Vidhan Parishad Election Result : गुलाल कुणाचा? महायुती की आघाडी? थोड्याच वेळात निकाल, धाकधूक वाढली

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतमोजणी होत आहे, ज्याचे निकाल राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नाशिकसह प्रमुख जिल्ह्यांमध्ये उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार असून लवकरच विजयी उमेदवारांची नावे आणि राजकीय समिकरणे स्पष्ट होतील. महायुती आणि महाविकास आघाडीसाठी हे निकाल निर्णायक ठरतील.

Vidhan Parishad Election Result  : गुलाल कुणाचा? महायुती की आघाडी? थोड्याच वेळात निकाल, धाकधूक वाढली
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 22, 2026 | 8:30 AM

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे. विधान परिषदेच्या निवडणुका गेल्या आठवड्यात पार पडल्या असून 11 जागांची मतमोजी होऊन आज निकाल जाहीर होणार आहे. सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड नागपूरचा निकाल, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धारशिव-लातूर, बीडमध्ये मतमोजणी होईल. तसेच परभणी-हिंगोली , छत्रपती संभाजीनगर- हिंगोली, जालन्याचा आज निकाल लागणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होती. दरम्यान 6 जागांवर मतदानाआधीच महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले, तर उर्वलिरत 11 जागांसाठी गेल्या आठवड्यात मतदान पार पडलं असून त्याचा निकाल आज लागणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार असून उमेदावरांचा उत्साह आणि धाकधूक दोन्ही वाढली आहे.

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पारडे जड

सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडणार आहे. सांगली येथील तरुण भारत क्रीडांगण येथे मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार असून ही निवडणूक दुरंगी झाल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे.महायुती भाजपकडून धैर्यशील कदम तर महाआघाडीकडून अभयसिंह जगताप या दोघांमध्ये लढत खऱ्या अर्थाने झाली आहे. 99.89% इतके मतदान झाले असून सांगली खानापूर विटा तालुक्यातील एका मतदाराने गैरहजेरी लावले होते.त्यामुळे 895 पैकी 894 इतके मतदान झाले आहे. सकाळी आठ वाजल्या पासून मतमोजणी सुरु होणार असून जय आणि पराजय कोणाचा हे 11 वाजे पर्यंत चित्र स्पष्ट होईल. यंदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना अवघड वाटणारे निवडणूक शेवटच्या टप्प्यात महायुतीने एक दिलाने लढल्याने थोडीशी सोपी झाल्याचे दिसून आले आहे.पण अंडर करंट असू शकतो अशीही चर्चा मतदारांमध्ये होती.या निवडणुकीमध्ये प्रचार सभा नसून गुप्त बैठका व सेटिंग यावर दोन्ही गटाकडून जोर लावण्यात आला होता आज या विधान परिषदेचा आमदार कोण होणार ते चित्र स्पष्ट होणार आहे. सर्वांचे लक्ष या मतमोजणीकडे आणि निकालाकडे लागलं आहे.

नाशिकमध्येही आज मतमोजणी

नाशिक विधान परिषद निवडणुकसाठी आज मतमोजणीकडे निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रूम हॉलमध्ये मतमोजणी पार पडेल. मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून एकूण 40 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच मतमोजणीसाठी चार टेबलची व्यवस्था केली आहे. पहिल्या फेरीचा निकाल दीड तासात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित होणार, तर कोटा पूर्ण न झाल्यास दुसरी फेरी होणार. मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्हीची कडक नजर असेल. उमेदवार आणि प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि इतर उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज मतमोजणीत होणार.

जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतमोजणी, थोड्यात वेळात निकाल

जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी मतमोजणीच्या आवारात तैनात करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून बंडखोरी तसेच मतदानाच्या पूर्वसंध्येला अपक्ष उमेदवाराचे माघार यामुळे जळगावच्या निवडणुकीत राज्यात चर्चेचा विषय बनली होती. महायुतीचे भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन व महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे शरद तायडे यांच्यात थेट लढत पार पडली. उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज होणार असून निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागला आहे.

नांदेड – विधान परिषद निवडणूकीसाठी होणार मतमोजणी

नांदेड – विधान परिषद निवडणूकीसाठी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 452 पैकी 451 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली. आता आता कोणता उमेदवार विजयी होणार उत्सुकता शिगेला पोहोचली आ

Follow Us