Video Fact Check: वनमंत्री संजय राठोड यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कधीचा?

राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा त्यांच्या पत्नीसोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:30 PM, 27 Feb 2021
Video Fact Check: वनमंत्री संजय राठोड यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कधीचा?

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आत्ताही तेच होतंय. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा त्यांच्या पत्नीसोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. यात संजय राठोड आणि त्यांची पत्नी एका कार्यक्रमात डान्स करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असताना हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे आणि कुठला आहे याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे. म्हणूनच या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओचा टीव्ही 9 मराठीकडून केलेला फॅक्ट चेक (Fact Check Sanjay Rathod and his wife dancing Viral Video).

संजय राठोड यांच्या या व्हिडीओमध्ये संजय राठोड यांनी सफेद कुर्ता आणि पायजमा घातलेला दिसतोय. तसेच त्यांच्या पत्नीने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलाय. लोकांच्या आग्रहानुसार संजय राठोड आणि त्यांची पत्नी उपस्थितांसमोर एका गाण्यावर ठेका धरतात. यावेळी राठोड यांच्या पत्नी सुरुवातीला लाजतात. मात्र, संजय राठोड स्वतः ठेका धरत पत्नीकडे हात दाखवत त्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहे. यानंतर संजय राठोड आणि त्यांच्या पत्नी काही वेळ एकमेकांच्या हातात हात घेऊन गाण्यावर ठेका धरतात आणि मग ते थांबतात.

संजय राठोड यांचा पत्नीसोबतचा व्हिडीओ पाहण्यासाठी आजूबाजूला त्यांचे अनेक नातेवाईक जमा झाल्याचंही दिसत आहे. यात अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. उपस्थित नातेवाईक देखील दोघांनाही डान्स करताना प्रोत्साहन देतानाही दिसत आहेत.

हा व्हिडीओ कुठला आहे याविषयी अनेकजण वेगवेगळे तर्कवितर्क करत आहेत. चला तर मग हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि कधीही सार्वजनिक मंचावर इतक्या सहजपणाने डान्स करताना न दिसलेल्या या जोडप्याच्या व्हिडीओची माहिती घेऊयात. हा व्हिडीओ संजय राठोड यांच्या पुतण्याच्या लग्नात हळदीच्या कार्यक्रमावेळीचा आहे.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

अरुण राठोडने कबुली जबाब दिलेला ‘तो’ नंबर कुणाचा?, चित्रा वाघ यांच्याकडून आणखी एक गंभीर आरोप; चौकशीची मागणी

उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी, संजय राठोडांबाबत योग्य तो निर्णय घेतील: संजय राऊत

चित्रा वाघ यांच्या पतीचं काय आहे बेहिशोबी मालमत्ता प्रकरण?; वाचा सविस्तर रिपोर्ट

Fact Check Sanjay Rathod and his wife dancing Viral Video