मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट, अभिजीत दिपके यांना धक्का, थेट..
कॉकरोच जनता पार्टीला मोठा धक्का बसला. पक्षात उभी फूट पडली. हेच नाही तर अभिजीत दिपके यांच्याविरोधात गंभीर आरोपही करण्यात आले, ज्याने एकच खळबळ उडाली. अरविंद केजरीवाल यांचे नाव घेत हे आरोप करण्यात आलीत.

कॉकरोच जनता पार्टीचे अभियान स्कूल ठीक करो सध्या सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन देशभरात सुरू केले. नीट पेपरफुटीविरोधात हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. आता कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट पडल्याचे बघायला मिळतंय. हा अभिजीत दिपके यांना मोठा झटका म्हणावा लागेल. कॉकरोच जनता पार्टीसोबत जोडलेल्या आंदोलकांनी अखेर वेगळी चूल मांडली आहे. हेच नाही तर यादरम्यान काही गंभीर आरोपही केले. अरविंद केजरीवाल यांची पार्टी बनल्याचेही त्यांनी म्हटले. मनीष भह्यभट्ट नावाच्या युवकाने कॉकरोच जनता पार्टी डेमोक्रेटिक स्थापनेची घोषणा केली. अहमदाबाद येथील मनीष ब्रह्यभट्ट दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनात दाखल झाले होते. मात्र, सीजेपी विकली गेली असून केजरीवाल यांची पार्टी म्हणून राहिल्याचे त्यांनी म्हटले.
केजरीवाल टीम बनून राहिल्याचे त्यांनी म्हटले. हेच नाही तर अभिजीत दिपके यांनी आपल्या टीममध्ये फक्त मैत्रिणींचा भरणा केल्याचेही यादरम्यान त्यांनी म्हटले. अभिजीत दिपके यांनी 12 लोकांची टीम तयार केली. यादरम्यान त्यांनी मूळ लोक जे आंदोलनासोबत जोडले होते, त्यांना बोलावले नाही. आम आदमी पार्टीशी जोडलेल्या आठ लोकांना त्यांनी संधी दिली स्वत:च्या मैत्रीणी आणि कॉलेजच्या मित्रांना त्यांनी यात घेतले.
अभिजीत दिपके यांनी आपल्याला पक्षाच्या बैठकीला बोलावले नसल्याने हेच गुजरातचे कार्यकर्ते आंदोलनाला बसले होते. त्यातच आता त्यांनी मोठा झटका दिला. ही टीम बनवण्याची मूळ कल्पना अरविंद केजरीवाल यांचीच असल्याचेही ब्रह्यभट्ट यांनी म्हटले. ते सुरूवातीपासूनच फसवणूक करत आहेत. अन्न हजारे यांचे उपोषण सुरू असतानाही या लोकांनी हेच केले.
अन्नांच्या उपोषणाचा वापर यांनी स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी केला. पुन्हा एकदा उभारलेले आंदोलन यशस्वी झाल्यावर केजरीवाल यांनी अभिजीत दिपके यांच्यासोबत डील करून हे आंदोलन हायजॅक केले. हा एक अभिजीत दिपके यांना मोठा झटका नक्कीच म्हणावा लागेल. अभिजीत दिपके यांच्या पक्षात उभी फुट पडल्याचे बघायला मिळतंय.