मोठी बातमी ! चर्चगेटजवळ आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग, चहूकडे धुराचे लोट

मुंबईतील चर्चगेटजवळील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग लागली . अग्निशमन दलाच्या जवळपास 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मोठी बातमी ! चर्चगेटजवळ आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग, चहूकडे धुराचे लोट
चर्चगेटजवळच्या आयकर विभागाच्या कार्यालयात लागली आग
| Updated on: Aug 17, 2026 | 10:29 PM

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. चर्चगेट स्टेशन जवळच्या आयकर विभागाच्या कार्यालयाला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवळपास 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  अग्निशन दलाच्या जवनांकडून ही आग विझवण्याचे, ती आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशामुळे लागली ते कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.

चर्चगेट  स्टेशनजवळ असलेल्या आयकर विभागच्या कार्यालयाला लागलेल्या आगीमुळे चहूकडे धुराचं साम्राज्य पसरल आहे. नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. आग लागली तेव्हा आयकर विभागाच्या कार्यालयात काही कर्मचारी देखील  होते, मात्र आगीचे वृत्त समजताच त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे काहीशी धावपळ उडाली होती. आता कार्यालयात आणखी कोणी अडकलं का याचा शोध घेतला जात असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसून प्रयत्न केले जात आहेत. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

Loading...

नेमकं काय घडलं ?

चर्चगेट स्टेशनजवळच आयकर विभागाचं मोठं कार्यालय आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यालयाच्या तळमजल्यावरच सोमवारी दुपारी ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केलं.  आगीमुळे धुराचे मोठमोठाले लोट कार्यालयातून बाहेर पडताना दिसले, आगीने मोठा पेट घेतला असून हळूहळू ती संपूर्ण तळमजल्यावर पसरत गेली. अग्निशामक  दलाच्या 8 गाड्या या घटनास्थळी पोहोचल्या असून त्यांनी तातडीने आग विझवण्याचं काम सुरू केलं.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार 

ज्या आयकर विभागच्या कार्यालयाला आग लागील, तेथील काही प्रत्यक्षदर्शींनी त्यावेळची माहिती दिली. त्यांच्या सांगण्यानुसार, एक तासाभरापूर्वी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. जेव्हा वायर पेटते, तेव्हा पहिले त्या वायरीचा वास येतो. त्या धुराचा वास आला आणि समजलं की आग लागल्ये, असं एकाने सांगितलं.  या कार्यालयातील बेसमेंटमध्ये 10 नंबर रूमला आग लागली , मात्र सुदैवाने ही आग अजून पहिल्या माळ्यापर्यंत वगैरे पोहोचलेली नाही . इन्कम टॅक्स कार्यालयाला खाली बेसमेंट आहे, तिथल्या 10 व्या रुमला आग लागली आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

आग लागल्यावर पहिल्या मजल्यावर दोन जण अडकले होते, पण ते कर्मचारी नव्हते, घाबरून ते एका रुममध्ये बसले होते, असंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.  त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.  अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान इनकम टॅक्सच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काही जण अडकले असून त्यांचं अग्निशमन दलाच्या जवानकडून रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीमुळे चहूकडे धुराचे लोट असून काळ्या धुराचं साम्राज्य पसरलं.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us