Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा, हवामान खात्याचा अंदाज; वाचा आठवडाभराचा वेदर रिपोर्ट

| Updated on: Feb 28, 2021 | 12:08 PM

राज्यात तापमानात वाढ झाली असल्याची माहिती पुणे हवामान वेधशाळेकडून देण्यात आली आहे. खरंतर, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं.

Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा, हवामान खात्याचा अंदाज; वाचा आठवडाभराचा वेदर रिपोर्ट
Follow us on

पुणे : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर आता कुठे आठवडाभरापासून वातावरण शांत आहे. अशात आता थंडी संपूर्ण राज्यात उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाल्या आहेत. राज्यात तापमानात वाढ झाली असल्याची माहिती पुणे हवामान वेधशाळेकडून देण्यात आली आहे. खरंतर, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पण आता उन्हाचे चटके पुन्हा बसणार आहेत. (maharashtra weather update from 28 feb till 03 march weather is dry in maharashtra here is detail weather report)

पश्चिम महाराष्ट्रावर आलेल्या कमी दाबाच्या पट्टयानंतर हवामान आता कोरड व्हायला सुरुवात झाली आहे. राज्यात सर्वाधिक तापमान ब्रम्हपुरी इथं आहे. इथं 38.4 अं.से, तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात तापमानात बहुतांश ठिकाणी तापमानात 3 ते 4 अंशाची वाढ झाली आहे. पुढील चार दिवस हवामान कोरडं राहून तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात कुठे कसं आहे हवामान?

उत्तर कोकण – उत्तर कोकणामध्ये मार्चच्या 3 तारखेपर्यंत हवामान कोरडं आहे.

दक्षिण कोकण आणि गोवा – इथं गेल्या दोन दिवसापासून वातवरण कोरडं असून आजही उन्हाच्या झळा बसत आहेत. जिल्ह्यांमध्ये मार्चच्या 3 तारखेपर्यंत हवामान कोरडं असणार आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र – उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये मार्चच्या 3 तारखेपर्यंत हवामान कोरडं आहे

दक्षिण मध्य महाराष्ट्र – इथं आजही वातवरण कोरडं असून मार्चच्या 3 तारखेपर्यंत हवामान कोरडं आहे.

मराठवाडा – इथं मार्चच्या 3 तारखेपर्यंत हवामान कोरडं आहे.

पूर्व विदर्भ – इथं मार्चच्या 3 तारखेपर्यंत हवामान कोरडं आहे.

पश्चिम विदर्भ – पश्चिम विदर्भात मार्चच्या 3 तारखेपर्यंत हवामान कोरडं आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात पूर्व भारतातील राज्यांमध्ये आतापर्यंत कधीही पाऊस झाला नव्हता. परंतु त्या राज्यांमध्ये सध्या पावसाचे ढग दाटून आलेत. त्यामुळे काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. 1 जानेवारी ते 17 फेब्रुवारीच्या कालावधीत झालेल्या पावसाचा सरासरी विचार केल्यास बिहारमध्ये 97 %, झारखंडमध्ये 92 % पाऊस कमी पडलाय, तर पश्चिम बंगालमध्ये 91 टक्के कमी पाऊस पडलाय. त्याशिवाय ईशान्य राज्यांतील जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस कमी झाला आहे.

दरम्यान, हवामानातील उष्णता वाढत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यामध्ये आरोग्याची आणि आहाराची काळजी घ्या. वेळीवेळी पाणी प्या, शरीराला थंड करणाऱ्य़ा भाज्या आणि फळं खा. जेवणाच्या वेळा पाळा आणि शरीराला त्रास होईल असं काहीही खाऊ नका. (maharashtra weather update from 28 feb till 03 march weather is dry in maharashtra here is detail weather report)

संबंधित बातम्या –

संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी भाजपचं राज्यव्यापी ‘नगाडा बजाव आंदोलन’

दहावी-बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय!

आता कोणत्याही क्षणी संजय राठोड यांची विकेट, संजय राऊत यांचे सूचक ट्विट

(maharashtra weather update from 28 feb till 03 march weather is dry in maharashtra here is detail weather report)