अख्खं कुटुंबच संपलं, सहा महिन्यांची चिमुरडीही… कंटेनरच्या धडकेमुळे भीषण अपघात, कुठे घडली दुर्घटना ?

| Updated on: Jan 29, 2024 | 10:03 AM

अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल येथे रविवारी कंटेनर आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. कंटनेरच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

अख्खं कुटुंबच संपलं, सहा महिन्यांची चिमुरडीही... कंटेनरच्या धडकेमुळे भीषण अपघात, कुठे घडली दुर्घटना ?
Follow us on

अहमदनगर | 29 जानेवारी 2024 : अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल येथे रविवारी कंटेनर आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. कंटनेरच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातामध्ये आई-वडिलांसह दोन भावडांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यामध्ये सहा महिन्यांच्या चिमुरडीचाही समावेश आहे.

इमामपूर घाटाच्या तीव्र उतारावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनरने पुढे चाललेल्या दोन दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही दुचाकीवरील प्रवासी धाडकन खाली कोसळले. त्यापैकी एका दुचाकीवरून आई-वडील, मुलगा आणि मुलगी असे एकाच कुटुंबातील चार जण बाहेर जात होते, त्यांचा सर्वांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड हे जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर चालक फरार घटनास्थळावरून लगेच फरार झाला. जखमी रुग्णावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पांढरीपूल परिसरात दररोज होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक होत आंदोलनाचा इशारा दिला होता…पण अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून काहीच पावले उचलली जात नाहीत. त्यातच आता आणखी एक जीवघेणा अपघात झाला असून, त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यात भरधाव वेगातील मोटारीची दोन दुचाकींना धडक , पाच जखमी

दरम्यान पुण्यातही एक अपघात घडला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दोन बाईकस्वारारंना धडक दिली. पुण्यातील खडकवासला धरणाजवळ पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत हा अपघात घडला. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत.

हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चौपाटीच्या पुढे ग्रीन थम्बच्या बागेसमोर हा अपघात झाला. अपघातातील कार (एमएच१४- सीके०१३५) ही खडकवासल्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. त्याने विरुद्ध बाजूला जाऊन पानशेतकडे जाणाऱ्या दोन्ही दुचाकींना धडक दिली. यात दुचाकी ऍक्टिवा (एमएच १२- केएम ४९३१) तर रॉयल इनफिल्ड (एमएच १२- एमई ११००) यांना धडकली. त्यानंतर कार समोरील डीआयएटी च्या भिंतीला जाऊन धडकली. यामधील दुचाकी ऍक्टिवा समोरील भागाचा पूर्णपणे चेंदा-मेंदा झाला असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

नागपूरमध्ये व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची जिप्सी उलटली

नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची जिप्सी उलटून अपघात झाला. यामध्ये जिप्सीचा चालक आणि गाईड किरकोळ जखमी झाला आहे. मात्र – अपघाताच्या वेळेस परिसरात वाघ नसल्याने मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, जिप्सी मागे घेताना घेताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला, त्यावेळी जिप्सीमध्ये पाच-सहा प्रवासी होते. या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे.