AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरा, सासू-सासरे सगळे आजारी, चहामध्ये काय मिसळायची पत्नी ? हिडन कॅमेऱ्यातलं दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली

कानपूरमधील एका चार्टर्ड अकाउंटंटने आपल्या पत्नीवर चहात विषारी पदार्थ मिसळून हळूहळू विष देण्याचा गंभीर आरोप केला आहे. पतीने घरात लावलेल्या गुप्त कॅमेऱ्यांमध्ये पत्नी चहात काहीतरी मिसळताना दिसल्याचा दावा केला. पती, आई आणि वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला संशय आला. या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.

नवरा, सासू-सासरे सगळे आजारी, चहामध्ये काय मिसळायची पत्नी ? हिडन कॅमेऱ्यातलं दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली
पत्नी चहात काही मिसळते, संशय आल्यावर पतीने बसवला हिडन कॅमेरा, रेकॉर्डिंग पाहून झाला अवाक्
| Updated on: Jul 29, 2026 | 2:12 PM
Share

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. आपल्या पत्नीने चहामध्ये कथितरित्या केमिकल पदार्थ मिसळून हळूहळू विष देण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप एका चार्टर्ड अकाउंटंटने केला आहे. तिच्यावर संशय आल्याने, त्याने त्याच्या घरात गुप्तपणे हिडन कॅमेरे लावले.त्यातून जे दिसलं त्याने सर्वांनाच धक्का बसला, असा दावा केला. त्याची पत्नी चहात एका छोट्या बाटलीतून काहीतरी मिसळताना दिसत असल्याचा दावा त्या इसमाने केला. या कथित रेकॉर्डिंगच्या आधारे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र या दाव्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावतपूर येथील रहिवासी असलेले हिमांशू हे चार्टर्ड अकाउंटंट असून पुण्यात नोकरी करतात. त्यांची पत्नी ज्योती गुप्ता या सरकारी रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत. हिमांशू यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही काळातच पत्नीच्या वागणुकीबाबत त्यांना संशय येऊ लागला. पत्नी वारंवार वाद घालायची असा त्यांचा आरोप आहे.

तब्येत बिघडल्याने आला संशय

आधी माझ्या वडिलांची तब्येत बिघडली, त्यानंतर आईची आणि नंतर स्वतः त्यांचीही प्रकृती खालावली, असं हिमांशू यांनी सांगितलं. एकाच घरात तिघांची प्रकृती बिघडल्याने आणि तिघांमध्ये समान प्रकारची लक्षणे दिसल्याने हिमांशू यांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर त्यांनी कोणालाही न सांगता घरातील विविध ठिकाणी, विशेषतः स्वयंपाकघरातही त्याने, गुप्त कॅमेरे बसवले.

रेकॉर्डिंगमध्ये जे दिसलं

मात्र त्या कॅमेऱ्यातील कथित रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. आपली पत्नी, ज्योति ही चहा तयार केल्यानंतर त्यामध्ये एका छोट्या बाटलीतून काहीतरी मिसळताना होती, असं दिसल्याचा दावा हिमांशू यांनी केला. याबाबत त्यांनी पत्नीला जाब विचारला असता, तिने उत्तर देण्याऐवजी वाद घातला, असा आरोपही त्यांनी केला. एवढंच नव्हे तर माझ्या आईनेही पत्नीला चहात काहीतरी मिसळताना पाहिल्याचा दावा त्यांनी केला.

यानंतर हिमांशू यांनी स्वतःची, आईची आणि वडिलांची वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यांच्या म्हणण्यानुसार, तिघांच्या तपासणी रिपोर्टमध्ये समान प्रकारची लक्षणं आढळली. त्यांनी हा प्रकार आपल्या मेव्हण्यालाही सांगितल्याचा दावा केला आहे. मात्र 70 लाख रुपये दिल्यास घटस्फोट घेऊन प्रकरण मिटवा नाहीतर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी मेव्हण्याने आपल्याला दिली,असा गंभीर आरोप हिमांशूने केला.

टीव्हीवर क्राईम शो पाहून आखला प्लान

आपली पत्नी टीव्हीवरचे क्राईम शो पहायची आणि त्याप्रमाणेच योजना आखण्याबाबत बोलायची असं म्हणत हिमांशूने आणखी एक गंभीर आरोप बायकोवर लावला. मात्र हे सर्व त्याचे आरोप असून अद्याप तरी त्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. या सर्व घडामोडींनंतर हिमांशू यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीसोबत त्यांनी गुप्त कॅमेऱ्यातील कथित रेकॉर्डिंगही पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.

एका व्यक्तीने आपल्या पत्नीविरोधात चहात कथितरित्या रासायनिक पदार्थ मिसळून तो पाजल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे असं या प्रकरणाबाबत एसीपी दिलीप सिंह यांनी सांगितलं.

Follow Us
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय