उद्धवजींना इशारा देतो, सोमवारच्या आत संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही, तर… : चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारच्या आत वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर तोंड न उघडणाऱ्या या सरकारला, अधिवेशनातही तोंड उघडू देणार नाही, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी दिला. | Chandrakant Patil

उद्धवजींना इशारा देतो, सोमवारच्या आत संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही, तर... : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे


कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारच्या आत वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा घेतला नाही तर तोंड न उघडणाऱ्या या सरकारला, अधिवेशनातही तोंड उघडू देणार नाही, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी दिला. (BJP Chandrakant Patil ultimatum Cm Uddhav thackeray Over Sanjay Rathod Resignation)

मुख्यमंत्री बाळासाहेबांचे सुपुत्रच नव्हे तर प्रबोधनकारांचे नातू, महिला अत्याचारांवर ते शांत बसू शकत नाहीत

उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्रच नव्हे तर प्रबोधनकारांचे नातू आहेत. महिला अत्याचारांवर ते शांत बसू शकत नाहीत, ते सत्यवचनी आहेत, असं म्हटलं जातं, पण व्यवहारात ते दिसत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

तोंड न उघडणाऱ्या या सरकारला, अधिवेशनातही तोंड उघडू देणार नाही

गेल्या काही महिन्यात मंत्र्यांशी संबंधित अनेक गुन्हे दाखल होत आहेत मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात काहीच भूमिका घेत नाहीत. आता पूजा चव्हाण प्रकरणात जर मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेऊन संजय राठोड यांची हकालपट्टी केली नाही तर तोंड न उघडणाऱ्या या सरकारला, अधिवेशनातही तोंड उघडू देणार नाही, अशी आक्रमक भमिका पाटील यांनी घेतली आहे.

वानवडी पोलिसांचा तपास कुठपर्यंत?

वानवडी पोलिसांनी काय काय तपास केला हे एकदा जाहीर करावं. वानवडी पोलिसांचा आतापर्यंत तपास नेमक्या कोणत्या दिशेने आहे, हे सर्वसामान्य जनतेला कळलं पाहिजे. आतापर्यंतच्या तपासावर पोलिसांनी ऑडिओ क्लिप मध्ये राठोड यांचं नाव नाही हे पाहिलं का?, असं सवालही त्यांनी विचारला.

चित्रा वाघ यांना आताच त्रास द्यायला कसा सुरु झाला

चित्रा वाघ यांना आताच कसा त्रास द्यायला सुरुवात होतो. अनेक मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर कारवाई का नाही. चित्राताई वाघिणी सारख्या आहेत. त्या घाबरणाऱ्या नाहीत. चौकशीची भीती दाखवून त्यांना तुम्ही गप्प बसवू शकणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी ठाकरे सरकारवर केला.

(BJP Chandrakant Patil ultimatum Cm Uddhav thackeray Over Sanjay Rathod Resignation)

हे ही वाचा :

‘चित्रा वाघ वाघीण का बनल्या?’, पूजा चव्हाण प्रकरणाची माजी IPS अधिकाऱ्याकडून चिरफाड!

पवारसाहेब आज मला तुमची खूप आठवण येतेय : चित्रा वाघ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI