आता कोणत्याही क्षणी संजय राठोड यांची विकेट, संजय राऊत यांचे सूचक ट्विट

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड  (Sanjay Rathod) यांची गच्छंती होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे.

आता कोणत्याही क्षणी संजय राठोड यांची विकेट, संजय राऊत यांचे सूचक ट्विट
संजय राऊत आणि संजय राठोड

मुंबई :  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड  (Sanjay Rathod) यांची गच्छंती होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. कारण शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक ट्विट करत राठोड यांच्या राजीनाम्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची एक फोटो ट्विट करत महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो?, असं सूचक तितकंच रोखठोक ट्विट राऊत यांनी केलं आहे.  (Sanjay Raut Tweet Over Sanjay Rathod resignation)

संजय राऊत यांचं ट्विट काय?

“महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन”, असं लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो राऊत यांनी ट्विट केलं आहे. थोडक्यात मुख्यमंत्र्यांच्या वतीने राऊत यांनी ट्विट करत राठोड यांना एकप्रकारे इशारा दिल्याचं बोललं जातंय.

उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी

कालही औरंगाबादेत बोलताना त्यांनी राठोड यांच्या राजीनाम्यावर अगदी परखडपणे भाष्य केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे न्यायप्रिय नेते आहेत. ते मिस्टर सत्यवादी आहेत. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात ते संपूर्ण सत्य जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील. ते कुणालही अन्याय करणार नाहीत आणि कुणाला पाठीशीही घालणार नाहीत, असं ते म्हणाले होते.

विधिमंडळ अधिवेशनापूर्वी राठोड यांचा राजीनामा?

विधिमंडळ अधिवेशनाला आता अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर  विरोधक आक्रमक झाले आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्यासाठी पुढचे 24 तास महत्वाचे असून पक्षानं त्यांना ‘निर्णय’ घेण्याच्या सुचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

संजय राठोड यांचा राजीनाम्यावरुन विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, असा पवित्रा भाजपने घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर मुख्यमंत्र्यांना राजीनाम्यासाठी आजचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजप सभागृहात आक्रमक अंदाजात दिसेल.

संजय राठोड यांच्यासमोरचे पर्याय संपले?

पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप आहेत. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे त्याचं राजकीय महत्वही मोठं आहे. ह्या संपूर्ण प्रकरणात संजय राठोड पंधरा दिवस जनतेसमोर आले नाहीत त्यामुळे संशय जास्त बळावत गेला. समोर आल्यानंतरही त्यांनी थेट शक्तीप्रदर्शन केलं त्यामुळे आघाडीतल्या सहयोगी नेत्यांची नाराजी ओढवून घेतली. त्याच दबावामुळे मातोश्री नाराज झाली. संजय राठोडांनी जातीय आधार घेण्याचा केलेला प्रयत्नही जनतेला रुचलेला नाही. त्याचे पडसाद सोशल मीडियात जोरदार उमटत आहेत. त्यातून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचं दिसतं आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांच्याकडे चौकशी होईपर्यंत पदावरुन दूर हटण्याशिवाय काहीही पर्याय नसल्याचं जाणकारांना वाटतं.

(Sanjay Raut Tweet Over Sanjay Rathod resignation)

हे ही वाचा :

उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी, संजय राठोडांबाबत योग्य तो निर्णय घेतील: संजय राऊत

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश, संजय राठोड म्हणतात….

नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत: संजय राऊत

Published On - 9:46 am, Sun, 28 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI