AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खेडमध्ये दरडीखाली दोघांचा मृत्यू, नवी मुंबईत चालकाला फिट, तर कल्याणमध्ये भिंत कोसळली; राज्यात पावसाचा हाहा:कार

maharashtra rain update : राज्यात सर्वत्र पावसाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी दरडी कोसळून नागरिकांचे मृत्यू झाल्याचीही घटना घडल्या आहेत.

खेडमध्ये दरडीखाली दोघांचा मृत्यू, नवी मुंबईत चालकाला फिट, तर कल्याणमध्ये भिंत कोसळली; राज्यात पावसाचा हाहा:कार
| Updated on: Jul 07, 2026 | 12:35 PM
Share

मुंबई, नवी मुंबई, पुण्यासह कोकणातही पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. रत्नागिरीच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराने वेढल्याने निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. एकीकडे पावसाचा मारा सुरू असताना रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर कल्याणमध्ये भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. खेड, कल्याणसहित राज्यातील विविध भागात भीषण दुर्घटना घडल्या आहेत. विविध भागात घडलेल्या घटनांची माहिती समोर येत आहे.

खेडमध्ये दरड कोसळून 2 जणांचा मृत्यू

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील दहिवलीमध्ये दरड कोसळून २ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं. त्यानंतर कॅबिनेट मंत्री ऊदय सामंत घटनास्थळी दाखल झाले आहेत. खेड तालुक्यातील दहिवली येथे आज पहाटे कोसळली दरड कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेतून एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. या घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. सकाळी ६ वाजल्यापासून आमदार योगेश कदम घटनास्थळी उपस्थित आहेत. मातीचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

नवी मुंबईत धावत्या बेस्ट बसमध्ये चालकाला फीट

नवी मुंबईच्या वाशीमध्ये नवीन टोलनाक्यावर एक मोठी दुर्घटना घडली. बेस्ट बसच्या चालकाला अचानक धावत्या गाडीत फिट आल्याने बसवरील ताबा सुटला. त्यानंतर बस टोलनाक्यावरील लेन नंबर ६ आणि 7 या दरम्यान बस आदळली. या भीषण अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला आहे. तर बसमधील ३ ते ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. वाशी टोलनाक्यावर हा प्रसंग घडला आहे. किरण जाधव असे बस चालकाचे नाव आहे.

फीट आल्याने चालकाचं वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटलं. बस थेट टोलनाक्याच्या केबिन आणि लेन विभाजकावर जाऊन धडकली. या अपघातात बस चालक किरण जाधव यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. अपघातानंतर तातडीने मदतकार्य करत चालकाला रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलंय.

कल्याणमध्ये आरोग्य केंद्राची भिंत कोसळली

कल्याण पूर्वेतील ड मुख्य प्रभाग कार्यालय परिसरात दुर्गेश इमारतीलगत असलेल्या महापालिकेच्या आरोग्य केंद्राची भिंत कोसळली आहे. या घटनेमुळे इमारतीच्या पंपरूम आणि कार्यालयाचे मोठे नुकसान झालं आहे. आरोग्य केंद्राच्या खालची संरक्षक भिंत कोसळल्याने इमारतीलगतचा काही भाग धोकादायक बनला आहे. त्यामुळे कार्यालयाचा भाग अक्षरशः हवेत लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे. जागा कमकुवत असल्याची आणि येथे भिंत उभारल्यास दुर्घटना घडू शकते, अशी सूचना रहिवाशांनी दिली होती. मात्र पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. या घटनेनंतर स्थानिक शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Follow Us
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक