AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांना मोठा झटका, मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली, अपडेट काय?

Manoj Jarange Mumbai Agitation: आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या मुंबईतील 19 सप्टेंबर रोजीच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे

मनोज जरांगे यांना मोठा झटका, मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली, अपडेट काय?
मनोज जरांगे पाटील, आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारलीImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 13, 2026 | 2:21 PM
Share

Manoj Jarange Mumbai Agitation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मोठा झटका बसला. 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे हे उपोषण करणार होते. पण आझाद मैदान पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. आमित सहानी या प्रकरणात जे मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. त्याचा दाखला देत पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. ही बातमी धडकल्यावर जरांगे पाटील हे सुद्धा इरेला पेटल्याचे दिसून आले. त्यांनी मुंबईत जाणारच असा खणखणीत इशारा सरकारला दिला आहे.

मुंबई पोलिसांनी का नाकारली परवानगी?

मुंबई पोलिसांनी परवानगी का नाकारली याविषयीचे कारण दिले आहे. गंगाधर काळकुटेंच्या नावाने पत्र दिले आहे. जरांगेच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे आझाद मैदान पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मनोज जरंगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारताना आझाद मैदान पोलिसानी गेल्यावर्षी अटी शर्तींचा भंग केल्याचा दाखला देण्यात आला आहे. गेल्यावर्षी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात आंदोलन करताना नियम व अटींचा भंग केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

आझाद मैदान पोलिसांच्या पत्रातील मुद्दा काय?

“मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात आझाद मैदान, मुंबई येथे प्रस्तावित आंदोलन, उपोषण व धरणे” याबाबतचा आपण केलेला अर्ज 12 सप्टेंबर रोजी प्राप्त झाला. ज्याअर्थी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क वर्ष 11, अंक 30, मंगळवार, ऑगस्ट 26 2025/भाद्रपद , शके 1947, असाधारण क्रमांक.45, प्रधिकृत प्रकाशन अन्वये जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या अधिकार क्षेत्रात) नियम 2025, ही नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये आंदोलकांना सार्वजनिक सभा, संमेलने, मोर्चे, आंदोलने, निदर्शने, धरणे, मेळावे, मिरवणुका इत्यादीसाठी आझाद मैदान (भाग), निश्चित करण्यात आला आहे. ज्याअर्थी, जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, 2025 च्या नियम क्र. 11 (ड) नुसार आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती, आत्मदहनाचा प्रयत्न करणार नाही किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा उपोषण करणार नाही असे नमुद करण्यात आले आहे.

परंतु आपण आज दि.12/09/2026 रोजी अंतरवाली सराटीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये जाहिर केलेले आहे कि, “खोपोली फायनल पकडुन चला, पाचव्या दिवशी आपण सकाळी 10:00 वा. आझाद मैदानला आमरण उपोषन सुरू करतोय”. तसेच आपण केलेल्या अर्जामधील नमुना ‘अ’ मधील परिच्छेद क. 6 मध्ये “आंदोलन व आमरण उपोषन” असे नमुद केले आहे. मागील वर्षी आपण दि.29/08/2025पासुन पुढे अनिश्चीत कालावधीसाठी आमरण उपोषन सुरू केले होते. यातुन माझी खात्री झालेली आहे कि, तुम्ही “जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, 2025 च्या नियम क्र. 11 (ड)” या नियमाचा भंग करणार आहे. ज्याअर्थी, सदर नियमावलीच्या नियम क्र. 4(6) (च) मध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की, “कोणत्याही आंदोलनास, एकाच वेळी फक्त एकच दिवसासाठी परवानगी देण्यात येईल. शनिवार, रविवार व इतर शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही. तसेच नियम क्र. 10मध्ये आंदोलनाची वेळ सकाळी 9:00 वा. ते सायंकाळी 6.00 वा. अशी निश्चीत करण्यात आलेली आहे. नियम क्र. 11 (झ) संध्याकाळी 6.00 वा. विनिर्देशित क्षेत्र रिकामा करण्याबाबत नमुद आहे, अशी कारणं या पत्रात देत आंदोलन आणि उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली आहे.

Follow Us
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत