Maharashtra News LIVE : बीड : परळीत हजारो लिटर पाण्याची नासाडी

विदर्भात उन्हाचा तडाखा असून पारा ४५ अंशांच्या पार गेला आहे; सोबतच जिल्हा बँक निवडणूक नियम, नाशिकमधील भोंदू बाबावर कारवाई आणि मुंबई मेगाब्लॉकच्या महत्त्वाच्या बातम्या वाचा.

Maharashtra News LIVE : बीड : परळीत हजारो लिटर पाण्याची नासाडी
breaking news
| Edited By: | Updated on: Apr 26, 2026 | 8:53 PM

विदर्भात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांत तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पार गेला आहे, तर नागपूरसह इतर शहरांत ४२ ते ४४ अंशांची नोंद झाल्याने नागरिक उन्हाने हैराण झाले आहे. यामुळे प्रशासनाने दुपारच्या वेळी कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी २७ एप्रिलला मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सलग १० वर्षे संचालक राहिलेल्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याच्या नवीन नियमामुळे आमदार अब्दुल सत्तार, खासदार संदीपान भुमरे आणि अंबादास दानवे यांसारख्या दिग्गजांना धक्का बसला आहे. त्यामुळे ते आपल्या वारसांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये महिला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटकेत असलेला भोंदू बाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार  आहे. यावेळी पोलीस त्याची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे. तर मुंबईत हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना लोकलच्या विलंबाचा सामना करावा लागत आहे. यासह राज्यातील इतर ठळक घडामोडी या ब्लॉगमध्ये वाचू शकता.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Apr 2026 06:54 PM (IST)

    वर्धा जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा वाढ

    वर्धा जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. वर्धा जिल्ह्यात 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सततच्या वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या तापमानाचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. वाढलेल्या उन्हामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

  • 26 Apr 2026 06:41 PM (IST)

    अहिल्यानगर : जिल्हा रुग्णालय कर्मचारी संघटनेने संपाला पाठिंबा

    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह 18 मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे. अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय कर्मचारी संघटनेने संपाला पाठिंबा दिला आहे. संपाला पाठिंबा देत असताना जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी डॉक्टर परिचारिका यांनी काम सुरू ठेवले आहे. आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करता का हे पहाणे महत्त्वाचे असणार आहे.

  • 26 Apr 2026 06:27 PM (IST)

    नारीशक्ती वंदन विधेयकावरून साताऱ्यात भाजप महिला मोर्चाचे जनआक्रोश आंदोलन

    नारीशक्ती वंदन विधेयकाच्या मुद्द्यावरून साताऱ्यात भाजप महिला मोर्चाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून महिलांची पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी, “महिलांची ताकद आता विरोधकांना दिसत आहे.आरक्षण मिळाल्याशिवाय महिला शांत बसणार नाहीत,” असा इशारा दिला.

  • 26 Apr 2026 06:16 PM (IST)

    बीड : परळीत हजारो लिटर पाण्याची नासाडी

    परळीमध्ये परळी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणा दिसून आलाय. जुन्या गाव भागात असलेल्या पाण्याची टाकी भरल्यानंतरही टाकीतील पाणी पुरवठा सुरूच राहिल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचे पहायला मिळाले.

  • 26 Apr 2026 05:58 PM (IST)

    अमरावतीमध्ये 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

    अमरावतीमध्ये 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

    राज्यात अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

    अकोल्याचं आजचं तापमान 46.9 अंश सेल्सिअस

    विदर्भ तापला, सर्व जिल्ह्यांच्या तापमानात वाढ

  • 26 Apr 2026 05:50 PM (IST)

      वर्धा जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा वाढ

    वर्धा जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा वाढ

    वर्धा जिल्ह्यात ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

    सततच्या वाढत्या तापमानाने नागरिक हैराण

    वाढत्या तापमानाचा जनजीवनावर परिणाम

    तीव्र उन्हामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

    वाढत्या तापमानाचा विविध घटकांवर परिणाम

  • 26 Apr 2026 05:39 PM (IST)

    एकनाथ लोमटे महाराज यांच्या संस्थेत बुडून 15 वर्षीय तरुणांचा मृत्यू

    एकनाथ लोमटे महाराज यांच्या संस्थेत किर्तनासाठी आलेल्या 15 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला आहे. सप्ताहास तेर येथील वारकरी शिक्षण संस्थेतील मुले कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी आली होती, पाच मुले बाजूच्या मठा शेजारील तळ्यात पोहण्यासाठी गेली होती.  त्यातील एक मुलगा बुडाला चार मूल वाचवण्यात यश आले आहे.

     

  • 26 Apr 2026 05:30 PM (IST)

    भरधाव कारच्या धडकेत 72 वर्षीय योग शिक्षिकेचा मृत्यू

    भरधाव कारच्या धडकेत 72 वर्षीय योग शिक्षिकेचा मृत्यू

    मंगला केवटे असे या अपघातात मृत्यू झालेल्या योग शिक्षकेचे नाव

    सकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडला अपघात

    अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार

     

     

  • 26 Apr 2026 05:16 PM (IST)

    नाग भूषण अवॉर्ड फाउंडेशनद्वारा नागभूषण पुरस्कार – 2025 चे आयोजन

    नाग भूषण अवॉर्ड फाउंडेशनद्वारा नागभूषण पुरस्कार – 2025 चे आयोजन केले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या वर्षीचा नागभूषण पुरस्कार सत्यनारायण नुवाल यांना तर युवा नागभूषण पुरस्कार दक्ष खंते यांना देण्यात येणार आहे.

  • 26 Apr 2026 05:15 PM (IST)

    राघव चड्डा यांच्या मुंबईतील निवासस्थानी सुरक्षा वाढवली

    राघव चड्डा यांच्या मुंबईतील निवासस्थानी सुरक्षा वाढवली

    मुंबईतील खार येथील १६ व्या रस्त्यावर आहे परिणिती चोप्रा आणि राघव चड्डा यांचे निवासस्थान

    वाहतुकीसाठी १६ वा रस्ता पोलिसांनी केला पूर्णपणे बंद

    याच परिसरात आज आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते करणार होते आंदोलन

    आंदोलन करण्यापूर्वीच  पोलिसांनी कार्यकर्त्यांना डिटेन केल्याची माहिती

  • 26 Apr 2026 03:55 PM (IST)

    जळगावच्या नशिराबादजवळ महावितरणच्या शॉर्ट सर्किटमुळे रोहित्राला भीषण आग

    जळगावच्या नशिराबादजवळ महावितरणच्या शॉर्ट सर्किटमुळे रोहित्राला भीषण आग लागली. रोहित्राला आग लागल्यामुळे त्यावर अवलंबून परिसरातील 10-15 शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. रोहित्राच्या आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केल्याने जवळील गवतही जळून खाक झालं आहे. उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यावर पिकं वाचवण्याची धडपड सुरू असताना वीज खंडित झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. नशिराबाद नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

  • 26 Apr 2026 03:45 PM (IST)

    रितेश देशमुख, जिनिलिया देशमुखने भिवंडीतल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ) इथं घेतलं दर्शन

    ‘राजा शिवाजी’ या बहुचर्चित आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते रितेश विलासराव देशमुख तसेच अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तीपीठ) येथे दर्शन घेत विशेष प्रार्थना केली. महाराष्ट्राच्या इतिहासाशी आणि शिवचरित्राशी घट्ट नाते सांगणाऱ्या या चित्रपटाच्या यशासाठी या स्टार जोडप्याने मंदिरात पारंपरिक पद्धतीने आरती करून छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले.

  • 26 Apr 2026 03:28 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यात गुरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या दरात वाढ झाल्याने पशुपालक संकटात

    जळगाव जिल्ह्यात गुरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या दरात वाढ झाल्याने पशुपालक संकटात आले आहेत. जिल्ह्यात गुरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या दरात तब्बल 2 हजार रूपयांची वाढ झाली आहे. 5 हजार रुपये शेकडा मिळणारा चारा आता 7 हजार रुपये शेकडा मिळत असल्याची पशु पालकांची माहिती आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून हिरवा चारा देखील कमी असल्याने चाऱ्याच्या दरात वाढ झाली आहे.

  • 26 Apr 2026 03:18 PM (IST)

    आपल्या आराध्य दैवताबद्दल विकृत बरळतो..; छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींना रितेशने सुनावलं

    धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. रितेशचं ट्विट सविस्तर वाचा

  • 26 Apr 2026 03:13 PM (IST)

    जळगावचा तापमानाचा पारा 43.3 अंशांवर पोहोचला

    जळगावचा तापमानाचा पारा 43.3 अंशांवर पोहोचला असून जळगावात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उकाडाच्या त्रासामुळे जळगावकर हैराण झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे जळगाव शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. तापमानात अचानक वाढ झाल्याने उकाड्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या तापमानापासून खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. पुढच्या काळात तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

  • 26 Apr 2026 02:55 PM (IST)

    पुण्यात PMPML बस चोरी प्रकरणी गुन्हा दाखल

    पुण्यात PMPML बस चोरी प्रकरणी गुन्हा दाखल… पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल… डेंगळे पुलावर पार्क केलेल्या बसमध्ये चढून तरुणाने बस डेक्कनपर्यंत
    चालवत आला होता

  • 26 Apr 2026 02:45 PM (IST)

    नाशिकच्या निफाडमध्ये तापमान 42 अंश पार

    नाशिकच्या निफाडमध्ये तापमान 42 अंश पार…उष्णतेमुळए लासलगावमधील पोल्ट्री व्यवसाय अडचणीत…लासलगावसह निफाड तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांसमोर मोठे संकट.

  • 26 Apr 2026 02:30 PM (IST)

    संगमनेरमधील भोंदू गडगेचं सिन्नर कनेक्शन समोर

    संगमनेरमधील भोंदू गडगेचं सिन्नर कनेक्शन समोर. सिन्नरच्या जायगाव येथील अध्यात्म योगपीठ पोलिसांच्या रडारवर. डॉ.मोहन पुरी भोंदू गडगेचा मास्टरमाईंड असल्याचं उघड. मोहन पुरीने 15 वर्षांपूर्वी अध्यात्म योगपीठ सुरु केलं. 5 ते 6 एकरांतील दवाखाना पोलिसांच्या रडारवर

  • 26 Apr 2026 02:15 PM (IST)

    यवतमाळमध्ये गुप्तधन शोधणारे सहा जण पोलिसांच्या ताब्यात

    यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार परिसरातील कारेगांव शेतशिवारात गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी पुजा करत असलेल्या सहा जणांना वडगांव जंगल पोलीसांनी मध्यरात्री दरम्यान अटक केलीये.वरूड-कारेगांव रस्त्यावर हा प्रकार उघडकीस आला.पोलिसांना एक चारचाकी वाहन दिली त्याची तपासणी केली असता त्यामध्ये अघोरी पुजेशी संबंधित विविध साहित्य आढळून आले.यामध्ये कुदळ, अगरबत्ती,ज्वारीचे पीठ, काळ्या बाहुल्या तिरसूळ, रुद्राक्ष माळ,केस,लिंबू,सुया,ताजीब, रंगीबेरंगी धागे,आदी वस्तूचा समावेश होता.या साहित्याचे आधारे संशयितांची चौकाशी केली असता सहा जणांनी गुप्तधनासाठी काढण्यासाठी शिवारात आल्याची कबुली पोलिसांनी दिली.ताब्यात घेतलेले पाच जणं वाशिम जिल्ह्यातील असून एक जण आर्णी येथील आहे.

