Chitra Wagh | मीही शरद पवारांच्या तालमीत तयार, ते संजय राठोडांना पाठीशी घालणार नाहीत : चित्रा वाघ

Chitra Wagh | मीही शरद पवारांच्या तालमीत तयार, ते संजय राठोडांना पाठीशी घालणार नाहीत : चित्रा वाघ
भाजप नेत्या चित्रा वाघ, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला, तर ते संजय राठोडला पाठीशी घालणार नाहीत, असं चित्रा वाघ म्हणाल्या (Chitra Wagh Sharad Pawar)

अनिश बेंद्रे

|

Feb 25, 2021 | 12:53 PM

पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन (Pooja Chavan Death Case) भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. पूजाचा मृत्यू झाला, त्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वाघ ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर जोरदार बरसल्या. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संजय राठोड यांना पाठीशी घालणार नाहीत, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. (Chitra Wagh says Sharad Pawar wont support Sanjay Rathod in Pooja Chavan Death Case)

“मीही शरद पवारांच्या तालमीत तयार”

“मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला, तर ते संजय राठोडला पाठीशी घालणार नाहीत, हे मी विश्वासाने सांगते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही मला हा विश्वास आहे.” असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

शरद पवारांच्या नाराजीची चर्चा

संजय राठोड 23 फेब्रुवारीला वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर ते पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले होते. त्यावेळी समर्थकांनी पोहरादेवीवर मोठी गर्दी केली होती. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी नियम पाळा असे आवाहन केले होते. तर दुसरीकडे शिवसेनेचेच मंत्री संजय राठोड यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

“चौरंग करता येत नाही, पण किमान गच्छंती करा”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी आपले सरकार शिवशाहीचं असल्याचं सांगतात. मात्र, हे सरकार शिवशाहीचं आहे, हे आता कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले. शिवशाहीत बलात्काऱ्यांचा चौरंग व्हायचा. आता चौरंग करता येत नाही, पण किमान गच्छंती करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खूप अपेक्षेने बघत आहोत. तुमची छबी तशीच राहू द्या, आम्हाला महाविकासआघाडी सरकारमधील इतर कोणत्या मंत्र्याकडून अपेक्षा नाही, असे चित्रा वाघ यांनी म्हटले. तसेच शक्ती कायद्यात सत्तेत असलेल्या पक्षाचे मंत्री आणि नेत्यांना क्लीन चीट द्यायची, अशी तरतूद आहे का, असा खोचक सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. (Chitra Wagh says Sharad Pawar wont support Sanjay Rathod in Pooja Chavan Death Case)

‘संजय राठोड मिस्टर इंडिया आहेत का?’

संजय राठोड हे राज्यभरात फिरतात. मात्र, पोलिसांना ते दिसत नाहीत. संजय राठोड हे पाच-साडेपाच फुटांचे असतीलच. ते पोलिसांना न दिसायला काय मिस्टर इंडिया आहेत का, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

संजय राठोडांसाठी शिवसेनेचं खास ‘सोशल डिस्टन्सिंग’?

पोहरादेवी येथे गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन करणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत आता शिवसेनेनं (Shivsena) खास ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. संजय राठोड हे बुधवारी नागपुरात दाखल झाल्यानंतर याचा प्रत्यय आला. यावेळी विमानतळावर एकही स्थानिक शिवसैनिक हजर नव्हता. विशेष म्हणजे संजय राठोड हे नागपूरचे संपर्कमंत्री आहेत. तरीही संजय राठोड यांच्या स्वागतासाठी एकही शिवसैनिक न येणे, ही सूचक बाब मानली जात आहे.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील, असा विश्वास : चित्रा वाघ

शिवशाही आहे, मोगलाई नाही, चौरंग करता येत नसेल तर गच्छंती करा, चित्रा वाघांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

(Chitra Wagh says Sharad Pawar wont support Sanjay Rathod in Pooja Chavan Death Case)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें