AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर जोक… डॉ. सेजल पवारवर कठोर कारवाई, प्रवेशबंदी आणि… केईएम रुग्णालयाने घेतला मोठा निर्णय

कॉमेडियन प्रणित मोरे याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. यादरम्यानच त्याच्या शोमध्ये उपस्थित झालेल्या KEM रुग्णालयाच्या डॉक्टरावरही मोठी कारवाई करण्यात आली. आता KEM रुग्णालय प्रशासनाने थेट मोठा निर्णय घेतला.

मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर जोक... डॉ. सेजल पवारवर कठोर कारवाई, प्रवेशबंदी आणि... केईएम रुग्णालयाने घेतला मोठा निर्णय
Sejal Pawar
| Updated on: Jun 13, 2026 | 2:09 PM
Share

कॉमेडियन प्रणित मोरे चांगलाच अडचणीत सापडला आहे. प्रणित मोरे याच्या शोमध्ये कशाप्रकारे अश्लील गोष्टी बोलल्या जात आहेत, हे स्पष्ट झाले. याबाबतचे व्हिडीओही व्हायरल झाली आहेत. केईएममधील डॉक्टरने थेट मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल धक्कादायक विधान केले. गृह विभागाकडून प्रणित मोरे याच्या आतापर्यंतच्या सर्व अपलोड व्हिडीओची चाैकशी केली जाणार आहे. तसे आदेश देण्यात आली. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच प्रणित मोरे याने अखेर हात सोडले. त्याने झालेल्या प्रकरणात माफी मागितली. फक्त माफीच नाही तर KEM रुग्णालयातील डॉक्टर आणि त्या मुलाला आपण रोखू शकलो असतो म्हणत त्याने म्हटले. मला एक संधी द्या… मी चांगला व्यक्ती असल्याचेही प्रणित मोरे याने म्हटले. प्रणित मोरे याच्या शोमध्ये डॉक्टर सेजल पवार पोहोचली होती. यादरम्यान तिने थेट मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल हैराण करणारे विधान केले. विशेष म्हणजे यादरम्यान एकदम अश्लील बोलले जात होते.

व्हायरल व्हिडीओची दखल KEM रुग्णालय प्रशासनाने घेतली. सेजल पवार हिच्या व्हिडीओची चाैकशी करण्यात आली. एक समिती स्थापन केली. त्यात सेजल पवार दोषी आढळली. सेजल पवार हिला KEM रुग्णालयातून काढून टाकावे, अशी मागणी जोर धरत असताना KEM रुग्णालयाच्या प्रशासनाने तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत दिले होते. यादरम्यान आता मोठी अपडेट पुढे येत आहे.

कॉमेडी शोमध्ये मृतदेहासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मेडिकलची विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिच्यावर अखेर  KEM रुग्णालय प्रशासनाची कारवाई केली. 15 दिवसांसाठी सेजल पवार हिला कॉलेजमध्ये येण्यापासून मज्जाव केला. कॉलेजमध्ये येता येणार नाही, क्लासेसला हजर राहता येणार नाही. ही तिच्यावर मोठी कारवाई करण्यात आल्याचे बोलले जातंय.

चाैकशीमध्ये सेजल पवार दोषी आढळून आली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आज सेजल पवार हिला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात सोपवण्यात आले. प्राथमिक चौकशीत व्हायरल व्हिडिओमध्ये असणारी व्यक्ती सेजल पवारने व्हिडिओमध्ये करण्यात आलेली वक्तव्ये प्रथमदर्शनी चुकीची असल्याचे मानण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेने सेजल पवारला 15 दिवसांची सक्तीची रजा (फोर्स लीव्ह) देण्याचा निर्णय घेतला आहे.

या कालावधीत त्यांना केईएम रुग्णालय परिसर, वैद्यकीय महाविद्यालय तसेच वसतिगृहात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पुढील 15 दिवस ती महाविद्यालयातील कोणत्याही शैक्षणिक किंवा इतर उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. या संपूर्ण वादामुळे मानसिक स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन संस्थेने त्यांना समुपदेशन (काऊन्सेलिंग) घेण्याचा सल्ला दिला आहे.

कोणत्याही प्रकारच्या नैराश्य किंवा मानसिक तणावाचा सामना करावा लागू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.. या समितीत एक निवृत्त वरिष्ठ प्राध्यापक, एक वरिष्ठ पत्रकार आणि वैद्यकीय महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांचा समावेश असेल.ही समिती संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून व्हायरल व्हिडिओ, त्यासंबंधित तथ्ये तसेच त्याचे परिणाम यांचा अभ्यास करणार असून, सात दिवसांच्या आत अहवाल सादर करणार आहे.

Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त