमध्ये जाणार आहे लोकांच्या समस्या अपेक्षा समजून घेणार आहे. कोचिंग मध्ये पैसे जातो कॉलेजच्या डिग्री मध्ये पैसा जातो, आम्हाला यापासून मुलांना आणि त्यांच्या आई-वडिलांना मुक्त करायचा आहे. जर आई-वडीलांना त्यांच्या मुलांना डॉक्टर इंजिनिअर बनवायचे असेल तर त्यांना बर्डन नाही वाटला पाहिजे. गेल्या काही दिवसापासून भारतात शिक्षण व्यवस्था हा व्यवसाय झाला आहे, अशी प्रतिक्रिया सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी दिली.
-
जरांगे यांच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया
जरांगे काय म्हणाला ते मी ऐकले नाही. जेव्हा प्रमाणपत्राची पडताळणी केली जाते, तेव्हा राज्य सरकारचा कोणताही सहभाग नसतो. कोणीही जाणूनबुजून काहीही करत नाही. पात्रता प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही, हे तपासले जाईल. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही, हे न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आले आहे, यात कोणत्याही मंत्र्याचा हस्तक्षेप नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले ते एक प्रकारचे जागतिक केंद्र बनले आहे. ‘रामायण’ हा एक आधुनिक चित्रपट लवकरच येत आहे, ज्याचे जवळपास संपूर्ण चित्रीकरण येथेच झाले आहे, असे ते म्हणाले.
-
डॉक्टरांची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
अमरावती मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज शेकडो डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. शहरातील विविध रुग्णालये आणि दवाखान्यांतील डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते. डॉक्टरांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. वाढत्या वैद्यकीय क्षेत्रातील समस्या, डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न, आरोग्य सेवेशी संबंधित विविध मागण्या आणि शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शासनाने लवकरात लवकर मागण्यांवर निर्णय घ्यावा,अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
-
डॉक्टरांनी संप तातडीने मागे घ्यावा – हायकोर्ट
डॉक्टरांनी संप तातडीने मागे घ्यावा असं हायकोर्टाने म्हटलं आहे. डॉक्टरांच्या संपामुळे एकही रुग्णाचा जीव जायला नको, असे खडेबोल हायकोर्टाने सुनावले. निवासी डॉक्टरांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनाही हायकोर्टाने फटकारलं. आम्ही तुमची बाजू ऐकून घेऊ, मात्र संप तातडीने मागे घ्या असं हायकोर्टाने खडसावलं.
-
जात पडताळणी विभाग वेगळा आहे शासनाला हस्तक्षेप करता येत नाही-बावनकुळे
जात पडताळणी विभाग वेगळा आहे शासनाला हस्तक्षेप करता येत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. समित्यांचे जे काही निर्णय आहे. त्यात कोण फोन करते हे बोलण योग्य नाही. उच्च न्यायालय मध्ये जाऊन अपील करता येतात. मला त्यात काही चर्चा करायची नाही. सरकारला आणि मंत्र्याला तो अधिकार नाही. जात पडताळणी कॉल करेल आणि हस्तक्षेप करेल असे नाही ते कोर्टात न्याय मागू शकतात. जात पडताळणी समिती असे आहे त्यात कोणाला बोलण्याचा अधिकार नाही असे बावनकुळे म्हणाले.
-
कल्याण पूर्वेतील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांचा संताप
कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्टेशनजवळील अपर्णा डेअरी ते खडेगोलवली मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. बाजारपेठ, शाळा-महाविद्यालये आणि रहिवासी वस्ती असल्याने या मुख्य मार्गावर दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांची वर्दळ असते
मात्र रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी आणि गर्दीतून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर या रस्त्यावरून येणाऱ्या नागरिकांना देखील जीवघेणं प्रवास करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल नसल्याने “खडेगोलवलीचे नाव बदलून खड्डेगोलवली करा” अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
-
पात्रता प्रक्रिया पूर्ण झाली की नाही, हे तपासले जाईल. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही – मुख्यमंत्री फडणवी,
जरांगे काय म्हणाले ते मी ऐकलं नाही. जेव्हा प्रमाणपत्राची पडताळणी केली जाते, तेव्हा राज्य सरकारचा कोणताही सहभाग नसतो., असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कोणीही जाणूनबुजून काहीही करत नाही. पात्रता प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही, हे तपासले जाईल.यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही, हे न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आले आहे, यात कोणत्याही मंत्र्याचा हस्तक्षेप नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
-
जळगावच्या सराफ बाजारात सोनं- चांदीच्या दरात विक्रमी वाढ
जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोनं- चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 970 तर चांदीच्या दरात 1 हजार 950 रुपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 52 हजार 409 रुपयांवर पोहोचले.
तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 36 हजार 848 रुपये झालेत. दोनच दिवसांत सोन्याच्या दरात 5 हजार 470 रुपयांची तर चांदीच्या दरात 8 हजार 950 रुपयांची वाढ दिसून आली.
-
माझी नार्को टेस्ट करा, हरकत नाही – चंद्रशेखर बावनकुळे
माझी नार्को टेस्ट करण्यासाठी हरकत नाही. जातपडताळणी विभागाकडे न्यायिक अधिकार, त्यामध्ये कुणी जात नाही . त्यांच्या अधिकारात कोणीही हस्तक्षेप करत नाही. जरांगेंच्या आरोपवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण.
-
संजय राऊत यांची भविष्यवाणी नेहमी खोटी ठरते – बच्चू कडू यांचा टोला
संजय राऊत यांनी कुणाचा हात पाहून ही भविष्यवाणी केली मला माहित नाही. राऊत हे नेहमी भविष्यवाणी करतात आणि ती खोटी ठरते, असं म्हणत बच्चू कडू यांनी राऊतांवर टीका केली. संजय राऊत यांनी आतापर्यंत अनेक भविष्यवाणी केल्या. किती खऱ्या ठरल्या याचही त्यांनी संशोधन केलं पाहिजे. संजय राऊतांची जी स्वप्न आहे ते सकाळचे नाही ती डुलकीत आलेले स्वप्न आहेत, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं.
-
भाजप नगरसेवक आकाश पुरोहितला जेलमध्ये भेटायला गेलेल्या मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट पोलिसांनी नाकारली
भाजप नगरसेवक आकाश पुरोहितला बेस्टच्या आंदोलनात अटक करण्यात आली होती. 2020 बेस्ट महाव्यवस्थापकाला डांबून ठेवल्याच्या प्रकरणासाठी अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर आकाश पुरोहित आर्थर रोड जेलमध्ये होता. आकाश पुरोहितला भेटण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा गेलेले असतााना त्यांची भेट नाकारली गेली आहे. रक्ताच्या नात्याशिवाय कोणत्याच आरोपीला भेटता येत नाही असं पोलिसांनी सांगितले आहे.
-
माफिया नेता अतीक अहमदचा छोटा मुलगा आबान अहमदचा मृत्यू
माफिया नेता अतीक अहमदचा छोटा मुलगा आबान अहमदचा मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातात आबानचा मृत्यू झाला आहे. तुरुंगातील भावाला भेटायला जात असताना मृत्यू झाला आहे. आबान अहमदसद आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे.
-
आज दुसऱ्या दिवशी थोड्याच वेळात सुरु होणार CJP च्या कोअर कमिटीची बैठक
आज दुसऱ्या दिवशी थोड्याच वेळात सुरु होणार CJP च्या कोअर कमिटीची बैठक. बैठकीला अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरभ दास, वैष्णवी गौर, अनिकेत भारद्धाज, रत्ना सिंह, अजिंक्य शिंदे, दीपक बनियानो, विजय मल्लागी त्यांच्या सहकारी आहेत उपस्थित. E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल, शिक्षण, महागाई, रोजगार या विषयावर काल बैठकीत करण्यात आली होती चर्चा. कालपासून सुरू असलेल्या बैठकीत CJP ठरणार पुढील आंदोलनाची दिशा. आज दुपारी दोन वाजता CJP सी जी पी ची पत्रकार परिषद घेऊन बैठकी संदर्भात देणार माहिती. CJP च्या कोअर कमिटीची टीम अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी दाखल
-
ठाकरेंचे वकील कबिल सिब्बाल यांचा कोर्टात युक्तिवाद
“विधीमंडळ राजकीय पक्षाचा भाग आहे, तो राजकीय पक्ष नाही, पक्षाची घटना योग्य की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त आयोगाचा नाही.” ठाकरेंचे वकील कबिल सिब्बाल यांचा कोर्टात युक्तिवाद
-
शिवसेना पक्ष आणि चिन्ह याच्यावर आज दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्ह याच्यावर आज दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. घटनेच्या 10 व्या सुचीनुसार आमदारांना अपात्र करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेने केली आहे.
-
संजय राऊत यांची भविष्यवाणी नेहमीच खोटी ठरते-बच्चू कडू म्हणाले
“संजय राऊत यांची भविष्यवाणी नेहमीच खोटी ठरते, तर संजय राऊत यांनी फोल दावे करु नये, शिवसेना, धनुष्यबाण कायम राहिल,” असं बच्चू कडू म्हणाले आहे.
-
लक्ष्मण हाके यांची हाक आता कोणी ऐकत नाही; टीका ही त्यांच्या त्राग्यातूनच – राधाकृष्ण विखे पाटील
लक्ष्मण हाके यांची हाक आता कोणी ऐकत नाही; टीका ही त्यांच्या त्राग्यातूनच – राधाकृष्ण विखे पाटील. अमली पदार्थांच्या विरोधातील जनजागृतीसाठी नशामुक्त अभियानाची गरज असल्याचे विखेंचे मत. पुढील टप्प्यात शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार. अहिल्यानगरमध्ये पोलीस दलाच्या वतीने नशामुक्त जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद. राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ. जिल्ह्यात नवीन पोलीस स्टेशन वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू. मनुष्यबळ वाढल्यास नवीन पोलीस स्टेशन मंजूर होण्यास मदत होईल – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
-
जालन्यात शिवसेनेचा पदाधिकारी संवाद आढावा बैठक व मेळावा
जालन्यात शिवसेनेचा पदाधिकारी संवाद आढावा बैठक व मेळावा. जालना जिल्हा संपर्कमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित राहून मार्गदर्शन करणार. या आढावा बैठक व मेळाव्यात संघटन अधिक मजबूत करणे, पक्षवाढ, बूथ सक्षमीकरण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार.
-
मी खूप खूनशी आहे, डोक्यात गेलात तर सोडणार नाही- जरांगे यांचा सरकारला इशारा
“मी खूप खूनशी आहे, डोक्यात गेलात तर सोडणार नाही. सरकार जे आता बसलं आहे ते मराठ्यांच्या जीवावर बसलं आहे. मला आता सगळं बाहेर काढायला लावू नका.” जरांगे यांचे विधान.
-
तुमचा भ्रष्टाचार काय आहे हे आम्हाला माहित आहे- जरांगे म्हणाले
“तुमचा भ्रष्टाचार काय आहे हे आम्हाला माहित आहे. एकनाथ शिंदेंनी आम्हाला एवढे नाराज करायला नको होतं. गैरसमज करुन मला एकटा पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे.” असे जरांगे म्हणाले.
-
मनोज जरांगेंची मोठी घोषणा, मुंबईत आंदोलन करावं लागणार
“वेळ पडली तर पुन्हा आंदोलन करु, वेळ पडली तर पुन्हा मुंबईत जावं लागेल,” मनोज जरांगे यांचे सरकारला आव्हान
-
आता उद्धव ठाकरे बरेच बोलावे लागतील- जरांगे यांचे विधान
जरांगे म्हणाले की,”शिरसाट ओबीसींच्या आहारी एवढे कसे आहारी गेले? आता उद्धव ठाकरे बरेच बोलावे लागतील. भुमरेंसाठी मराठ्यांच्या पोरांनी जीवातचं रान केले, मला शिंदेंकडून अशी अपेक्षा नव्हती.”
-
कुणबी प्रमाणपत्र रद्द करा म्हणून दबाव आणला गेला- जरांगे म्हणाले
“कुणबी प्रमाणपत्र रद्द करा म्हणून दबाव आणला गेला. नोंदी सापडलेले प्रमाणपत्र आहेत. मराठ्यांचे नुकसान होणार असेल तर आम्ही कोणालाच सोडणार नाही. ” जरांगे यांचे विधान
-
विखे पाटलांमुळे सरकारसोबत जुळवून घेत होतो- जरांगे यांचा आरोप
विखे पाटलांमुळे सरकारसोबत जुळवून घेत होतो. 2-4 लोकांसाठी खूप आमदार पाडेन. मंत्रालयात बसून कुणबी प्रमाणपत्र रद्द केली आहेत असा आरोप जरांगे यांनी केला आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळले-जरांगे म्हणाले
“मराठ्यांना विरोध करणारे तुमच्या कार्यालयात कसे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळले. मी मराठ्यांच्या लेकरांसाठी लढायला अजूनही तयार आहे. माझा घात होईल असं मंत्री उदय सामंत यांना म्हटले होते.” जरांगे म्हणाले.
-
फडणवीसांनी माझ्या अंगावर येऊ नये, मी सोडणार नाही- जरांगे म्हणाले
जरांगे म्हणाले की “शिंदेच्या न जिंकणाऱ्या जागा मराठ्यांनी निवडून आणल्या, फडणवीसांनी माझ्या अंगावर येऊ नये, मी सोडणार नाही. CM फडणवीसांकडे उपमुख्यमंत्री शिंदेची प्रतिष्ठा वाढवली. शिंदेच्या नेत्यांनी आमच्याविरोधात बैठका घेतल्या.”
-
बावनकुळेंना ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार दिले- जरांगे पाटील
सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खोटे प्रयोग करून नुकसान करू नका. आमच्याकडे पुरावे असूनही प्रमाणपत्राला बोगस म्हणाल का? मंत्री बावनकुळेंचं पत्र फडणवीसांना देणार. बावनकुळेंना ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार दिले. बावनकुळेंची नार्को टेस्ट करा. बावनकुळेंच्या सांगण्यावरून आमच्या मुलांचं नुकसान करणार का, असा सवाल जरांगेंनी केली आहे.
-
ज्योती दहिहंडेंचं प्रमाणपत्र विखेंनी रद्द करायला लावलं; जरांगेंचा आरोप
ज्योती दहिहंडेंचं प्रमाणपत्र विखेंनी रद्द करायला लावलं. मी बोखांडी बसलो तर उठणारच नाही. मला माझ्या समाजाच्या मुलांचं शिक्षण आणि नोकरी महत्त्वाची आहे. एकनाथ शिंदे एवढं आहारी जातील असं वाटलं नव्हतं. सरकारने मराठे संपवण्याचा कट रचला, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
-
आम्ही 2029 ला सर्वात मोठा बदला घेऊ- मनोज जरांगे
कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सरकारचा कट सुरू आहे. सरकारने निवडून मराठ्यांकडून यायचं आणि नंतर मराठ्यांचाच घात करायचा. आम्ही 2029 ला सर्वात मोठा बदला घेऊ. मुख्यमंत्री फडणवीस आणि आमचं चांगलं सुरू होतं. आमच्या नोंदी सापडूनही प्रमाणपत्र रद्द केले, असा आरोप जरांगेंनी केला आहे.
-
मला एकटं पाडण्याचं काम सरकार कसं करतंय ते सिद्ध करणार- जरांगे
मला एकटं पाडण्याचं काम सरकार कसं करतंय ते सिद्ध करणार. सरकार कशाप्रकारे मराठ्यांचं वाटोळं करतंय ते सिद्ध करणार. सरकारकडून नियोजित कट रचण्यात आला, हे सिद्ध करणार. कालपासून राज्यात सरकारकडून एक कट शिजला गेला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्यांकडून कट शिजला जात आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
-
वसंत डावखरे मानहानी प्रकरणात एकनाथ शिंदेंनी नोंदवला जबाब
वसंत डावखरे मानहानी प्रकरणात एकनाथ शिंदेंनी न्यायालयात व्हीसीद्वारे आपला जबाब नोंदवला आहे. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत, असं त्यांनी म्हटलंय. काल उद्धव ठाकरेंनी व्हीसीद्वारे उपस्थित राहून जबाब नोंदवला होता.
-
वसंत डावखरे मानहानी प्रकरणात एकनाथ शिंदे व्हीसीद्वारे न्यायालयात हजर
वसंत डावखरे मानहानी प्रकरणात एकनाथ शिंदे व्हीसीद्वारे तर परांजपे-देवळेकर न्यायालयात हजर आहेत. 2009 च्या मानहानी प्रकरणात कल्याण सत्र न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी संतोष आगे यांच्या दालनात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर राहून कलम 313 अंतर्गत आपला जबाब नोंदवत आहेत. तर शिवसेना नेते आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर हे प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहून आपली बाजू मांडत आहेत. तब्बल 17 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणातील आरोपींच्या जबाबांकडे राजकीय वर्तुळासह कायदे क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
-
सहकाऱ्याच्या लैंगिक छळप्रकरणी ‘तेहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल दोषी
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ‘तेहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांना दोषी ठरवलं आहे. त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्याने दाखल केलेल्या 2013 च्या कथित लैंगिक छळ प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. 2021 मध्ये गोवा सत्र न्यायालयाने याप्रकरणात तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या गोवा सरकारच्या अपिलावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निकाल दिला आहे.
-
नागपूरच्या कामठीत 14 वर्षीय नववीच्या विद्यार्थ्याचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ
नागपूरच्या कामठीत 14 वर्षीय नववीच्या विद्यार्थ्याचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आईने शाळेत का जात नाही? असा प्रश्न विचारल्यावर तो घरातून निघून गेला होता. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-हावडा रेल्वे मार्गावर ही घटना घडली. संबंधित मुलगा सहा दिवसांपासून शाळेत जात नव्हता. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
Maharashtra Doctor strike : डॉक्टरांच्या संपाचा आज दुसरा दिवस, डॉक्टरांचा MMC नोंदणीला विरोध
डॉक्टरांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. मुंबई, पुण्यातील डॉक्टरांनी आज देखील आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुण्यातील कमला रुग्णालयात डॉक्टरांचं आंदोलन सुरु आहे. तर मुंबईत केईम रुग्णालयात डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे. या ड़ॉक्टरांचा MMC नोंदणीला विरोध आहे.
-
नगरच्या कोपरगावात बिबट्यांचा मुक्त संचार, नागरिक भयभीत
कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्यांचा मुक्त संचार वाढलाय. येसगाव शिवारातील भानुदास म्हस्के यांच्या वस्तीवर बिबट्या अचानक धडकला. या बिबट्याने म्हस्के यांच्या घराच्या अंगणात झोपलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये
-
Sanjay raut : संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना लगावला टोला
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत आज झेन-जीशी संवाद साधणार आहेत. यावरून संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना टोला लगावला आहे. नेत्यांच्या नातवांशी बोलून काय फायदा, असा सवाल करत राऊतांनी भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे.
-
प्रशांत किशोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला
राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला ‘देवगिरी’ला पोहोचले आहेत. प्रशांत किशोर हे सुनेत्रा पवारांच्या भेटीला पोहोचल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दोघांमध्ये नेमकी चर्चा होते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
-
मनोज जरांगे आणि कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक
मनोज जरांगे आणि कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधीची बैठक अंतरवाली सराटीत होणार आहे.
या बैठकीसाठी लोकप्रतिनिधी भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात चर्चेला सुरुवात झाली आहे. -
साक्री पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मध्यरात्री करण्यात आली मोठी कारवाई
साक्री पोलिसांच्या जाळ्यात पंजाबचा ड्रग्स तस्कर, 2 लाखांचे एमडी पोलिसांतर्फे करण्यात आले जप्त. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर साक्री पोलिसांतर्फे करण्यात आली कारवाई. विशेष पथकाने सापळा रचून राजकुमार मुल्कराज वाल्मीकी या 42 वर्षीय संशयिताला घेतले ताब्यात. शेवाळी गावाजवळच्या एका हॉटेल परिसरात एक व्यक्ती एमडी ड्रग्स विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने शिताफीने संशयिताच्या आवळल्या मुसक्या
-
धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा,15 कृषी अधिकारी निलंबित
धाराशिव जिल्ह्यातील एकात्मिक कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनेतील निविष्ठा घोटाळ्यात चौकशीनंतर 17 अधिकारी दोषी ठरले असून, त्यापैकी 15 कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. चौकशीत मयत, भूमिहीन, दुबार व बिगर सभासद शेतकऱ्यांच्या नावावर निविष्ठा वाटप करून सुमारे 2.32 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. या कारवाईत 2 जिल्हा कृषी अधीक्षक, 8 तालुका कृषी अधिकारी आणि 4 मंडळ कृषी अधिकारी यांचा समावेश आहे.
-
वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून वारणा धरणामध्ये पाण्याची आवक मध्ये वाढ होत असल्यामुळे धरण परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून वक्र दरवाजाद्वारे 3600 क्युसेक विसर्गामध्ये वाढ करून 5700 क्युसेक व विद्युत गृहातून सुरू असलेला 1400 क्युसेक विसर्ग मध्ये 200 क्युसेक वाढ करून 1600 क्युसेक असा एकूण 7300 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
-
लळींग कुरणातील प्रसिद्ध धबधबा ओसंडून वाहू लागला; पर्यटकांचे आकर्षण वाढले..
धुळे पश्चिम वनक्षेत्रातील लळींग कुरण परिसरातील लांडोर बंगला येथील प्रसिद्ध धबधबा संततधार पावसामुळे प्रवाहित झाला असून ओसंडून वाहत आहे. दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर धबधबा सुरू झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सातपुडा पर्वतरांगांतील हिरवाईने नटलेले लळींग कुरण हे धुळे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असून, विशेषतशनिवार-रविवार आणि श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते..
-
मुंबईतील कुर्ला बस डेपो रोडवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण
सततच्या पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे आणि खोल खड्डे पडले असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांचीही गैरसोय. विशेषतः बस डेपो परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून दररोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याची तक्रार. स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही अद्याप खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले नसल्याचा आरोप. पावसाचे कारण देत मनपाकडून केवळ पाहणी केली जाते, मात्र प्रत्यक्ष दुरुस्ती होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
-
आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील संशयास्पद दाव्यांची SIT मार्फत चौकशी
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत दाखल झालेल्या 15,407 संशयास्पद आरोग्य विमा दाव्यांची सखोल चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. २०२४ ते २०२६ या कालावधीतील संशयास्पद दाव्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
शिवसेनेच्या पक्ष, चिन्हावर आज पुन्हा सुनावणी
काल सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या पक्ष, चिन्हावरील सुनावणी पार पडली. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. आज सर्वोच्च न्यायालयात पक्ष, चिन्हावर पुन्हा सुनावणी होणार आहे.