AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra MLA Portfolio Announcement | बहुप्रतिक्षित खातेवाटप जाहीर, अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी?

Maharashtra MLA Portfolio Announcement | उभ्या महाराष्ट्राचं खातेवाटपाकडे लक्ष लागून राहिलं होतं ते बहुप्रतिक्षित खातेवाटर जाहीर करण्यात आलंय.यामध्ये काही आजी मंत्र्याकडून खातं काढून घेण्यात आलंय.

Maharashtra MLA Portfolio Announcement | बहुप्रतिक्षित खातेवाटप जाहीर, अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी?
| Updated on: Jul 14, 2023 | 4:44 PM
Share

मुंबई | राजकीय विश्वातून अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 आमदारांनी 2 जुलै रोजी  मंत्रिपदाची शपथ घेतली.  तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  त्यानंतर सर्वांचं लक्ष हे खातेवाटपाकडे लागले होते. अनेक दिवस खातेवाटपावरुन खलबंत सुरु होती. या खातेवाटपावरुन गेली अनेक दिवस रात्रीच्या बैठकी सुरु होत्या. या मॅरेथॉन बैठकींनंतर अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या जाहीर करण्यात आलेल्या या खातेवाटपात फेरबदल करण्यात आले आहेत.  त्यानुसार अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. तर अतुल सावे यांच्याकडे असलेलं खातं काढून दुसऱ्या खात्याची जबाहदारी दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. अर्थात दादांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी अर्थ खातं हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते.

मंत्र्यांची नावं आणि खाती

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण धनंजय पंडितराव मुंडे – कृषि सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन उदय रविंद्र सामंत- उद्योग प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.