बापाने शेजाऱ्याला घर विकलं, मुलाने रागात रॉड फेकूण मारला, बाप-बेटाच्या नात्यावर काळीमा फासणारी घटना

| Updated on: Feb 24, 2021 | 4:58 PM

संपत्तीच्या वादातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याची घटना नागपूरात घडली आहे (Man killed his father over property dispute).

बापाने शेजाऱ्याला घर विकलं, मुलाने रागात रॉड फेकूण मारला, बाप-बेटाच्या नात्यावर काळीमा फासणारी घटना
Crime-News
Follow us on

नागपूर : संपत्तीच्या वादातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याची घटना नागपूरच्या गणेश नगर पोलीस स्टेशन हद्दीतील मोहमद अली चौकात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेख युसूफ असं मृतकांचे नाव आहे. तर आरोपी मुलाचं नाव शेख अनिस असं आहे. आरोपी मुलाने वडीलाची हत्या केल्यानंतर स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे (Man killed his father over property dispute).

नेमकं काय घडलं?

शेख युसूफ आणि त्यांचा मुलगा शेख अनिस हे दोघं एकाच घरात राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी शेख युसूफ यांनी आपलं राहतं गर शेजाऱ्याला विकलं. त्यामुळे ते घर आता त्यांना खाली करुन द्यायचं होतं. मात्र, या गोष्टीला त्यांचा मुलगा अनिसचा विरोध होता. तुम्ही घर विकलं, मग आता आम्ही राहायचं कुठे? असा सवाल मुलगा आपल्या वडिलांना विचारत असे. याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सलग वाद सुरु होता. मात्र, आज सकाळी हा वाद विकोपाला गेला.

घरातील सर्व सदस्यांसमोर वाद

शेख युसूफ आणि त्यांचा मुलगा यांच्यात आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घर विकण्यावरुन जोरदार भांडण झालं. यावेळी मुलाने रागाच्या भरात युसूफ यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. या हल्ल्यात वृद्ध वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी घरात मुलाची पत्नी, आई आणि त्याची लहाण मुलगीदेखील उपस्थित होते. यापैकी कुणालाही आपल्या घरात इतकी भयानक घटना घडेल याची कल्पना नव्हती.

आरोपी मुलाला अटक

आपण केलेल्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच आरोपी मुलगा स्वत: हून पोलीस ठाण्यात गेला. तिथे त्याने पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगत स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे (Man killed his father over property dispute).

एकत्र कुटुंबात राहणाऱ्या या परिवारात संपत्तीचा वाद पुढे आला आणि ज्या पित्याने आपल्या पुत्राला जन्माला घातलं त्यानेच त्याची हत्या केली. यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या निमित्ताने संपत्तीचा लोभ माणसाला कुठल्या थराला पोहचवेल हे पुढे आलं आहे.

हेही वाचा : जेलमध्ये नग्न होऊन धिंगाणा, सातारा पोलिसांना मारण्याचा प्रयत्न, गांजाप्रकरणातील परदेशींचा राडा