AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी भाजपचं राज्यव्यापी ‘नगाडा बजाव आंदोलन’

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वन मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी उद्या सोमवारी भाजप राज्यभर 'नगाडा बजाव आंदोलन' करणार आहे. (bjp yuva morcha tomorrow hold agitation against sanjay rathod)

संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी भाजपचं राज्यव्यापी 'नगाडा बजाव आंदोलन'
संजय राठोड, वन मंत्री
| Updated on: Feb 28, 2021 | 10:30 AM
Share

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वन मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी उद्या सोमवारी भाजप राज्यभर ‘नगाडा बजाव आंदोलन’ करणार आहे. भाजप युवा मोर्चाने या आंदोलनाचं आयोजन केलं आहे. (bjp yuva morcha tomorrow hold agitation against sanjay rathod)

पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करावी व वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने 1 मार्च रोजी राज्यव्यापी “नगाडा बजाव आंदोलन” आयोजित केल्याची घोषणा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली आहे. आतापर्यंत विविध माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या 12 ऑडिओ क्लिपमध्ये राठोड यांच्या विरोधात अनेक प्रथमदर्शनी पुरावे आढळले असूनही राठोड यांना अभय दिले गेले आहे. या प्रकरणातच नव्हे तर आघाडी सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षाचे अनेक पदाधिकारी व मंत्री यांची नावे महिला अत्याचार विषयात समोर आलेली असतानाही सरकार फक्त बघ्याची भूमिका घेऊन त्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

तर पुरावे नष्ट होतील

झोपेचे सोंग घेतलेल्या या ‘कुंभकर्ण रुपी’ सरकारला जागे करण्यासाठी युवा मोर्चाच्या वतीने राज्यभरात “नगाडा बजाव” आंदोलन केले जाणार आहे. ऑडिओ क्लिपमध्ये ज्यांची नावे आली आहेत असे सर्वजण अजून मोकाट आहेत, त्यामुळे या प्रकरणातील पुरावे नष्ट होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे ज्यांची नावे आली आहेत अशांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अधिवेशनात विरोधक घेरणार

उद्यापासूनच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात संजय राठोड यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरणार असल्याचं विरोधकांनी आधीच स्पष्ट केलं आहे. राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही विरोधकांनी दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राठोड यांचा राजीनामा घेणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

भाजपच्या महिला मोर्चाचं जोरदार आंदोलन

दरम्यान, भाजपच्या महिला मोर्चाने काल संपूर्ण राज्यात एकाच वेळी जोरदार आंदोलन केलं. चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या. यावेळी राज्य सरकार आणि वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. राज्यात 100 ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. सुमारे 20 हजार महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.कोरोना चे सर्व नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले, असा दावा भाजपने केला आहे. महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस दीपाली मोकाशी आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. आमदार सीमा हिरे यांनी नाशिक येथे आंदोलनाचे नेतृत्व केले. आमदार विद्या ठाकूर, आमदार श्वेता महाले आणि आमदार मनिषा चौधरी याही या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. (bjp yuva morcha tomorrow hold agitation against sanjay rathod)

संबंधित बातम्या:

Video Fact Check: वनमंत्री संजय राठोड यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कधीचा?

मोठी बातमी: भाजप नेते उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांच्या भेटीला; मराठा आरक्षणावर चर्चा?

उद्धवजींना इशारा देतो, सोमवारच्या आत संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही, तर… : चंद्रकांत पाटील

(bjp yuva morcha tomorrow hold agitation against sanjay rathod)

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.