Maharashtra News LIVE : जळगाव : गोळी लागून तरुणाचा मृत्यू
Maharashtra News LIVE Updates: भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर अगोदर 8 गुन्हे दाखल आहेत. आता त्याच्याविरोधात आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर खरातप्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशापदावरही पाणी सोडावे लागले आहे.

भोंदूबाबा अशोक खरात याचा पाय अजून खोलात गेला आहे. त्याच्यामागे चौकशीचा ससेमिरा सुरूच आहे. हेल्पलाईन क्रमांकामुळे अनेक महिला त्याच्याविरोधात तक्रारीसाठी सरसावल्या आहेत. खरात विरोधात अगोदर 8 गुन्हे दाखल आहेत. आता त्याच्याविरोधात आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्याविरोधात ईडीसह इतर तपास यंत्रणाही उतरल्या आहेत. त्यामुळे अशोक खरात याला मोठा झटका बसला आहे. त्याच्याविरोधात सातत्याने नवनवीन तक्रारी समोर येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना अगोदर महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून पाय उतार व्हावे लागले होते. आता त्यांनी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची ही राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे ट्रान्सजेंडरसोबतच्या व्हिडिओप्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ यांचा तुर्तास राजीनामा होणार नसल्याचे समोर आले आहे. काल मुख्यमंत्र्यांनीच याविषयीचे संकेत दिले होते. तर राष्ट्रवादीने सुद्धा त्यांना अभय दिल्याचे समोर येत आहे. आखाती युद्धाला तात्पुरता ब्रेक लागला आहे. तर राज्यातील काही पेट्रोल पंप पुन्हा सुरू झाले आहेत. तर इंधनाअभावी काही पेट्रोल पंप बंद पडले आहेत. त्यामुळे ग्राहकांची तारांबळ उडाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती राज्यात स्थिर आहेत. उत्पादन शुल्कात कपातीनंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील ठळक बातम्यांची अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा.
LIVE NEWS & UPDATES
-
खरातला कठोर शिक्षा व्हावी – केसरकर
आमदार दीपक केसरकर यांनी खरात प्रकरणावर बोलताना म्हटले की, ‘झालेली घटना अत्यंत घृणास्पद आहे, त्याचा मी निषेध करतो. या व्यक्तीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी अशी माझी ठाम भूमिका आहे.’
-
धाराशिव : भूम तालुक्यातील बाणगंगा नदीतून नियमबाह्य वाळू उपसा
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुका येथे वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील बाणगंगा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर व डंपरच्या साहाय्याने वाळू काढली जात आहे.
-
-
पंढरपूर : आषाढीच्या नियोजनाची बैठक संपन्न
आषाढी यात्रा नियोजनाची आज पंढरपुरात बैठक झाली, या बैठकीमध्ये 8 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पंढरपुराकडे प्रस्थान होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 24 जुलै रोजी पंढरपुरात येईल. 25 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा होणार आहे.
-
जळगाव : गोळी लागून तरुणाचा मृत्यू
जळगावच्या अमळनेरमध्ये गोळी लागून तरुणाचा मृत्यू झाला आहे. अरुण सुरेश महाजन असे मयत तरुणाचे नाव आहे. तो अमळनेर शहरातील अमलेश्वर नगर भागातील रहिवासी आहे. गावठी कट्टा हाताळताना हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
-
कल्याणमध्ये बाईकची तोडफोड
कल्याणमध्ये बाईकची तोडफोड
कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना
मित्रांसोबत वाद ,संतापलेल्या मद्यधुंद तरुणाने केली बाईकची तोडफोड
घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
-
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेला चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट
बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू व बँकेच्या संचालकांनी केला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार
-
सराफा बाजारात सोन्या, चांदीच्या दरात मोठी वाढ
सराफा बाजारात सोन्या, चांदीच्या दरात मोठी वाढ
सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 600 रुपयांची तर चांदीच्या दरात 3 हजार रूपयांची वाढ
सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 50 हजार 380 रुपये प्रति तोळा
तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 39 हजार 990 रुपयांवर
-
अंबरनाथमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी
अंबरनाथमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी
पेट्रोलटंचाई असल्याची पसरली अफवा
अफवांमुळे अंबरनाथमध्ये पेट्रोल पंपांवर रांगा
पेट्रोलपंप प्रशासनाचे टंचाई नसल्याचे स्पष्टीकरण
-
मित्रासोबत भांडण झाल्यामुळे तरुणाने केली बाईकची तोडफोड
कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत वाद झाल्यानंतर संतापलेल्या मद्यधुंद तरुणाने धक्कादायक पाऊल उचलले. तरुणाने थेट मित्राच्या बाईकची तोडफोड केली आहे. ही घटना CCTV कॅमेरात कैद झाली आहे.
-
वनविभागाचा बिबट्याला रेस्क्यू करण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी
नाशिकमध्ये वनविभागाचा बिबट्याला रेस्क्यू करण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला आहे. बिबट्या झुडपातून बाहेर येत घरांच्या भिंती आड लपला होता. पुन्हा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शोध मोहीम सुरू झाली होती. वनविभागाचा कर्मचारी डार्ट घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी तयार होते.
-
काळा बाजारात जाणारा गॅस आम्ही पाकडला- अंबादास दानवे
काळा बाजारात जाणारा गॅस आम्ही पाकडला, 8 तासानंतर गुन्हा दाखल झाला आहे. रोड विभागाने पोलीस यामध्ये होते मात्र टाळाटाळ करण्यात आली. सदर एजन्सीचा परवाना रद्द करावा अशी मागणी आम्ही केली आहे. मी तर सांगितलं आहे घरपोच गॅस सेवा द्यावी. एकीकडे सरकार घोषणा करतो गॅसची टंचाई नाही पेट्रोलची टंचाई नाही मग हे का निर्माण होत हा प्रश्न आहे असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.
-
महर्षीनगर येथे हातगाडी लावण्यावरून वाद
पुण्यातील महर्षीनगर येथे हातगाडी लावण्यावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की एकावर धारदार शस्राने वार झाला. हॉटेल समोर हातगाडी लावण्याच्या कारणावरून हॉटेल मालकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात हॉटेल मालक व कामगार जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
-
पुण्यात पोलीस भरती दरम्यान धावत असताना युवकाचा मृत्यू
पुण्यात पोलीस भरती दरम्यान धावत असताना युवकाचा मृत्यू..शिवाजीनगर ग्राउंड वरती झाला दुर्दैवी मृत्यू… सोळाशे मीटर रनिंग करत असताना पुरुषोत्तम बुरकुल या युवकाचा मृत्यू… चौथ्या राऊंडला झाला मृत्यू…
-
परभणीत सीईटी परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा परीक्षा केंद्रावर गोंधळ
परभणीमध्ये दुसऱ्या दिवशी देखील बीएड सीईटीची परीक्षा देण्यासाठी परभणीच्या एमजीएम कॉलेज सेंटरवर विद्यार्थी दाखल झाले होते. मात्र परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यासाठी स्टाफ नसल्याने काही तास विद्यार्थ्यांना ताटकळत उभं राहावं लागलं. त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा होणार नाही असे सांगत विद्यार्थ्यांना तिथून काढून देण्यात आलं असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे..
-
गोंदियात अफवांमुळे पेट्रोल पंपांवर रांगा, चौथ्या दिवशीही स्थिती कायम
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या पुरवठ्याबाबत अफवा पसरत आहेत. पेट्रोल-डिझेल मिळणार नसल्याच्या भीतीने शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होते. हे चित्र सलग चौथ्या दिवशी कायम आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तरीही काही पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रम वाढला असून, अनेक ठिकाणी पंप बंद असल्याचे चित्र पाहायला दिसत आहे
-
आंध्रप्रदेशमध्ये दिड किलो सोन्याच्या बॅगची चोरी
आंध्रप्रदेशमधील राऊलपालम पोलिस ठाण्यात तब्बल दिड किलो सोने बॅग चोरीच्या प्रकरणातील आरोपी संतोष डिकोळे यास पकडण्यास आलेल्या आंध्र पोलिसांनी कुर्डूवाडी पोलिसांच्या मदतीने शिंगेवाडीत छापा टाकला.
-
रेल्वेमार्गासाठी केज, बीड व गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करावी लागणार
धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर यांना जोडणारा नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा रेल्वे मार्ग बीड जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या रेल्वेमार्गासाठी केज, बीड व गेवराई तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करावी लागणार आहे.
-
प्रत्येकाला वाचनाची आवड पाहिजे – मुंबई महापौर
“प्रत्येकाने वाचन केलं पाहिजे. प्रत्येकाला वाचनाची आवड पाहिजे. मुंबईतील रहिवाशांनी जास्तीत जास्त या उपक्रमात सहभागी व्हावं असे मी आव्हान करत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. तुम्हाला अनुदान वाढीव पाहिजे. त्याचा मला प्रस्ताव द्या मी नक्की द्यायचा प्रयत्न करीन. मला इथं बोलावलं मला मानसन्मान केला त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे” असं मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या.
