महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना वेग, छत्रपती संभाजीराजे म्हणाले “आम्ही एकत्र…”

"कृषिमंत्री काय करतात, हे अजित पवार यांनी पाहावं, इकडे कृषी मंत्री म्हणायचं आणि दुसरीकडे धिंगाणा घालायचं", अशा शब्दात त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना वेग, छत्रपती संभाजीराजे म्हणाले आम्ही एकत्र...
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 5:13 PM

Maharashtra Vidhansabha election 2024 : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जबरदस्त तयारी सुरु केली आहे. आता सध्या पक्षांच्या बैठका, जागावाटप, सभा, गाठीभेटींना वेग आला आहे. सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महाविकासआघाडी अशा दोन आघाडी आहेत. आता राज्यातील छोटे पक्ष एकत्र येत तिसरी आघाडीसाठीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकींच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष, राजरत्न आंबेडकर व माजी सैनिक, शेतकरी घटकपक्षांना एकत्रित येऊन तिसरी आघाडी स्थापन केली जाणार असल्याचे बोललं जात आहे.

आता छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी परभणीत अतिवृष्टी भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मानवत तालुक्यातील वजूर येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील तिसरी आघाडी स्थापना करण्याबद्दल भाष्य केले.

घरकुलच्या माध्यमातून घर दिले पाहिजे

“अतिवृष्टीमुळे नांदेड, हिंगोली आणि परभणी यापैकी परभणीत जास्त नुकसान झाले आहे. जवळपास 50 टक्के क्षेत्र बाधित झालं आहे. अतिवृष्टी झाली, ठीक आहे. पण आता पुढे पर्याय काय, यावर चर्चा होणं गरजेचं आहे. उद्या परत अतिवृष्टी झाली तर काय याचे उत्तर कोणी देत नाही. ज्यांचे घर पडले त्यांना घरकुलच्या माध्यमातून घर दिले पाहिजे”, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

अतिवृष्टीसारखी भीषण परिस्थितीची संवेदनशील विषय असताना सुद्धा कृषिमंत्री परळीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून काय दाखवता येत हे महाराष्ट्राला शोभणार नाही. एकीकडे स्वतःला कृषिमंत्री म्हणायचं हे माझ्यासाठी शॉकिंग आहे. राज्य शासन गंभीर आहे, असं मला वाटत नाही. एक व्यक्ती म्हणाला मी आत्महत्या करतो. मी त्याला सांगितलं मात्र टोकाचे पाऊल उचलू नये. कृषिमंत्री काय करतात, हे अजित पवार यांनी पाहावं, इकडे कृषी मंत्री म्हणायचं आणि दुसरीकडे धिंगाणा घालायचं, अशा शब्दात त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

तिसऱ्या आघाडीबद्दल संभाजीराजे काय म्हणाले?

यानंतर त्यांना तिसऱ्या आघाडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. आज आम्ही कोणतीही राजकीय चर्चा करणार नाही. शेतकरी आपला केंद्रबिंदू आहे म्हणून आम्ही पाहणी करण्यासाठी आलोय. आमचा हेतू समान आहे. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. बच्चू कडू ही दिव्यांग बरोबरच शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. यामुळेच आम्ही सर्वजण एकत्र आहोत, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.