मालेगावचे विख्यात शायर, इतिहास संशोधक डॉ. इलियास सिद्दीकी यांचे निधन

| Updated on: Nov 03, 2021 | 4:28 PM

मालेगावचे विख्यात शायर, कवी, इतिहास संशोधक डॉ. मुहम्मद इलियास मुहम्मद हनीफ सिद्दीकी उर्फ कवी वसीम यांचे निधन झाले.

मालेगावचे विख्यात शायर, इतिहास संशोधक डॉ. इलियास सिद्दीकी यांचे निधन
डॉ. इलियास सिद्दीकी.
Follow us on

नाशिकः मालेगावचे विख्यात शायर, कवी, इतिहास संशोधक डॉ. मुहम्मद इलियास मुहम्मद हनीफ सिद्दीकी उर्फ कवी वसीम यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

डॉ. सिद्दीकी यांची ओळख हिंदू-मुस्लिम सदभावनेचे खंबीर पुरस्कर्ते, पुरोगामी चळवळीतील नेता अशी होती. त्यांनी नगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली. सोबतच बी.ए., बी.एड., एम. ए., एल.एल.बी., एल.एल.एम. या शिक्षणासह पीएच.डी. देखील केली. ते दोन हजार साली जमहूर हायस्कूल आणि ज्यूनियर कॉलेजमधून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. डॉ. सिद्दीकी यांच्या लेखनाची सुरुवात ही कथा लेखनाने झाली. त्यांनी दैनिक इन्कलाब, दै. हिंदुस्थानमध्ये केलेले कथालेखन विशेष गाजले. मालेगावमधील साप्ताहिक अस सबीलमध्ये ते ‘जिंदा दिल की कलम से’ हे हास्य सदर लिहित असत. हे सदरही खूप लोकप्रिय ठरले.

कविता लेखन ते संशोधन

डॉ. सिद्दीकी यांनी कथा, कविता, शेर आणि गझल लेखन केले. अनेक जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांचे सादरीकरण ऐकण्यासाठी रसिकांची पसंती असायची. त्यांनी ‘मालेगाव मे उर्दू नस्त्रनिगारी’ हा शोधप्रबंध लिहिला. हज प्रवास वर्णन, नारो शंकर राजेबहाद्दर आणि मालेगावचा इतिहास या ग्रंथाचे लेखन केले. ही पुस्तके चांगलीच गाजली. मालेगावमधील अनेक सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाचे पदे भूषविली. त्यांचा अनेक पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरोगामी चळवळीतील खंदा कार्यकर्ता ही त्यांची खरी ओळख होती. शेवटच्या श्वासापर्यंत ते हिंदू-मुस्लिम सदभावनेचे खंबीर पुरस्कर्ते म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाबद्दल जिल्ह्यातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

साधे राहणीमान, अजातशत्रू

डॉ. इलियास सिद्दीकी यांनी नोकरी करतानाही आपल्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. शिक्षणासोबतच त्यांचे लिखाण सुरू होते. त्यांची राहणी अतिशय साधी होती. त्यांचा मित्र परिवार सर्व क्षेत्राशी निगडित होता. शहर आणि जिल्ह्यात त्यांची अजातशत्रू कवी, शायर, गझलकार आणि पुरोगामी चळवळीतील परखड वक्ता अशी ओळख होती. ती त्यांनी शेवटपर्यंत जपली (Malegaon’s famous shire, poet, history researcher, strong supporter of Hindu-Muslim harmony, Dr. Ilyas Siddiqui passed away)

इतर बातम्याः

Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!

ऐन दिवाळीत नाशिकमध्ये 3 एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न; बोनससह हाती फक्त साडेचार हजारांचा पगार आल्याने घेतले विष

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिवसेना आमदार कांदेच्या घरी भेट; नाशिकमध्ये नाना अटकळींसह शिष्टाईच्या चर्चेला उधाण