-
नाशिक-सातपूर परिसरातील शिवाजीनगरमध्ये शिरला बिबट्या
नाशिक-सातपूर परिसरातील शिवाजीनगरमध्ये शिरला बिबट्या. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची टीम सक्रीय. रेस्क्यू करण्याचे काम सुरू. रेस्क्यू पथक वनविभाग घटनास्थळी दाखल. मानवी वस्तीत बिबट्या घुसल्याने नागरिकांमध्ये दहशतिचे वातावरण. ड्रोनद्वारे बिबट्याचे लोकेश ट्रॅक करण्याचं काम सुरु.
-
..तर तुमचा सिलेंडर बंद – छगन भुजबळ
मुंबई, नाशिक, पुणे पीएनजी सुरु आहे, तिथे त्यांनी घ्यावं. पीएनजी जिथे काम सुरु झालेलं आहे. फार लांबच्या ठिकाणी अजून तिथे लाइन गेली नाही तिथे तुम्हाला सिलेंडर मिळणार. पण तिथे घेऊ शकता आणि तरी सुद्धा घेतला नाही तर तुमचं सिलिंडर बंद. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या इमारतीत पीएनजी नाहीय. मी विचारलं की पीएनजी का नाही, तर त्यांनी सांगितलं की शेजारच्या इमारतीची, महापालिकेची परवानगी नाही. असं जर असेल तर तीन महिन्यात माझा सिलेंडर बंद होणार. या परवानग्यांची आता गरजच नाही अशी ऑर्डर काढली आहे असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
-
जयंत पाटील यांना सह आरोपी करण्याची मागणी
महाविकास आघाडीचं सरकार होतं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी एकत्र असताना प्रांत अध्यक्ष जयंत पाटील होते. त्या ट्रस्टला पाणी देण्यात आलं होतं. आमची मागणी आहे तत्कालीन प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांना सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली आहे. त्यांच्या पक्षातील कोण कोण नेते भोंदू अशोक खरात याच्याकडे जात होते, याची माहिती त्यांनी पक्षामध्ये विचारून करून घ्यावी. अनेक धक्कादायक नाव त्यांच्या समोर येतील.
-
सोळाशे मीटर रनिंग करत असताना पुरुषोत्तम बुरकुल या युवकाचा मृत्यू…
पुण्यात पोलीस भरती दरम्यान धावत असताना युवकाचा मृत्यू झाल आहे, शिवाजीनगर ग्राउंड येथे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोळाशे मीटर रनिंग करत असताना पुरुषोत्तम बुरकुल या युवकाचा मृत्यू झाला. दुर्दैवी मृत्यू झाल्याने पोलीस भरतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
-
चारकोप गावात गॅस सिलिंडरसाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे.
चारकोप गावातील लोकांना अजूनही गॅस मिळत नाहीये; आज सकाळपासून लोक गॅस सिलिंडर घेऊन एचपी गॅस एजन्सीकडे पोहोचत आहेत. प्रचंड गर्दी लक्षात घेता, चारकोप गावातील गॅस एजन्सीजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
-
भोकरदन तालुक्यातील अनवा गावात आजुबाई यात्रा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील अनवा गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आजूबाई यात्रा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न झालाय. यावेळी मोठ्या संख्येने भोकरदन तालुक्यासह वेगवेगळ्या भागातून भाविक भक्तांनी हजेरी लावली होती. अनुवा गावातील आजुबाई यात्रेला सुमारे साडेचारशे वर्षाची जुनी परंपरा लाभली असून तेव्हापासून हा यात्रा उत्सव भक्तीमय पार पडत आहे.
