AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार रोहित पवार यांची जोरदार टीका, थेट केली मोठी मागणी..

अजित पवार यांच्या अपघाती निधनावर रोहित पवार सतत आवाज उठवत आहेत. रोहित पवार यांनी काही गंभीर आरोपही केले आहेत. त्यातच रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यातून त्यांनी थेट मोठी मागणी केली.

आमदार रोहित पवार यांची जोरदार टीका, थेट केली मोठी मागणी..
Rohit Pawar
| Updated on: Nov 15, 2026 | 10:27 AM
Share

मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातात कोणीही जिवंत वाचू शकले नाही. अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघातावर गंभीर प्रश्न उपस्थित करताना दिसले. त्यांच्याकडून काही आरोपही करण्यात आले. त्यातच आता रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करत त्यांनी थेट मोठी मागणी केली. रोहित पवार यांनी म्हटले की, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचं अनावरण करणार असल्याचं समजतंय. पुणे जिल्हा परिषदेत सत्ता असल्याने दादांना मानणाऱ्या जिल्हा परिषदेतील नेत्यांनी पुतळा उभारला याबद्दल त्यांचे आभार.

पण अजितदादांमुळं राज्याच्या सत्तेत मंत्रीपदे उपभोगणाऱ्यांना पुणे रिंगरोडला दादांचं नाव असावं असं वाटत नाही का अजितदादांचं राज्याच्या विकासातील योगदान हे अमूल्य होतं तसंच दादा सुमारे दशकभराहून अधिक काळ पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तरी दादांचं नाव एखाद्या मोठ्या प्रकल्पाला देऊ नये, अशी काही व्यक्तींची भूमिका आहे का?

केवळ पुतळा अनावरणापुरतं दादांचं कर्तृत्व सिमीत करण्याऐवजी पुणे रिंग रोडला अजितदादांचं नाव देण्याची आणि दादांच्या अपघाताची CBI चौकशी करण्याची घोषणा शाह साहेबांनी केली तर अधिक बरं राहील, अन्यथा दादांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रिंग रोडला नाव देण्यासाठी आम्ही मोठं आंदोलन उभारू..

सोबतच दादांचा घात की अपघात याबाबतचं सत्य जाणून घेण्याचे आमचे प्रयत्नही चालूच राहतील, असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. रोहित पवार यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहे. अजित पवार यांचा अपघात की घातपात याची चाैकशी करण्याची मागणी रोहित पवार मागील काही दिवसांपासून करत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा ही मागील काही दिवसांपासून रंगत आहे.

Follow Us
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...; 100 ते 150 रायडर्सचा संप
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
Microsoft Services Outage : 36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली माहिती
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
Latur District Bank Election : लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ
CNG Price Hike Mumbai : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ, पहा नवीन दर
गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या...
Mumbai : गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचे सूचना फलक
ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने..
Shivsena : ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!