बीडमध्ये सीएनजी भरण्यावरून मोठा राडा, बेदम मारहाण, थेट पोलिसासमोरच..
बीडमध्ये CNG भरण्यावरून मोठा वाद झाला. हा वाद इतका जास्त विकोपाला केला की, दोन मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांनाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

CNG भरण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. टोळक्याने पोलिसांसमोरच दोन तरुणांवर हल्ला चढवला. लाढ्या काठ्यांनी हल्ला करत मारहाण केली. केज पोलिसात चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. केज शहरातील धारूर चौकातील देशमुख पेट्रोल पंपावर काल दुपारी शहरात दहशत पसरवणाऱ्या टोळक्याने दोन तरुणांवर लाठ्या-काठ्यांनी अचानक हल्ला चढवला. आरोपी CNG भरण्यासाठी नंबरने न येता थेट आले. याच कारणावरून दोन तरूणांनी त्यांना बोलले. या टोळक्याने थेट बेदम मारहाण केली. नंबरने या असे म्हणाल्यावरून वाद झाला आणि मारहाणीस सुरूवात केली. यानंतर आरोपींनी ऋषिकेश बोबडे आणि अनिकेत बोबडे या दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
या प्रकरणात केज पोलिसात साहिल बाबा शेख, विकी लांडगे, बालु रांजनकर आणि अज्ञात एक अशा चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला असून यामध्ये एक पोलीस कर्मचारी दिसत आहे. बेदम मारहाण टोळक्याने केली.
दरम्यान यापूर्वी देखील यातील मुख्य आरोपीवर गुन्हा नोंद झाल्यानंतर नोटीस देऊन सोडण्यात आले होते, आता कडक कारवाईची मागणी करण्याची मागणी केली जात आहे. फक्त CNG भरण्याच्या वादावर ही धक्कादायक घटना घडली. घटनेचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल झाला. हैराण करणारे म्हणजे ज्यावेळी ही मारहाणीची घटना घडली, त्यावेळी व्हिडीओत एक पोलिसही उपस्थित दिसत आहे.
पोलिसांचाही धार राहिला नसल्याचे या व्हिडीओवरून दिसत आहे. धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्गमध्ये बँकिंग क्षेत्राला हादरवणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँक व्यवस्थापकाच्या संगनमताने बनावट सह्या आणि कागदपत्रांचा वापर करून खातेदाराच्या बँक खात्यातून तब्बल 6 कोटी 40 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, खातेदाराच्या खात्याशी संबंधित ई-मेल आयडी दोन वेळा बदलण्यात आला, तर दुसरीकडे 72 लाख रुपये किमतीचे रोलर आणि पेव्हरचे सेन्सरही परत न करता हडप केल्याचा आरोप आहे.