-
एसआयटीचे पथक आणि फॉरेन्सिक व्हॅन ऑकस प्रॉपर्टी या ठिकाणी दाखल
सलग तिसऱ्या दिवशी फॉरेन्सिकच्या पथकाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. सील केलेले अशोक खरात याचे ऑफिस फोकस प्रॉपर्टी पुन्हा उघडले आहे. उद्या अशोक खरात याची पोलीस कोठडी संपणार असून कोर्टात हजर केले जाणार आहे. कोर्टात हजर करण्यापूर्वी पंचनामा करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
-
जालना शहरातल्या नवीन मोंढा परिसरात महापालिकेच्या स्वच्छता पथकाची धडक कारवाई
जालना शहर महानगरपालिका प्रशासनाकडून मागच्या काही दिवसापासून शहराला प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी कडक कारवाईची मोहीम सुरू असून शहरातल्या नवीन मोंढा परिसरात पालिकेच्या स्वच्छता पथकाने छापेमारी केली, यावेळी एका दुकानातून पालिका प्रशासनाच्या स्वच्छता पथकाने सुमारे 10 क्विंटल प्रतिबंधित सिंगल युज प्लास्टिक जप्त केल्या. शिवाय संबंधित दुकानदाराकडून तीस हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे, दरम्यान ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असून कारवाईचा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
-
दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक कारणामुळे विमानाचं लँडिंग झाल्याचं समजतं.
-
पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड आगार प्रमुख सतीश तिडकेंची तडकाफडकी बदली.
बीड एसटी महामंडळाचे आगार प्रमुख सतीश तिडके यांनी एका गुत्तेदाराकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडून बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. सतीश तिडके यांची आगार प्रमुख बीड येथून सहाय्यक यंत्र अभियंता येथील कार्यशाळेत बदली करण्यात आली आहे. सतीश तिडके यांच्या जागी निलेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
-
खरातला सुया टोचून मारले पाहिजे – मुनगंटीवारांचा संताप
चंद्रपूर :- खरातला सुया टोचून मारले पाहिजे. खरंतर खरातला कायद्याने शिक्षा व्हावी, असे मला वाटत असले तरी अशा नराधमांना चौकात उभे करून सुया टोचून टोचून मारले पाहिजे, असा संताप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
-
चारकोप गावात गॅस सिलिंडरसाठी लोकांची प्रचंड गर्दी
चारकोप गावात गॅस सिलिंडरसाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. चारकोप गावातील लोकांना अजूनही गॅस मिळत नाहीये; आज सकाळपासून लोक गॅस सिलिंडर घेऊन एचपी गॅस एजन्सीकडे पोहोचले आहेत. प्रचंड गर्दी लक्षात घेता, चारकोप गावातील गॅस एजन्सीजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
-
भोंदू अशोक खरातची SIT कडून दहाव्या दिवशीही चौकशी सुरू
नाशिक – भोंदू अशोक खरातची एसआयटी कडून आज तब्बल दहाव्या दिवशी चौकशी सुरू आहे. SIT चे पथक अशोक खरातला घेऊन कार्यालयात दाखल झालं. काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत देखील चौकशी होणार आहेत. भोंदूबाबाचे सावकारी व्यवसाय, हवाला रॅकेट याबाबत देखील चौकशी होण्याची शक्यता असून खरातचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासलं जाण्याची शक्यता आहे.
-
ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी
समाजमाध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा आणि बातम्या पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त विक्रीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
-
राज्य उत्पादन शुल्कच्या कुर्डुवाडी विभागातील अधिकाऱ्याचे लाच प्रकरण
‘tv9 मराठी’च्या बातमीनंतर ‘त्या’ लाचखोर अधिकाऱ्याचे निलंबन. बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते सतीश नेटके यांनी याबाबत राज्य उत्पादनच्या अधीक्षकांकडे तक्रार केली होती. संबंधित अधिकाऱ्याने हप्ता मागितलेली ऑडिओ क्लिप आणि फोन पेचे स्क्रिनशॉट दाखवूनही वरिष्ठ अधिकारी कारवाईला टाळाटाळ करत होते. – ‘tv9 मराठी’ने याबाबतचे वृत्त दाखवल्यानंतर तात्काळ आनंद जोशी या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले.
-
भोंदू अशोक खरातने सावकारी व्यवसायात केली मोठी कमाई
सावकारी व्यवहारांमध्ये कोणतीही अधिकृत नोंद नसल्यामुळे सर्व व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर पद्धतीने चालवत असल्याची माहिती….पैसे परत करण्यासाठी विलंब झाला तर तो त्यांच्यावर दबाव टाकाण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करत होता….सावकारी व्यवसायात काही बडे राजकारणी आणि अधिकारी वर्गाच्या सहभागाची असल्याची सूत्रांची माहिती….तर काही मोठ्या भक्तांनी आपला काळा पैसा सावकारी व्यवसायासाठी खरात कडे दिल्याची माहिती
-
ईशान्येश्वर मंदिरात पुजाविधी अखंडीत सुरू
भोंदू अशोक खरात गेल्या 10 दिवसांपासून पोलिस कोठडीत. अशोक खरातची SIT कडून होतेए चौकशी. मात्र ईशान्येश्वर मंदिरात पुजाविधी अखंडीत सुरू. मिरगाव येथील शिवनिका देवस्थाच्या विश्वस्त आणि पुजा-यांचीही चौकशी. एकीकडे चौकशीचा सिसेमिरा असल्याने दुसरीकडे इशान्येश्वर महादेवाची पुजा मात्र नित्यनियमाने सुरू. शिवनिका संस्थानचा पुजारी करतोय दररोजची पुजाविधी. ध्या देवस्थानात केवळ एकमेव पुजारी. सकाळची आरती , पुजा तसेच महादेवाच्या पिंडीभोवताली फुलांची सजावट आदी सुरू…
-
खरातला इतक्या दिवसांपासून कोणी पोसले- सुषमा अंधारे
अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारे आक्रमक भूमिका घेत असून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले, त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, खरातला इतक्या दिवस कोणी पोसले.
-
RTI प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ३ ते ५ किमी अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी कायम आहे. सर्व पात्र पालकांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन नवीन अर्ज सादर करावेत किंवा पूर्वीच्या अर्जांमध्ये आवश्यक दुरुस्ती करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच ही माहिती अधिकाधिक पालकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.
-
खरातच्या संपर्कात सिन्नरचा एक लोकप्रतिनिधी
भोंदू अशोक खरातच्या संपर्कात सिन्नरचा एक लोकप्रतिनिधी असल्याचा अनिसने गंभीर आरोप केला. याच लोकप्रतिनिधीने निवडणुक झाल्यानंतर नाशिकच्या अंबड येथे ठेवण्यात येणार मतदान यंत्र सुरक्षित राहावे म्हणून जादूटोणा केला होता, असा आरोप अनिसने केला आहे.
-
ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना लॉटरी
ठाणे महापालिका, परिवहन सेवा व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना मिळणार सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याची रक्कम देणार असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले. सातव्या वेतन आयोगाचे तीन हप्ते देण्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी काल झालेल्या अर्थसंकल्पीय महासभेत केली. येत्या ३० मार्च 2026 रोजी ही रक्कम ठाणे महापालिका आणि परिवहन कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनात १२ ते १५ टक्यांची वाढ झाली. पण त्यांना मागील सहा वर्षांतील वेतन फरकाची रक्कम पाच टप्प्यात देण्यात येणार आहे. त्यातील दोन हफ्ते यापूर्वी अदा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम अदयाप बाकी असल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यामध्ये नाराजी होती.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस साठी नागरिकांच्या रांगा कायम
छत्रपती संभाजीराजांच्या एपीआय कॉर्नर परिसरात भारत गॅस एजन्सी समोर नागरिकांची गर्दी दिसली. घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिक सकाळी पाच वाजल्यापासून रांगेत उभे आहेत. गॅस एजन्सी सुरू होण्यापूर्वीच नागरिक रांगेत गॅसच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे दिसले. अनेक दिवसापासून बुकिंग करूनही वेळेत गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
-
इराण-अमेरिका- इस्त्रायल युद्ध थांबावं यासाठी चंद्रपुरात विश्वविक्रमी मानवी साखळी
इराण-अमेरिका- इस्त्रायल युद्ध थांबावं यासाठी चंद्रपुरात विश्वविक्रमी मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे. चंद्रपूर येथील सोमय्या ग्रुप ही विश्वविक्रमी मानवी साखळी तयार करणार आहे.”वर्ल्ड पीस सिम्बॉल” मानवी साखळी द्वारे तयार करून नवीन गिनीज विश्वविक्रम नोंदवला जाणार आहे. 2019 साली 1074 विद्यार्थ्यांनी वर्ल्ड पीस सिम्बॉल मानवी साखळी द्वारे तयार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली होती. चंद्रपुरात आज हा रेकॉर्ड मोडण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. हा रेकॉर्ड मोडण्यासाठी तब्बल 2000 विद्यार्थी सज्ज झाले आहेत.
-
तब्बल सहाव्या दिवशी अमरावतीच्या पेट्रोल पंप वरील गर्दी ओसरली
मागील पाच दिवस अमरावतीच्या पेट्रोल पंपांवर होती मोठ्या प्रमाणावर पेट्रोल घेण्यासाठी गर्दी झाली होती. काल सकाळच्या वेळी पेट्रोल पंपवर मोठ्या रांगा लागल्या होत्या. अमरावती शहरातील अजूनही तीन पेट्रोल पंप बंद तरी गर्दी ओसरली आहे.