ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे १७ मजली इमारतीला मोठी आग, एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पोहचून रहिवाशांना दिला दिलासा

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रहेजा गार्डन मधील एका १७ मजली इमारतीला आग लागली असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झालेली नाही.

ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे १७ मजली इमारतीला मोठी आग, एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पोहचून रहिवाशांना दिला दिलासा
fire breaks out in a 17 storey building in wagle estate
| Updated on: Nov 09, 2026 | 12:01 AM

ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरातील रहेजा गार्डन मधील ‘कार्लाइल’ या १७ मजली इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीचे वृत्त मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटना स्थळी बचाव कार्य सुरु केले आहे. या इमारतीला आग लागल्यानंतर परिसरास खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव मोहिमेची माहिती घेत अधिकाऱ्यांना सूचना देत रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत अद्यापर्यंत कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीचे झळ अनेक मजल्यांना बसल्याने खळबळ उडाली आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रहेजा गार्डन मधील एका १७ मजली इमारतीला आग लागली असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झालेली नाही.या घटनेनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने, जम्बो वॉटर टँकर आणि आपत्ती प्रतिसाद पथक दाखल झाले असून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

Loading...

एकनाथ शिंदे यांची घटनास्थळी धाव

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डन येथील एका सतरा मजली इमारतीला आग लागल्याचे कळल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटना स्थळी धाव घेतली. शिंदे यांच्या सोबत यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार रविंद्र फाटक आणि वरिष्ठ अधिकारी देखली उपस्थित होती. एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी नागरिकांना दिलासा देत बचाव मोहिमेतील अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

डोंगरीतील हाजी कासम चाळ परिसरात दुकानांना आग

डोंगरी पोलिस स्थानकाच्या समोर असलेल्या दुकानांना मोठी भीषण आग लागल्याची घटना १०.१२ वाजताच्या सुमारास लागली. या घटनेत दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगरीतील हाजी कासम चाळ, डॉ.महेश्वरी रोड, दत्त मंदिराजवळ ही आग लागली असून या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाच्या जवानांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न रात्री उशीरापर्यंत सुरु होते.

मुंबईतील डोंगरी भागातील डॉ. माहेश्वरी रोडवरील हाजी कसम चाळीत रविवारी रात्री भीषण आग लागली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरु केले.  सुरुवातीला दत्ता मंदिराजवळील चाळीतील एका गॅरेजला आग लागल्याची माहिती मिळाली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आग पसरू लागल्याने अग्निशमन दलाने रात्री १०.१० वाजता या घटनेला लेव्हल-२ कॉल म्हणून घोषित केले. परिस्थिती हाताळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रतिसादाचा भाग म्हणून मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका आणि वॉर्ड कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.

विरार येथे निवासी इमारतीला आग

विरार पश्चिम मधील एचडीआयएल कॉम्प्लेक्समधील एका निवासी इमारतीत रविवारी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास मोठी आग लागली. पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये लागलेली ही आग झपाट्याने पसरली आणि आगीच्या ज्वाला वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचल्याने मोठे नुकसान झाले आहे. या आगीचा कॉल मिळाल्यानंतर अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी आग विझवण्याचे काम सुरू केले. आगीची तीव्रता वाढतच असल्याने, गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us