हिवाळी अधिवेशन LIVE | फडणवीसांचा हल्लाबोल, पडळकरांचे ढोल बजाओ

विरोधीपक्षातील आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधीच सरकारला घेरलं

हिवाळी अधिवेशन LIVE | फडणवीसांचा हल्लाबोल, पडळकरांचे ढोल बजाओ
| Edited By: | Updated on: Dec 17, 2020 | 7:01 PM

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाला सुरुवात होण्यारपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह विरोधीपक्षातील आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. तर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधीमंडळाबाहेर ढोल वाजवून त्यांनी ठाकरे सरकारचा निषेध केला.  (Maharashtra Winter Session Mumbai Day 1 Live Updates)