AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारसाहेब आज मला तुमची खूप आठवण येतेय : चित्रा वाघ

शरद पवार यांनी माझ्याकडे एफआयआरची प्रत मागितली. ही प्रत नीट वाचल्यानंतर तुझा नवरा या सगळ्यात कुठेच नाही, असे शरद पवार यांनी मला सांगितले. | Chitra Wagh Sharad Pawar

पवारसाहेब आज मला तुमची खूप आठवण येतेय : चित्रा वाघ
एसीबीने ज्याप्रकारने तातडीने गुन्हा दाखल केला त्यासाठी मी गृहमंत्र्यांना तीनदा सॅल्यूट ठोकते. मी पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवत असल्यामुळे माझ्या पतीला अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
| Updated on: Feb 27, 2021 | 12:33 PM
Share

नाशिक: लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (ACB) माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल केल्याची बातमी समजली तेव्हापासून मला शरद पवार (Sharad Pawar) साहेबांची खूप आठवण येत आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले. मला आजही आठवते की, 5 जुलै 2016 रोजी माझ्या पतीवर आरोप झाले. त्यानंतर 7 जुलैला ईदच्या दिवशी मी शरद पवार यांना भेटायला गेले. त्यावेळी शरद पवार यांनी माझ्याकडे एफआयआरची प्रत मागितली. ही प्रत नीट वाचल्यानंतर तुझा नवरा या सगळ्यात कुठेच नाही, असे शरद पवार यांनी मला सांगितले. त्यामुळेच आज सकाळपासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले. (BJP Leader Chitra Wagh on ACB compliant against her husband Kishor Wagh)

चित्रा वाघ शनिवारी नाशिक येथील पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून महाविकासआघाडी सरकारची अक्षरश: लक्तरे काढली. याप्रकरणात मी सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच माझे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी करायची होती तेव्हा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या पतीला घरी येऊन नोटीस दिली. पण आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तर एसीबीला त्यांना कळवावेसे वाटले नाही का? एसीबीकडे माणसे उरली नाहीत का, असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी विचारला.

माझ्या नवऱ्याला रोज टॉर्चर केलं जातंय: चित्रा वाघ

ही लाच घेतल्याचे प्रकरण घडले तेव्हा माझे पती किशोर वाघ घटनास्थळापासून पाच किलोमीटरच्या परिसरातही नव्हते. याप्रकरणात मुख्य आरोपी असलेले गांधी रुग्णालयाचे तत्कालीन महानिरीक्षक गजानन भगत यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांची अजून चौकशीच सुरु आहे. 2011 पासून एसीबीच्या अनेक केसेस पेंडिंग आहेत. पण आता माझ्या नवऱ्यावरच गुन्हा दाखल कसा करण्यात आला, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला.

एसीबीने ज्याप्रकारने तातडीने गुन्हा दाखल केला त्यासाठी मी गृहमंत्र्यांना तीनदा सॅल्यूट ठोकते. मी पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवत असल्यामुळे माझ्या पतीला अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यावर रोज दबाव आणला जातोय, त्यांना टॉर्चर केले जात आहे. पण मला न्यायव्यस्थेवर विश्वास आहे, ती सरकारसारखी मुर्दाड नाही. मी या सरकारला एकटी पुरून उरेन. मी तुमच्यासोबत 20 वर्षे काम केले आहे, हे विसरु नका, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.

मीही शरद पवारांच्या तालमीत तयार, ते संजय राठोडांना पाठीशी घालणार नाहीत : चित्रा वाघ

नुकत्याच पुण्यात झालेल्या पत्रकारपरिषदेतही चित्रा वाघ यांनी शरद पवार यांच्याविषयी विश्वास व्यक्त केला होता. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला, तर ते संजय राठोडला पाठीशी घालणार नाहीत, हे मी विश्वासाने सांगते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही मला हा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील, असा विश्वास : चित्रा वाघ

शिवशाही आहे, मोगलाई नाही, चौरंग करता येत नसेल तर गच्छंती करा, चित्रा वाघांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

(BJP Leader Chitra Wagh on ACB compliant against her husband Kishor Wagh)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.