महायुतीचा ‘मास्टरस्ट्रोक’! मध्यरात्रीपर्यंत बैठक, मोठा गेम होणार? ठाकरेंचा उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Maharashtra MLC Election: काल रात्री उशिरापर्यंत महायुतीची बैठक झाली. या बैठकीत महायुती मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आता हा निर्णय काय असू शकतो? जाणून घ्या...

महायुतीचा मास्टरस्ट्रोक! मध्यरात्रीपर्यंत बैठक, मोठा गेम होणार? ठाकरेंचा उमेदवार डेंजर झोनमध्ये?
महायुती
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 30, 2026 | 12:27 PM

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आता शेवटच्या क्षणी अत्यंत नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुतीने (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) आपला एक जादा उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्याने, महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या गटाचा उमेदवार यामुळे ‘डेंजर झोन’मध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाची बैठक आणि रणनीती

काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. या बैठकीचा मुख्य अजेंडा अतिरिक्त मतांचे गणित जुळवून विरोधकांना धक्का देणे हाच होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अतिरिक्त मतांचे गणित

महायुतीकडे सध्या त्यांच्या अधिकृत उमेदवारांना निवडून आणल्यानंतरही काही मतांचा कोटा शिल्लक राहत आहे. याच शिल्लक मतांच्या जोरावर एखादा अतिरिक्त उमेदवार निवडून आणता येईल का, याची चाचपणी महायुतीकडून सुरू आहे. जर महायुतीने हा जादा उमेदवार मैदानात उतरवला, तर निवडणूक बिनविरोध न होता ती अत्यंत चुरशीची होईल.

आज दुपारी ३ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार

विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे येत्या काही तासांत महायुती आपला अतिरिक्त उमेदवार जाहीर करणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Follow Us