जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचं गणित जुळलं! भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचं जागावाटप ठरलं? कुणाला किती जागा?

Jalgaon District Bank Election: जळगाव जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. गुलाबराव पाटलांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचं गणित जुळलं! भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचं जागावाटप ठरलं? कुणाला किती जागा?
Gulabrao Patil Confirms Mahayuti Seat-Sharing Formula
| Updated on: Nov 14, 2026 | 9:03 PM

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजप 10, शिवसेना 7 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा, असा फॉर्म्युला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही याच पद्धतीने जागावाटप होणार आहे. एक-दोन जागा इकडे-तिकडे होऊ शकतात, असे स्पष्ट केले. तसेच एका जागेवर मतभेद असून ते उद्या सायंकाळपर्यंत मिटतील, असेही त्यांनी सांगितले.

पाचोरा, भडगाव, चोपडा आणि मुक्ताईनगर या चार जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती. मात्र, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित मानला जात आहे. उद्या सायंकाळपर्यंत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये उद्या नेमक्या काय घडामोडी घडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Loading...

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्हा बँक निवडणूक निवडणुकीमधील सुमित पाटील, किशोर अप्पांचे चिरंजीव यांचा अर्ज हा वैध ठरला आहे. जिल्हा बँकेत भाजपा 10, शिवसेना 7, राष्ट्रवादी 4 चा फॉर्म्युला जवळपास तसाच आहे. एक-दोन जागा इकडे-तिकडे होऊ शकतात, एका जागेचा तिढा उद्या संध्याकाळपर्यंत संपेल.

भुसावळमध्ये अनिल चौधरी आणि मंत्री संजय सावकारे यांच्यातील वादावर म्हणाले की, ते दोघेही युतीचे लोक आहेत. आमच्या पक्षाच्या माणसाला समज देऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न करू. चाळीसगाव, किशोर पाटील, रक्षा खडसे यांचे वाद आहेत. छोट्या-मोठ्या कुरघोडी होतात. बँकेत वाद मिटवला तसाच इथलाही वाद मिटवू, असं त्यांनी सांगितलं आहे.

ते म्हणाले की, राष्ट्रवादी विलीनीकरण हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी एकत्र यावं की वेगळं राहावं हा त्यांचा विषय आहे. भूकंपाचे धक्के जाणवले याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट आल्यानंतर किती स्केलचा भूकंप होता हे लक्षात येईल. मागे सुद्धा अशाच पद्धतीचा भूकंप आल्याची माहिती कलेक्टरकडून मिळाली होती. भूकंपातून कुठलाही धोका झालेला नाही. कुठलंही नुकसान झालेलं नाही.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, सरकारने सांगितलेलं आहे की कुठल्याही बँकेने वसुलीसाठी तगादा धरू नये. शेतकरी दुष्काळग्रस्त भागात असताना काही गावांमध्ये मायक्रो फायनान्सचे कर्मचारी वसुलीसाठी येत आहेत. सावंतखेडा येथे मायक्रो फायनान्स कंपनीच्या एजंटचा त्रास वाढला आहे. एजंट सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या घरातच बसून राहतात. भीतीपोटी पुरुष मंडळी पहाटेच घर सोडून जातात, अशी परिस्थिती आहे. सक्तीच्या वसुलीसाठी नाही नाही असा आदेश सरकारने दिलेला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us