वयोमर्यादा ओलांडलेल्या MPSC उमेदवारांसाठी संधी, कोण आणि केव्हा करु शकतो अर्ज? वाचा सविस्तर

1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तसा निर्णयही सरकारनं जाहीर केला होता.

वयोमर्यादा ओलांडलेल्या MPSC उमेदवारांसाठी संधी, कोण आणि केव्हा करु शकतो अर्ज? वाचा सविस्तर
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 8:15 PM

मुंबई : कोरोना महामारीत (Corona Pandemic) शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकली नव्हती. त्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडून गेली. या उमेदवारांची शासकीय सेवेची दारंदेखील बंद झाली होती. पण राज्य सरकारने (Maharashtra Government) यावर सहानुभूतीपूर्वक विचार करत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळ विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी एक आदेशही जारी करण्यात आला होता. त्यानंतर अखेर राज्य लोकसेवा आयोगानं (Maharashtra Public Service Commission) एक पत्रक जारी करत अर्ज केव्हा भरता येतील याबाबत माहिती दिली आहे.

कोण अर्जासाठी पात्र?

1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तसा निर्णयही सरकारनं जाहीर केला होता. त्याचप्रमाणे त्याअनुषंगानं आदेशही जारी करण्यात आला होता.

कधी करता येईल अर्ज?

1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावतील वयोवर्यादा ओलांडलेल्यांना आजपासून (27 डिसेंबर) ते पुढील चार दिवस अर्ज सादर करता येऊ शकेल. आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून 31 डिसेंबर 2021 रोजी रात्री 12 वाजण्याच्या अगोदर उमेदवारांना आपले अर्ज सादर करावे लागणार आहेत. या अर्जांसाठीचं ऑनलाईन शुल्कहे देखील 31 डिसेंबरपर्यंत भरावं लागणार आहे. तर एसबीआयमध्ये चलनाद्वारे शुल्क भरायचं झाल्यास चलनाची प्रत 1 जानेवारीपर्यंत घ्यावी लागेल. त्यानंतर 3 जानेवारीपर्यंत बँकेच्या वेळेत चलनाद्वारे शुल्क करण्यास मुदत देण्यात आली आहे.

हे अर्ज सादर झाल्यानंतर त्यांची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या प्रवेशासाठी विचार करण्यात येईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं म्हटलं आहे.

‘त्यांच्या’साठी वेगळी संधी

सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक संवर्गाकरीता अर्ज सादर केलेल्या पण वयामुळे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरता अर्ज सादर करु शखलेल्या उमेदवारांना स्वतंत्रपणे संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. याबाबतची माहितीदेखील लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थावरुन प्रसिद्ध केली जाईल, अशीही माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या –

Anil Parab : ‘एसटी पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचा निर्णय मागे घेता येणार नाही’

Ajit Pawar : बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे, अजित पवारांचा गोपीचंद पडळकरांना सल्ला

Mumbai Corona Update | मुंबईत दिवसभरात 809 नव्या कोरोना रुग्णांची नोद, 3 जणांचा मृत्यू, संकट वाढले ?