  • 26 Apr 2026 02:00 PM (IST)

    महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साई दरबारी

    मुलीच्या वाढदिवसानिमित्त महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहकुटुंब साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. 1992 पासून मुलीच्या वाढदिवसाला मी येत असतो. आज देखील त्यामुळे साईदर्शनाला आलोय. आज दर्शना बरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेणार आहे, असे ते म्हणाले.

  • 26 Apr 2026 01:50 PM (IST)

    धीरेंद्र शास्त्री विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

    सोलापुरात बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री विरोधात संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले. धीरेंद्र शास्त्री यांच्या फोटोला शेण्याच्या ( घाण ) पाण्याची आंघोळ घालत आंदोलन केले. पुन्हा असे विधान केल्यास धीरेंद्र शास्त्री यांच्या तोंडाला शेण फासण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

  • 26 Apr 2026 01:40 PM (IST)

    भोंदू अशोक खरात याला सहाव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी

    आज सहाव्या गुन्ह्यात पोलीस कोठडी संपल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले होते. युक्तिवादा दरम्यान अशोक खरात याला न्यायालयीन कोठडीत धोका असल्याचा सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला.आजच तपास यंत्रणेला संशयित आरोपींचा ताबा मिळावा अशी केली विनंती करण्यात आली. अशोक खरातची सहाव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत रवानगी तर आजच तपास यंत्रणा न्यायालयीन कोठडीतून पुढील तपास कामासाठी अशोक खरातचा ताबा घेणार आहेत.

  • 26 Apr 2026 01:30 PM (IST)

    नेकनूरमध्ये झालेल्या दगडफेकीत एकूण 10 आरोपींना अटक

    बीडच्या नेकनूरमध्ये रात्री रिक्षा आणि दुचाकीचा किरकोळ अपघात झाला होता. यानंतर रिक्षातील महिलेला आणि तिच्या नातेवाईकांना मारहाण करण्यात आली. पुढे दोन्ही बाजूने मोठा जमाव जमला आणि दोन गटात दगडफेक झाली. पोलीस ठाण्यासमोरच झालेल्या दगडफेकीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये मोठा जमाव दिसत आहे तर काही तरुण आरोपी दगड उचलताना आणि काही लोक पळताना दिसत आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत एकुण 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • 26 Apr 2026 01:20 PM (IST)

    अशोक खरातला उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार

    आरोपी अशोक खरात याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे कोर्टात हजर करण्यात आले. पोलीस कोठडीत होता त्या गुन्ह्याचा तपास आहे इतरही गुणांचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यात जो पोलिस कस्टडीचा हक्क आहे तो राखीव ठेवून आज त्याला आम्ही महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात वर्ग करून उद्या पोलीस कस्टडीसाठी कोर्टात हजर करण्यात येईल. अशी माहिती सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर यांनी दिली.

  • 26 Apr 2026 01:10 PM (IST)

    भर उन्हात वाहतूक कोंडी

    बीड शहरातील बार्शी नाका परिसरात गेल्या दोन तासांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे‌. बऱ्याच दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. यासाठी केलेल्या खोदकामामुळे वारंवार येथे वाहतूक कोंडी होतेय. मात्र आज मोठ्या प्रमाणात गेल्या दोन तासांपासून ही वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो तर परिसरातील व्यावसायांवर देखील मोठा परिणाम झाला आहे. उठणाऱ्या धुळीमुळे व्यावसायिक आणि नागरिक त्रस्त आहेत. रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून होणारी वाहतूक कोंडी दूर करावी अशी मागणी होत आहे.

  • 26 Apr 2026 01:00 PM (IST)

    नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर, पारा ४४ अंशांपुढे

    नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिसून आला. तापमानाने ४४ अंशांचा टप्पा गाठला. एप्रिलमध्येच उष्णतेची धोक्याची पातळी ओलांडली. उष्माघाताचा धोका वाढला आहे. कमी आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता वाढली आहे. नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या सत्रात रस्त्यांवर शुकशुकाट आहे, जनजीवनावर उष्णतेचा परिणाम दिसून आला. पुढील महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने नोंदवली आहे.

  • 26 Apr 2026 12:55 PM (IST)

    उष्णतेचा पोल्ट्री व्यवसायावर मोठा परिणाम

    नाशिकमधील निफाडमध्ये तापमान 42.6°C वर पोहोचले आहे. उष्णतेचा पोल्ट्री व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसत आहे. कोंबड्यांची इम्युनिटी घटली, मृत्यूत वाढ झाला आहे. 13 एप्रिलपासून तापमान 40°Cच्या वर पोहोचले आहे.  लासलगावसह निफाड तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांसमोर मोठे संकट.

  • 26 Apr 2026 12:45 PM (IST)

    किरकोळ अपघातानंतर रिक्षा अडवून मारहाण करत महिलेचा विनयभंग

    नेकनूर पोलीस ठाण्याच्या परिसरात रात्री दोन गटात दगडफेक झाली होती, यानंतर सकाळी देखील गोंधळ झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज नेकनुर येथील आठवडी बाजारासह संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. दगडफेकी पूर्वीची मूळ घटना नेमकी काय होती त्याचे कारण आता समोर आले आहे. एका धावत्या रिक्षाला धक्का लागल्यानंतर दुचाकी आडवी लावून महिलेचा विनयभंग केल्याचे आणि तिच्या नातेवाईकाला बेदम मारहाण केल्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे.

  • 26 Apr 2026 12:30 PM (IST)

    सदावर्तेच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाहीत-संजय शिरसाट

    सदावर्तेच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाहीत, प्रताप सरनाईक यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत विचारपूर्वक घेतलेली आहे. सदावर्तेंचा त्यांच्यात आपापसात भांडण लावण्याचा जो काही प्रकार आहे, मला वाटतो तो थांबवला पाहिजे असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

  • 26 Apr 2026 12:15 PM (IST)

    खरातला साथ देणारे महसुलचे लोक बडतर्फ होतील- बावनकुळे

    भोंदू अशोक खरात प्रकरणात SIT महसुलशी निगडीत अधिका-यांची नाव पाठवतायत. त्याचा अंतिम रिपोर्ट येणार. अशोक खरातला साथ देणारे महसुलचे लोक बडतर्फ होतील. जमिन खरेदी करण्यात , जमिन लाटण्यात तसेच आर्थिक व्यवहारात ज्यांचा पुर्णत: सहभाग दिसतोय त्याबाबत SIT रिपोर्ट पाठवणार असे महसुलमंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे.

  • 26 Apr 2026 11:50 AM (IST)

    धिरेंद्र शास्त्री बागेश्वर बाबाला महाराष्ट्रात बंदी घाला; अमरावती शहर काँग्रेसचे आंदोलन…..

    बागेश्वर बाबाच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून अमरावतीत आंदोलन काँग्रेसने केलं. या सरकारकडून या बाबांना प्रोत्साहन दिल जात असल्याचाही काँग्रेसने आरोप केला आहे. बागेश्वर बाबाने शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यावर कारवाई करा काँग्रेसची मागणी..

  • 26 Apr 2026 11:35 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर, तापमानाने गाठला ४४ अंशांचा टप्पा गाठला

    नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत असून तापमानाने गाठला ४४ अंशांचा टप्पा गाठला आहे.  एप्रिलमध्येच  उष्माघाताचा धोका वाढला आहे.  कमी आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता वाढली असून नागरिक हैराण झाले आहेत.  पुढील महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

  • 26 Apr 2026 11:25 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर विभागात तीन महिन्यांत २९७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

    गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान, वाढते कर्ज आणि नापिकीच्या संकटामुळे मराठवाडा विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. जानेवारी ते मार्च 2026 या तीन महिन्यांत विभागात एकूण २९७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ५३ आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यानंतर बीड ४९, धाराशिव ३० आणि नांदेड २९ जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. प्रशासनाच्या माहितीनुसार, या प्रकरणांपैकी ५७ शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत, तर अनेक प्रकरणांची अद्याप चौकशी सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये अपात्रतेची नोंदही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, कर्जबाजारीपणा, पिकांना न मिळणारा योग्य भाव आणि वाढलेले उत्पादन खर्च ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

  • 26 Apr 2026 11:07 AM (IST)

    जल जीवन मिशन पाईपलाईन आणि पाण्याच्या टाकीचं काम अपूर्ण स्थितीमध्ये असल्याने गावकरी आक्रमक

    जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील रांजणगाव गावात ग्रामस्थांनी एकत्र येत अर्ध नग्न आंदोलनाला सुरुवात केली.मागच्या काही दिवसापासून मंजूर असलेल्या जलजीवन मिशन योजनेची पाईपलाईन आणि पाण्याची टाकी हे काम अपूर्ण स्थितीत असल्याने भर उन्हाळ्यात या गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. जिल्हा प्रशासनाला अनेकदा पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेतली नसल्याचे या गावकऱ्यांचे म्हणणं आहे. त्यामुळे येत्या काळात प्रशासनाने जलजीवन मिशनचे काम पूर्ण करून गावकऱ्यांना पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी केली शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या गावकऱ्यांनी दिला आहे.

  • 26 Apr 2026 10:55 AM (IST)

    महिलेला मारहाण झाल्याने निषेध करत आठवडी बाजारपेठ बंद..

    बीडच्या नेकनूरमध्ये रात्री दोन गटात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. ही दगडफेक पोलीस ठाण्याच्या समोरच झाल्यानंतर पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र नेकनूर परिसरामध्ये तणावाचे वातावरण दिसत आहे. पोलिसांकडून दंगल नियंत्रण पथकासह अधिकचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र रात्रीच्या दगडफेकीनंतर सकाळी शेळी बाजार परिसरात देखील अचानक गोंधळ उडाला यावेळी व्यापाऱ्यांसह खरेदीसाठी आलेल्या लोकांची मोठी धावपळ उडाल्याचे पहायला मिळाले. यानंतर पोलिसांकडून सर्व लोकांना हटवले जात आहे.

  • 26 Apr 2026 10:50 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट…

    सोलापूर शहर व जिल्ह्यात ऊष्णतेची धग कायम आहे. त्यामुळे शनिवारी सोलापुरातील तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता, तर दुसरीकडे हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे काही ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

  • 26 Apr 2026 10:40 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपूंजी येथील धक्कादायक घटना

    छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीतील वादातून २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपूंजी परिसरात ही घटना घडली असून पवन ज्ञानेश्वर भुते असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवन याचे लग्न अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झाले होते. मात्र घरगुती कारणांवरून पती-पत्नीमध्ये सतत वाद सुरू होते. या वादातून वाढलेल्या मानसिक तणावामुळे पवनने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • 26 Apr 2026 10:30 AM (IST)

    बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्री यांच्या निषेधार्थ आंदोलन

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल खोटं वक्तव्य करत महाराजांचा बागेश्वर बाबा ने अवमान केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ , जिजाऊ ब्रिगेड करून केलं जातं आहे निषेध आंदोलन. नागपुरातील छत्रपती चौकात केलं जातं आहे आंदोलन

  • 26 Apr 2026 10:20 AM (IST)

    अमरावतीमध्ये आठ लाखाचे एचटीबीटी प्रतिबंधित कपाशीचे बियाणे जप्त

    कृषी विभाग व पोलिसांनी केली कारवाई… हे प्रतिबंधित बियाणे तस्करीसाठी रेल्वे पार्सल व्यवस्थेचा उपयोग. महाराष्ट्रात कपाशीच्या एचटीबीटी वाणावर प्रतिबंध असतानाही खरीप हंगामाच्या तोंडावर ही प्रतिबंधित कपाशीची बियाणे तस्करी वाढली आहे. मात्र या प्रतिबंधित बियाण्याची तस्करी रोखण्यासाठी कृषी विभागाने मोहीम सुरू केली असून काल अमरावतीमध्ये आठ लाख रुपये किमतीचे यशस्वी बियाणे अमरावतीच्या रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या मदतीने कारवाई करत जप्त केले. यावेळी बियाण्याच्या तस्करांनी आपला तस्करीचा मार्ग बदलत चक्क रेल्वेच्या पार्सल व्यवस्थेचा उपयोग करून हे बियाणे अमरावतीमध्ये आणले होते.

     

  • 26 Apr 2026 10:05 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत KDMT बसचा ‘रस्सी’ जुगाड उघड

    बसच्या आपत्कालीन दरवाजाचा लॉक तुटल्यानंतर चक्क रस्सीने दरवाजा बांधून बस धावली रस्त्यावर. प्रवाश्यांनी खचाखच भरलेल्या बसचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नियम धाब्यावर बसवून प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ सुरू. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्गच बंद अपघाताची भीती अधिकच तीव्र. सोशल मीडियावर नागरिकांचा संताप; केडीएमटीवर टीकेची झोड. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी; प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

  • 26 Apr 2026 09:57 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीचे बिगुल वाजले, १० वर्षांचा नियम ठरणार अडथळा

    छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगवान झाली असून, उद्या सोमवार, २७ एप्रिल रोजी मतदारांची कच्ची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, नव्या नियमानुसार सलग दहा वर्षे संचालक पद भूषवलेल्या व्यक्तींना निवडणूक लढवता येणार नसल्याने आमदार अब्दुल सत्तार, खासदार संदीपान भुमरे, अंबादास दानवे आणि नितीन पाटील यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांना प्रत्यक्ष मैदानात उतरता येणार नाही. यामुळे ही मंडळी आपल्या वारसांना निवडणुकीत उतरवण्याची दाट शक्यता आहे. आता प्रसिद्ध होणाऱ्या यादीवर १० दिवसांत हरकती मागवण्यात येतील, त्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर होईल. पुढील ४० ते ५० दिवसांत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन बँकेचे नवे संचालक मंडळ अस्तित्वात येईल.

  • 26 Apr 2026 09:51 AM (IST)

    भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार; SIT पुन्हा कोठडीची मागणी करण्याची शक्यता

    नाशिकमधील बहुचर्चित भोंदू अशोक खरात याच्या सहाव्या गुन्ह्यातील तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असून, त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी (SIT) पुन्हा एकदा पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे. जर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली, तर पोलीस त्याला पुढील गुन्ह्यात तपासासाठी पुन्हा ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. खरातवर एकापाठोपाठ एक सहा गुन्हे दाखल झाल्याने या प्रकरणातील तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

  • 26 Apr 2026 09:47 AM (IST)

    मिरा-भाईंदर महापालिकेचा संतापजनक कारभार; रुग्णवाहिका न मिळाल्याने पोलिसांना मृतदेह रिक्षेतून न्यावा लागला

    मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा अत्यंत उदासीन आणि संतापजनक कारभार समोर आला आहे. मिरा-भाईंदर पश्चिम येथील मेट्रो स्टेशनजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी १०८ हेल्पलाईन आणि पालिकेच्या रुग्णवाहिकेला वारंवार फोन केला. मात्र, दोन तास उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही. अखेर प्रशासनाच्या मदतीची आशा सोडून पोलिसांनी तो मृतदेह रिक्षामध्ये टाकून शवविच्छेदनासाठी भीमसेन जोशी रुग्णालयात नेला. या घटनेमुळे पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर कडक शब्दांत टीका होत असून, एका मृतदेहासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न होणे ही शरमेची बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

  • 26 Apr 2026 09:37 AM (IST)

    नागपूर रेल्वे स्थानकावरील जन औषधी केंद्रावर मोठी कारवाई

    नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवरील प्रधानमंत्री जन औषधी केंद्रावर रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या केंद्रात सर्वसामान्यांसाठी आवश्यक असलेली शुगर, बीपी आणि थायरॉईडची जेनेरिक औषधे उपलब्ध नसून, त्याऐवजी ब्रँडेड सौंदर्यप्रसाधने, परफ्युम आणि शाम्पू यांसारख्या जनरल वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. झेडआरयूसीसी (ZRUCC) सदस्य नितीन सोळंके यांनी यासंदर्भात विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत रेल्वेच्या पथकाने तपासणी केली आणि केंद्रातील अनधिकृत साहित्य जप्त करत कायदेशीर कारवाई केली आहे.

  • 26 Apr 2026 09:27 AM (IST)

    पुण्याचा पारा ४० अंशांच्या पार; पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज

    पुणे शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढला असून काल कमाल तापमानाची नोंद ४०.९ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. विशेषतः लोहगाव परिसरात तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचल्याने पुणेकर उन्हाच्या झळांनी हैराण झाले आहेत. केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या सरासरी तापमानातही लक्षणीय वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर काहीसा दिलासा मिळाला होता, मात्र गेल्या चार दिवसांपासून पारा ३९ ते ४१ अंशांच्या दरम्यान स्थिरावला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, प्रतिकूल हवामानामुळे पुढील दोन दिवस दुपारनंतर शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • 26 Apr 2026 09:19 AM (IST)

    पुण्यात आता होर्डिंग साठी क्यूआर कोड बंधनकारक

    पुणे शहरातील अनधिकृत फोर्डिंगला लगाम घालण्यासाठी पुणे महापालिकेने सर्व अधिकृत होर्डिंग वर किंवा आर कोड लावण्याचा निर्णय घेतला आहे. या डिजिटल व्यवस्थेची अंमलबजावणी 27 एप्रिल पासून सुरू होणार असून यामुळे अनधिकृत फलकांवर कारवाई करणे सोपे होणार आहे. शहरात सध्या तीन हजार 35 अधिकृत तर सुमारे दीड हजार अनधिकृत होर्डिंग आहेत.

  • 26 Apr 2026 09:14 AM (IST)

    मुंबईत कालिना परिसरात दूषित पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

    मुंबईतील सांताक्रूझ पूर्व येथील कालिना, जांभळीपाडा परिसरातील चाळींमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नळाला येत असलेल्या घाण पाण्यामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या संदर्भात महानगरपालिकेकडे वारंवार दाद मागूनही प्रशासनाकडून दुरुस्तीची कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महापालिकेने तातडीने जलवाहिन्यांची तपासणी करून रहिवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

  • 26 Apr 2026 09:09 AM (IST)

    नागपुरात पारा ४४ अंशांच्या पार, नागरिकांना महावितरणचा शॉक

    नागपुरात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून शहराचा पारा ४४ अंशांच्या पुढे गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. अशा भीषण उष्णतेत महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात विजेचा मोठा लपंडाव सुरू असल्याने नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. वाढत्या उन्हामुळे एसी आणि कुलरचा वापर वाढल्याने विजेची मागणी थेट ८२३ मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात असलेला मागणीचा उच्चांक यंदा एप्रिलमध्येच मोडीत निघाला आहे. दरवर्षी साधारणपणे ५५० मेगावॅट विजेची गरज भासते, मात्र यंदाच्या वाढीव मागणीमुळे अनेक भागांत वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागपूरकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहायला मिळत आहे.

  • 26 Apr 2026 09:04 AM (IST)

    हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक; सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान लोकल सेवा विस्कळीत

    मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावर आज, रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० या कालावधीत सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप व डाऊन दोन्ही मार्गांवर लोकल सेवा बंद राहतील. यामुळे पनवेल, बेलापूर, वाशी आणि गोरेगावच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत होणार आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (सीएसएमटी-कल्याण) कोणताही ब्लॉक नसल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, हार्बरच्या प्रवाशांना आज पश्चिम व मध्य रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Follow Us