केतन अग्रवाल प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट! चेतन आणि सिया गोयल यांनी राजस्थानच्या..
केतन अग्रवाल प्रकरणात एका मागून एक मोठे खुलासे होत आहेत. त्यातच पोलिसांनी चेतन आणि सिया यांच्या लग्नाच्या फोटोवरून तपास केला. त्यातच पोलिसांना मोठी माहिती मिळाली. केतन अग्रवाल प्रकरणानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांनी अखेर चार्जशीट दाखल केले. केतन अग्रवाल याचे लग्न सिया गोयल हिच्यासोबत ठरले होते. लग्नाची जोरदार तयारी घरात सुरू होती. मात्र, सिया गोयल हिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. घरच्यांना हे सांगण्याऐवजी लोहगडाहून थेट केतन याला ढकलून सियाने दिले. याप्रकरणात एका मागून एक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. केतनचे कुटुंब न्याय मागत आहे. त्यातच केतन अग्रवाल प्रकरणाच्या तपासात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित गुप्त विवाहाचा मुद्दा समोर आला आहे. राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरात दोघांनी लग्न केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी तपास केला. मात्र, राजस्थानमध्ये चौकशी करूनही लग्नाची अधिकृत नोंद किंवा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
सिया गोयल हिच्या भांगेत सिंदूर आणि चेतनच्या गळ्यात फुलांचा हार असलेला फोटो आरोपींच्या मोबाईलमधून मिळाल्याचे सांगण्यात येत असून, हा फोटो पोलिसांनी दोषारोपपत्रासोबत न्यायालयात सादर केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या तपासानुसार सिया आणि चेतन यांच्यात ऑक्टोबर 2025 पासून जवळीक होती. डिसेंबरमध्ये दोघे मित्रांसोबत राजस्थानला गेले होते. त्यानंतर सियाचे केतन अग्रवालसोबत लग्न ठरले आणि 19 फेब्रुवारी 2026 रोजी साखरपुडा झाला.
मात्र, पोलिसांच्या आरोपानुसार त्यानंतर केतनच्या हत्येचा कट रचण्यात आला. 31 मे रोजी लोहगड किल्ल्यावरून केतनला दरीत ढकलण्याची कल्पना पुढे आली, असा पोलिसांचा दावा आहे. 14 जूनचा प्रयत्न फसला आणि 18 जून रोजी केतनला सुमारे 400 फूट खोल दरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे.
खून केल्यानंतर चेतन जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी गेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. या फुटेजमुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. चेतन आणि सिया यांच्याकडून अनेकदा केतनला मारण्याा प्रयत्न झाला. मात्र, दरवेळी तो थोडक्यात वाचत होता. केतन अग्रवाल याच्या निधनाचा धक्का त्याच्या आजोबांना बसला आणि त्यांनीही जगाचा निरोप घेतला.