AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्यांची खिल्ली उडवून पैसे..; रीलवरून ट्रोल करणाऱ्यांना राहुल रॉयचं सडेतोड उत्तर

'आशिकी' फेम राहुल रॉयचे रील्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. या ट्रोलिंगवर अखेर राहुल रॉयने उत्तर दिलं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित त्याने आर्थिक समस्यांचा खुलासा केला आहे.

दुसऱ्यांची खिल्ली उडवून पैसे..; रीलवरून ट्रोल करणाऱ्यांना राहुल रॉयचं सडेतोड उत्तर
Rahul RoyImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 30, 2026 | 12:13 PM
Share

‘आशिकी’ फेम अभिनेता राहुल रॉय सध्या त्याच्या  काही रील्समुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या रीलमुळे त्याला प्रचंड ट्रोल केलं जातंय. एका कंटेंट क्रिएटरसोबत राहुलने हे रील्स शूट केले असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. असा कोणता नाईलाज होता, ज्यामुळे असे रील्स करावे लागले, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. या ट्रोलिंगवर अखेर राहुल रॉयने प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित त्याने यामागचं कारण सांगितलं आहे. किमान मी मेहनतीने पैसे कमावतोय, दुसऱ्यांनी खिल्ली उडवून नाही, असं प्रत्युत्तर त्याने ट्रोल करणाऱ्यांना दिलं आहे.

राहुल रॉयची पोस्ट-

‘मी माझं काम प्रामाणिकपणे आणि विनम्रतेने करतो. मला काही कायदेशीर प्रकरणांमध्ये पैसे द्यायचे आहेत आणि ही प्रकरणं आजची नाहीत. ही त्यावेळची आहेत, जेव्हा मला ब्रेक स्ट्रोक आला नव्हता. जर तुम्ही माझ्या साधेपणाची किंवा माझ्या समस्यांची खिल्ली उडवत असाल, ट्रोल करत असाल तर हे माझ्याबद्दल कमी आणि तुमच्याबद्दल अधिक सांगतं. जर तुम्हाला खरंच इतकी चिंता असेल तर मला एखादं चांगलं आणि योग्य काम मिळवण्यात मदत करा, जेणेकरून मी माझ्या खटल्यांचे पैसे देऊ शकेन. कमीत कमी मी मेहनत करून पैसे कमावतोय, दुसऱ्यांची खिल्ली उडवून नाही,’ अशा शब्दांत राहुलने सुनावलं.

या पोस्टमध्ये तो पुढे म्हणाला, ‘ब्रेक स्ट्रोकनंतर मला सक्रिय राहणं गरजेचं आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत मला काम करायचं आहे. यामुळे माझा मेंदू सक्रिय राहील आणि मला या जबाबदारीची जाणीव राहील की मी आजसुद्धा काम करतोय. अर्थात याने कधी कधी थोडंफार दु:ख होतं, पण तुम्ही माझं मनोबल तोडू शकत नाही.’

राहुल रॉयसोबतचे हे रील्स डॉ. वनिता घाडगे नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये राहुल त्या महिलेसोबत त्याच्याच लोकप्रिय गाण्यावर अभिनय करताना दिसत आहे. या व्हिडीओमधील राहुलच्या चेहऱ्यावर स्पष्ट संकोचलेपणा दिसून येत आहे. यामध्ये एकीकडे ती महिला त्याच्या आजूबाजूला नाचतेय, फिरतेय आणि प्रेम व्यक्त करतेय, तर दुसरीकडे राहुल तिच्यासमोर एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्ध आणि चेहऱ्यावर कोणत्याही हावभावाशिवाय उभा आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल