Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन…दोन्ही NCP च्या विलिनीकरणासंदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठी अपडेट हाती आलीये. सुनेत्रा पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती हाती आली आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीने सस्पेन्स वाढला आहे. सुनेत्रा पवार यांनीही काल जशी वेळ येईल, तशा गोष्टी कळतील, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. सुनेत्रा पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. यासाठी सुनेत्रा पवार यांनी मोठं पाऊल टाकलं आहे.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून दोन्ही गटातील हालचालींना वेग आला आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने विलिनीकरणाच्या चर्चेवर आमदारांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून पक्षातील आमदारांना फोन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून शक्यतेवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांआधी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतील काही आमदार शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शरद पवार रुग्णालयात असताना प्रफुल पटेल यांनी भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली होती. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी शरद पवारांना पुन्हा भेटणार असल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही नेत्यांची लवकरच पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे. तर रुग्णालयातून घरी आल्यानंतर पार्थ पवार यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली होती. पार्थ पवार हे जवळपास दीड तासांहून अधिक वेळ सिल्वर ओक या निवासस्थानी होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील दुरावा कमी होताना दिसत आहे. आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात सुनेत्रा पवार यांनी लक्ष द्यायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून त्यांच्या आमदारांना फोन करण्यात आले. त्यानंतर फोन करून आमदारांची भूमिका जाणून घेण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी पडद्यापासून हालचालींना वेग आल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत दोन्ही राष्ट्रवादीचे नेते काय निर्णय घेणार, याबाबत सर्वांचं लक्ष लागलं आहे.