AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हायवेवर कथित पोलिसाचा मद्यधुंद अवस्थेत डान्स, आमदार संजय गायकवाडांनी कानाखाली जाळ काढला

मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या पोलिसांमुळे ट्राफिक जाम झाला आणि तेवढ्यात औरंगाबाद येथून बुलडाण्याकडे जाणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एका पोलिसाला कानाखाली वाजवली. त्यानंतर 'पोलीस' लिहिलेली पाटी असलेल्या कारमध्ये बसून मद्यपी पोलिसांनी पळ काढला.

हायवेवर कथित पोलिसाचा मद्यधुंद अवस्थेत डान्स, आमदार संजय गायकवाडांनी कानाखाली जाळ काढला
संजय गायकवाडांनी मद्यधुंद अवस्थेतील कथित पोलिसाच्या कानाखाली आवाज काढला
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 06, 2021 | 8:06 AM
Share

बुलडाणा : मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या कथित पोलिसाच्या कानाखाली शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी ‘आवाज’ काढला. बुलडाण्यात देऊळगाव राजा मार्गावरील सरंबा फाट्यावर ही घटना घडल्याची माहिती आहे. पोलिसाची पाटी लिहिलेली कार रस्त्यावर उभी करून काही जण नाचत होते, त्यामुळे ट्राफिकही जाम झाला होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

काय आहे प्रकरण?

मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या पोलिसांमुळे ट्राफिक जाम झाला आणि तेवढ्यात औरंगाबाद येथून बुलडाण्याकडे जाणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एका पोलिसाला कानाखाली वाजवली. त्यानंतर ‘पोलीस’ लिहिलेली पाटी असलेल्या कारमध्ये बसून मद्यपी पोलिसांनी पळ काढला. हा संपूर्ण प्रकार देऊळगाव महीजवळ असलेल्या सरंबा फाट्यावर रविवारी सायंकाळी घडला असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. आपल्या वाहनावावर ‘पोलीस’ अशी पाटी लावून धुडगूस घालणारे हे नेमके कोण होते? आणि अशी पाटी लावणे योग्य आहे का? याबाबत पोलीस विभागाने आता आता चौकशी करणे गरजेचे आहे.

नेमकं काय घडलं?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात भेटून आमदार संजय गायकवाड परत येत होते. त्यावेळी देऊळगाव महीजवळ असलेल्या सरंबा फाट्याजवळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. ट्राफिक जाममधून पुढे जाऊन पाहिले असता रस्त्याच्या मधोमध ‘पोलीस’ अशी पाटी असलेली एम एच 28 एएन 3641 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारसमोर काही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत नाचत होते.

कथित पोलिसाला कानाखाली वाजवल्या

यावेळी चिखली येथून येणारी वाहतूक दूरपर्यंत ठप्प झाली होती. हा प्रकार पाहून बुलडाणा येथील आमदार संजय गायकवाड यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्या कथित पोलिसाला कानाखाली दोन वाजवल्या. अचानक घडलेल्या या प्रकाराने भांबावलेल्या मद्यधुंद व्यक्तींचा डान्स बंद झाला आणि पोलीस लिहिलेल्या पांढऱ्या कारमध्ये बसून त्यांनी पळ काढला. बुलडाणा पासिंग असलेल्या त्या कारद्वारे नेमका कुठल्या पोलीस ठाण्यातील मद्यधुंद पोलीस प्रवास करत होते, याचा उलगडा होणे बाकी आहे.

पाहा व्हिडीओ :

गायकवाडांच्या वक्तव्यांची चर्चा

नागरिकांनी रोग प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मांसाहार सेवन करावा, असं बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते. मात्र या वक्तव्यावरुन ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची दिलगिरीही गायकवाडांनी व्यक्त केली. ज्यांची मनं दुखावली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे. मात्र, ज्यांनी या विषयाचं राजकारण केलं, त्यांची माफी मागणार नाही, असंही संजय गायकवाड म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

आधी म्हणाले मांसाहार करा, आता थेट चिकन बिर्याणी आणि उकडलेली अंडी वाटली, आमदार संजय गायकवाडांनी करुन दाखवलं

VIDEO | गाडीतून उतरले, शर्ट काढत झाड हटवलं, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा ‘बाहुबली’ अवतार

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...